आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या भगिनी वाय एस शर्मिला यांनी आज (४ जानेवारी) काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी, काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणूगोपाल आदी प्रतिष्ठीत आणि महत्त्वाचे नेते उपस्थित होते. गेल्या अनेक दिवसांपासून शर्मिला या काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत, अशी चर्चा रंगली होती. तेलंगणाच्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी स्वत:च्या पक्षाचे उमेदवार उभे न करता काँग्रेसला पाठिंबा दिला होता. त्यानंतर आता शर्मिला यांनी थेट काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

वाय व्ही सुब्बारेडी आणि शर्मिला यांच्यातील चर्चा निष्फळ

शर्मिला या आंध्र प्रदेशचे दिवंगत नेते तथा माजी मुख्यमंत्री वायएसआर रेड्डी यांची कन्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून वायएसआरसीपी पक्षाचे खासदार वाय व्ही सुब्बारेडी आणि शर्मिला यांच्यात बोलणी सुरू होती. सूत्रांच्या माहितीनुसार जगनमोहन रेड्डी यांनीच सुब्बारेड्डी यांना चर्चेसाठी शर्मिला यांच्याकडे पाठवले होते. शर्मिला यांनी वायएसआरसीपीमध्ये प्रवेश करावा, असा प्रस्ताव जगनमोहन रेड्डी यांनी शर्मिला यांच्यासमोर ठेवला होता. मात्र शर्मिला यांनी तो अमान्य केला. आता शर्मिला यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

Devendra Fadnavis, South-West constituency,
देवेंद्र फडणवीस यांच्या ‘दक्षिण-पश्चिम’मध्ये मतदानात तीन टक्क्यांची वाढ
North Nagpur Constituency, BJP North Nagpur,
दलित, मुस्लीम मतांचे विभाजन न झाल्यास भाजपला धोका!…
South Nagpur constituency, votes women South Nagpur, South Nagpur voting,
दक्षिण नागपूरमधील महिलांची वाढलेली मते निर्णायक
East Nagpur constituency, rebels East Nagpur,
पूर्व नागपूरचा निकाल बंडखोरच ठरवणार
central Nagpur, Nagpur, votes Nagpur,
मध्य नागपूरमध्ये ३४ हजार वाढीव मतांवरच विजयाचे गणित
West Nagpur, Vidhan Sabha Election Maharashtra,
पश्चिम नागपूरध्ये लाडक्या बहिणींचे मतदान अधिक, कौल कुणाला?
voting in gondia districts, ladki bahin yojana gondia,
गोंदिया जिल्ह्यात वाढीव मतदानाने उमेदवारांना धडकी! ‘लाडकी बहीण’चा प्रभाव, की परिवर्तनाची नांदी?
Buldhana district, increased voting in Buldhana district,
बुलढाणा जिल्ह्यातील वाढीव मतदान कोणाच्या पथ्यावर?
Record voting in Gadchiroli, Gadchiroli,
महिला, नवमतदारांचा कौल कोणाला? गडचिरोलीत विक्रमी मतदान

“राहुल गांधी पंतप्रधान व्हावेत, माझ्या वडिलांचे स्वप्न”

काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर राहुल गांधी देशाचे पंतप्रधान व्हावेत, ही माझ्या वडिलांचे स्वप्न होते. त्यासाठी मी प्रयत्न करेन, असे शर्मिला म्हणाल्या. शर्मिला यांचा वायएसआरटीपी हा स्वत:चा पक्ष आहे. त्या तेलंगणातील याआधीच्या बीआरएस सरकारवर सडकून टीका करायच्या. याच टोकाच्या टीकेमुळे तेलंगणाच्या पोलिसांनी शर्मिला यांना अनेकवेळा अटक केलेली आहे. पोलिसांच्या कामात अडथळा निर्माण केल्यामुळे त्या अलीकडे चर्चेत आल्या होत्या.

शर्मिला यांना राज्यसभेत खासदारकी?

दरम्यान, काँग्रेस शर्मिला यांना राज्यसभेत खासदारकी देण्यास तयार आहे. मात्र शर्मिला या खासदारकीस तेवढ्या उत्सूक नाहीत. याबाबत वायएसआरटीपी आणि शर्मिला यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली. शर्मिला यांना दिल्या जाणाऱ्या पदावर तसेच जबाबदारीवर येत्या ८ जानेवारी रोजी निर्णय होईल, असे शर्मिला यांनी वायएसआरटीपीच्या नेत्यांना सांगितले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार काँग्रेसने शर्मिला यांना दक्षिणेतील राज्यांचे माध्यम प्रभारीपद देण्याचीही तयारी दाखवलेली आहे. तसेच आगामी निवडणुकीत काँग्रेस पक्ष शर्मिला यांच्याच नेतृत्वाखाली आंध्र प्रदेशची निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. त्यामुळे आंध्र प्रदेशच्या राजकारणात आगामी काळात काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.