नागपूर : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना राष्ट्रवादीने (शरद पवार) काटोल विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे. पण, देशमुख यांनी प्रमुख कार्यकर्त्यांशी विचारविनियम करूनच मी किंवा माझा मुलगा काटोलमधून लढेल, असा पवित्रा घेतला आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असताना देशमुख यांची बदलेली भूमिका गृहकलहाचे संकेत आहे की, प्रतिस्पर्धी पक्षाला संभ्रमात टाकण्याची खेळी, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

अनिल देशमुख हे १९९५ पासून काटोल विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहे. यादरम्यान केवळ २०१४ मध्ये परातभूत झाले. ते राष्ट्रवादीचा (शरद पवार) विदर्भातील प्रमुख चेहरा आहेत. पक्षाने त्यांना अपेक्षेप्रमाणे काटोलची उमेदवारी दिली. त्यांचे नाव जाहीर होताच त्यांनी निवडक कार्यकर्त्यांची बैठक बोलावली. पक्षाने मला उमेदवारी दिली असली तरी ही निवडणूक मी लढावी की, सलीलने (मुलगा) लढावे हे मी कार्यकर्त्यांसोबत चर्चा केल्यानंतर ठरवेन, असे त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले.

CM eknath shinde constituency, Bharat Chavan,
मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात भाजपच्या माजी नगरसेवकाचे भावी आमदार फलक झळकले
24th October 2024 Horoscopes In Marathi
24 October Horoscope : गुरुपुष्यामृत योग कोणत्या राशींसाठी…
Assembly election 2024 Rahul Awade BJP candidate from Ichalkaranji Kolhapur news
हाळवणकरांना विधान परिषदेला संधी, इचलकरंजीत राहुल आवाडे; चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा
Mahadev Jankar left Mahayuti, Gangakhed BJP,
‘सुंठे वाचून खोकला गेला’ जानकरांच्या भूमिकेनंतर गंगाखेडमध्ये भाजपला आनंद
Sharad Pawar Statement About Jayant Patil
Sharad Pawar : जयंत पाटील महाविकास आघाडीचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार? देवेंद्र फडणवीसांच्या आव्हानानंतर शरद पवारांचं सूचक विधान
Ajit Pawar
Ajit Pawar : अजित पवारांना मोठा धक्का; विधानसभेची उमेदवारी जाहीर केलेल्या आमदारासह ‘या’ नेत्याने हाती घेतली ‘तुतारी’
Amit Deshmukh statement caused unease among Congress workers in Latur print politics news
अमित देशमुख यांच्या विधानाने लातूरात काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता
Arvind Kejriwal
हरियाणातील आम आदमी पक्षाच्या पराभवानंतर अरविंद केजरीवालांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “आजच्या निकालातून…”

हेही वाचा – परभणी जिल्ह्यात मविआ आणि महायुतीच्या उमेदवारांची डोकेदुखी वाढली

देशमुख पुत्र सलील जिल्हा परिषद सदस्य आहेत. त्यांनी यापूर्वी दोनदा विधानसभा निवडणूक लढण्याचा आग्रह वडिलाकडे केला होता. परंतु अनिल देशमुख यांनी त्यांना थांबण्यास सांगितले आणि सलीलने ते मान्यही केले होते. आता मात्र सलील विधानसभा लढण्यावर ठाम आहेत. विधानसभा निवडणुकीची घोषणा होताच मतदारसंघातून अनिल देशमुख यांनी संवाद यात्रा काढली होती. या यात्रेत सलील देशमुख पूर्णवेळ सहभागी झाले होते. शिवाय वडील कारागृहात असताना सलील यांनीच मतदारसंघ सांभाळला. या भागातील अनेक प्रश्न मार्गी लावण्यासाठी सरकार दरबारी सातत्याने पाठपुरावा केला. यातून मतदारसंघात त्यांचा जनसंपर्क वाढला.

सलील निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असताना पक्षाने पुन्हा अनिल देशमुख यांना उमेदवारी दिली. त्यामुळे अनिल देशमुख यांना तातडीने प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावून भूमिका मांडावी लागली असावी, असे सांगण्यात येत आहे.

हेही वाचा – ‘अकोला पूर्व’मध्ये जातीय राजकारण निर्णायक, भाजपपुढे शिवसेना ठाकरे गट व वंचितचे आव्हान; तिरंगी लढत कुणाच्या पथ्यावर?

अनिल देशमुख हे तुरुंगातून बाहेर आल्यानंतर अधिक आक्रमक झाले आहेत. सत्ताधाऱ्यांनी षडयंत्र रचून तुरुंगात टाकण्यात आले, असा त्यांचा आरोप आहे. त्यामुळे प्रतिस्पर्धी भाजपने अनिल देशमुख यांचा पराभव करण्याची रणनीती आखली आहे. हे समजल्यावर देशमुख सतर्क झाले आहेत. ते भाजपचा उमेदवार कोण असेल याचा अंदाज घेत आहेत. त्यासाठी अधिक वेळ मिळावा म्हणून कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगत आहेत, असेही जाणकारांचे म्हणणे आहे. दरम्यान, अनिल देशमुख यांनी सर्व प्रमुख सहकाऱ्यांशी चर्चा करून मी किंवा सलील यांनी काटोल येथून निवडणूक लढण्याचा अंतिम निर्णय घेण्यात येईल. २८ नोव्हेंबरला उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येईल, असे पत्रकार परिषदेत सांगितले. या मतदारसंघात अद्याप भाजपने त्यांचा उमेदवार जाहीर केला नाही हे येथे उल्लेखनीय.