नागपूर : मुंबईच्या तत्कालीन पोलीस आयुक्तांनी केलेल्या आरोप प्रकरणात चौकशी आयोगापुढे वाझे याने मी किंवा माझ्या स्वीय सहायकाकडून पैशाची मागणी करण्यात आली नव्हती, असे स्पष्टपणे सांगितले होते. तरीही भाजपकडून त्याच्या आरोपाच्या कुबड्या घेऊन माझ्यावर आरोप केले जात आहेत. एका खुनाच्या आरोपीचा आधार घेण्याची वेळ भाजपवर आली, अशी टीका माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नागपूरमध्ये माध्यमांशी बोलताना केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

देशमुख आणि भाजप यांच्यात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुरूच आहेत. देशमुख यांनी रविवारी सचिन वाझे यांचे आरोप फेटाळून लावताना भाजपला लक्ष्य केले. खुनाचा आरोप असलेल्या वाझेंच्या मदतीने भाजप आपल्यावर आरोप करीत आहे. मुंबईच्या तत्कालीन पोलीस आयुक्तांनी केलेल्या आरोपाची चौकशी न्या. चांदीवाल यांनी केली होती. त्यांच्यापुढे उलट तपासणी दरम्यान वाझे यांनी देशमुख यांनी किंवा त्यांच्या स्वीय साहाय्यकांनी कधीही पैशाची मागणी केली नव्हती, असे स्पष्टपणे सांगितले होते. ऐकीव माहितीच्या आधारावर आरोप केल्याचे स्पष्ट केले होते. असे असताना आता भाजप केवळ राजकीय सूडबुद्धीपोटी वाझेंच्या आरोपाचा आधार घेऊन माझ्यावर आरोप करीत आहे, असे देशमुख म्हणाले.

हेही वाचा >>>सध्याची लोकसभा सर्वांत वयोवृद्ध! तरुण खासदारांची संख्या का घटली?

‘चांदीवाल आयोगाचा अहवाल दडपला जातोय’

न्यायमूर्ती चांदीवाल आयोगाचा अहवाल दोन वर्षांपूर्वी शासनाला सादर करण्यात आला. परंतु, मागणी करूनही तो अहवाल जाहीर केला जात नाही. या अहवालात मला ‘क्लीन चिट’ देण्यात आल्यानेच तो दडपला जात आहे, असा आरोप देशमुख यांनी केला.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anil deshmukh criticism of bjp amy