मुंबई : शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक ३ नोव्हेंबरला जाहीर झाली असून शिवसेनेतील बंडानंतरची ही पहिलीच निवडणूक असल्याने मुंबईतील शिवसेनेच्या राजकीय शक्तीची चाचणी या पोटनिवडणुकीत होणार आहे. या निवडणुकीत शिवसेनेला धनुष्यबाण चिन्ह वापरता येणार की नाही याबाबतही उत्सुकता निर्माण झाली आहे.
शिवसेना आमदार रमेश लटके यांचे ते दुबई दौऱ्यावर असताना निधन झाले होते. त्यामुळे अंधेरी पूर्व विधानसभेची जागा रिक्त झाली होती. रिक्त जागेवर सहा महिन्यांत पोटनिवडणूक घेणे बंधनकारक असते. त्यानुसार केंद्रीय निवडणूक आयोगाने अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. तीन नोव्हेंबरला मतदान होणार असून ६ नोव्हेंबर २०२२ रोजी होणार मतमोजणी होईल अशी घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा : राज ठाकरे यांनी नागपूर कार्यकारिणी बरखास्त करून काय साध्य केले?

शिवसेनेतील बंडानंतर रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा यांना आपल्याकडे खेचण्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचा प्रयत्न होता. मात्र ऋतुजा लटके यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत कायम राहण्याचा निर्णय घेतला. पोट निवडणूक लागल्यावर ऋतुजा लटके यात शिवसेनेच्या उमेदवार असतील असे ठाकरे यांनी जाहीर केले होते. तर भाजपने मुरजी पटेल यांना या मतदारसंघात निवडणुकीच्या तयारीला लावले आहे. ही जागा शिवसेनेची असल्यामुळे आता या जागेवर शिंदे गट निवडणूक लढवणार की भाजपासाठी जागा सोडणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. शिवसेनेची जागा शिवसेनेला सोडली हे दाखवण्यासाठी मुरजी पटेल यांना शिंदे गटाचे उमेदवार म्हणून उभे करण्याचाही विचार होऊ शकतो अशी चर्चा सुरू आहे. त्याचबरोबर मुरजी पटेल यांना स्थानिक पातळीवर काही प्रमाणात विरोध असल्याने संमिश्र लोकवस्तीच्या मतदारांना मोहित करण्यासाठी एखादे नवे नाव भाजपकडून येऊ शकते अशी चर्चा अंधेरीमध्ये रंगली आहे.