संतोष प्रधान
दक्षिणेतील प्रादेशिक पक्षांमध्ये घराणेशाही अधिक प्रभावी ठरते हे नेहमीत अनुभवास येते. त्याचे ताजे उदाहरण म्हणजे आजच विस्तार करण्यात आलेल्या तमिळनाडू मंत्रिमंडळात मुख्यमंत्री स्टॅलिन यांचे पूत्र उदयनिधी यांचा झालेला समावेश. शेजारील तेलंगणात के. चंद्रशेखर राव – रामराव ही पिता- पुत्राची जोडी कार्यरत असताना तमिळनाडूतही पिता-पूत्र दोघेही मंत्रिमंडळात असतील.
तमिळनाडूतील द्रमुकमध्ये नेहमीच घराणेशाहीचा पुरस्कार करण्यात आला. अण्णा दुराई यांनी स्थापन केलेल्या द्रमुकची १९८०च्या दशकात दोन शकले झाली. करुणानिधी आणि एम. जी. रामचंद्रन असे दोन गट झाले. करुणानिधी यांनी आधी आपले भाचे मुरसोली मारन यांना पुढे आणले. त्यानंतर पूत्र स्टॅलिन व कन्या कानीमोझी यांना संधी दिली. करुणानिधी यांचे राजकीय वारस म्हणून स्टॅलिन यांनी पक्षावर नियंत्रण मिळविले व गेल्या वर्षी मुख्यमंत्रीपदही . स्टॅलिन पूत्र उदयनिधी हे विधानसभेत निवडून आले. द्रमुकला सत्ता मिळताच त्यांचाही मंत्रिमंडळात समावेश करावा, अशी मागणी करण्यात येत होती. पण स्टॅलिन यांनी गेल्या मे महिन्यात सत्ता मिळाल्यापासून दीड वर्षे मुलाचा मंत्रिमंडळात समावेश केला नव्हता.
हेही वाचा… राष्ट्रवादीतील नव्या पिढीच्या आशा पल्लवीत
मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी सरकार स्थापन केले तेव्हा वडिलांनी केलेल्या काही चुका टाळल्या होत्या. घराणेशाहीचा आरोप होणार नाही याची खबरदारी घेतली होती. तसेच द्रमुकच्या मंत्र्यांवर नेहमी भ्रष्टाचाराचे आरोप होत असत. यंदा स्टॅलिन यांनी कठोर भूमिका घेतली आहे. पण दीड वर्षातच आपले राजकीय वारस उदयनिधी यांचा मंत्रिमंडळात समावेश करून वडिल करुणानिधी यांच्या पावलावर पाऊल टाकले आहे. करुणानिधी मुख्यमंत्री असताना स्टॅलिन हे मंत्री होते. आता स्टॅलिन मुख्यमंत्री तर त्यांचे पूत्र मंत्री झाले आहेत.
हेही वाचा… औरंगाबाद: राष्ट्रवादीचे माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर शिवसेनेत
तेलंगणात तेलंगणा राष्ट्र समितीचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचे पूत्र रामाराव हे मंत्री आहेत. सरकारचा सारा कारभार चंद्रशेखर राव यांचे पूत्रच बघतात, अशी त्यांच्यावर टीका होते. पण परदेशी गुंतवणूक तेलंगणात आकर्षित करण्यात रामाराव हे महत्त्वाची भूमिका बजावितात.
हेही वाचा… गंगापूर मतदारसंघात राष्ट्रवादीकडून नवी पटमांडणी; आमदार सतीश चव्हाण यांच्याकडून पेरणी
राज्यात महाविकास आघाडी सरकारमध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री तर आदित्य ठाकरे मंत्रीपदी होते. सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पूत्र लोकसभेेचे खासदार आहेत. प्रकाशसिंग बांदल व त्यांचे पूत्र, डॉ. फारुख अब्दुल्ला व त्यांचे पूत्र, चंद्रशेखर राव- रामाराव अशा काही पिता पूत्राच्या जोड्या मुख्यमंत्री व मंत्री झाल्या आहेत.
वडिल आणि मुलगा मुख्यमंत्री झाल्याच्या जोड्या :
शंकरराव चव्हाण – अशोक चव्हाण</p>
करुणानिधी – स्टॅलिन
डॉ. फारुक अब्दुल्ला – ओमर अब्दुल्ला
एस. आर. बोम्मई – बसवराज बोम्मई
मुफ्ती मोहंमद – मेहबुबा मुफ्ती
शिबू सोरेन – हेमंत सोरेन
देवेगौडा – कुमारस्वामी
बिजू पटनायक – नवीन पटनायक
वाय. एस. राजशेख रेड्डी – जगनमोहन रेड्डी
मुलामय यादव – अखिलेश यादव
हेमवतीनंदन बहुगुणा – विजय बहुगुणा
दोरजी खंडू – प्रेम खंडू