लोकसत्ता प्रतिनिधी

नागपूर : भाजपचा बालेकिल्ला असलेल्या नागपुरातील दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून माजी गृहमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांना रिंगणात उतरवण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती आहे. असे झाल्यास या मतदारसंघात विद्यामान गृहमंत्री विरुद्ध माजी गृहमंत्री अशी लढत होण्याची शक्यता आहे.

bhosari assembly constituency Election 2024 Latest News
भोसरी विधानसभेतून महाविकास आघाडीकडून अजित गव्हाणे यांचा अर्ज दाखल; लांडगे विरुद्ध गव्हाणे असा सामना होणार
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट…
Hadapsar assembly constituency
आघाडीत बिघाडी, त्यावर ‘आघाडी’चीच कुरघोडी! हडपसरमध्ये ‘मविआ’च्या उमेदवाराला ‘मविआ’मधूनच विरोध, खासदारांकडे गाऱ्हाणे
Anil Deshmukh, Anil Deshmukh news, Anil Deshmukh latest news,
देशमुखांची बदलेली भूमिका गृहकलह की राजकीय खेळी ?
Senior Maharashtra minister Sudhir Mungantiwar
Sudhir Mungantiwar: लोकसभेनंतर भाजपाने रणनीतीत ‘हा’ महत्त्वाचा बदल केला, सुधीर मुनगंटीवार म्हणाले, “RSS ने लोकसभेवेळी…”
Nationalist Ajit Pawar Group MLA Yashwant Mane
यशवंत माने यांच्या विरोधात महाविकास आघाडीचा कोण? मोहोळमध्ये आघाडीत इच्छुकांची भाऊगर्दी
yavatmal mahavikas aghadi
पुसद आणि दिग्रसमध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार ठरेना! बंजारा समाजाचा उमदेवार दिल्यास समीकरणे बदलणार
pathri assembly constituency
पाथरीच्या उमेदवारीसाठी महायुतीत कडवी स्पर्धा

निवडणुकांची घोषणा झाली नसली तरी महायुती व महाविकास आघाडीने निवडणुकीच्या तयारीस सुरुवात केली आहे. नागपूरमध्ये दक्षिण-पश्चिम या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघाचाही समावेश आहे. हा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. येथून फडणवीस सलग तीन वेळा विजयी झाले. परंतु, यावेळी त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीचे नेते व माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना रिंगणात उतरवण्याच्या हालचाली सुरू असल्याचे कळते. अनिल देशमुख हे काटोल या त्यांच्या पारंपरिक मतदारसंघातून पाच वेळा निवडून आले. यंदाही ते तेथूनच लढणार, असा अंदाज बांधला जात होता. मात्र आता त्यांच्या नावाची चर्चा दक्षिण-पश्चिम नागपूरसाठी होऊ लागली आहे. ही जागा आघाडीत काँग्रेसकडे आहे. मात्र, येथून काँग्रेसला मतदारसंघाच्या निर्मितीपासून म्हणजे २००९ पासून एकदाही विजय मिळवता आला नाही. महाविकास आघाडीच्या सत्ताकाळात अनिल देशमुख गृहमंत्री होते व त्यांच्यावर मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमवीरसिंह यांनी गैरव्यवहाराचे आरोप केले होते.अनिल देशमुख यांच्या उमेदवारीबद्दल मला अद्याप काहीच माहिती नाही, या केवळ अफवा आहेत, असे शहर अध्यक्ष राष्ट्रवादी (शरद पवार गट) दुनेश्वर पेठे यांनी म्हटले आहे.

हेही वाचा >>>माझा मतदारसंघ, ‘राज्यस्तरीय’ कार्यक्रमांची माझीच जबाबदारी, विविध महोत्सवांचा मंत्र्यांकडून पायंडा

नागपूर शहरातील विधानसभेच्या सर्व सहाही जागा काँग्रेसच लढणार आहे. मित्रपक्षासाठी जागा सोडण्याचा प्रश्नच येत नाही.- अतुल लोंढेप्रवक्ते, काँग्रेस.

दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला आहे. फडणवीस यांनी येथे अनेक विकासकामे केली आहेत. त्यांचा लोकांशी थेट संपर्क आहे. त्यांच्या विरोधात अनिल देशमुखच काय, शरद पवार जरी लढले तरी विजय फडणवीस यांचाच होणार. – चंदन गोस्वामीप्रवक्ते, भाजप.