रत्नागिरी जिल्ह्यातील उध्दव ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्यामागे लागलेला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा ससेमिरा सुटण्याची चिन्हे नसून, उलट आता हे अधिकारी साळवी यांच्या घर-हॉटेलपर्यंत तपासणीसाठी पोहोचले आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
हेही वाचा- मोरारजी देसाईंच्या जयंतिनिमित्त भाजपाकडून आणीबाणीचे स्मरण, काँग्रेस मात्र गप्प!
रायगड जिल्ह्यातील लाचलुचपत विभागाच्या अधिकार्यांच्या सूचनेनुसार रत्नागिरीतील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी व कर्मचार्यांनी आमदार साळवी यांच्या येथील तेली आळीमध्ये असलेल्या जुन्या घराची व मुख्य मार्गावरील हॉटेलची मोजणी घेतली. त्यानंतर खालची आळी परिसरातील नव्या घराचीही मापे घेण्यात आली. सुमारे अडीच तास ही प्रक्रिया सुरू होती. यावेळी त्यांचे मोठे बंधू दीपक साळवीही उपस्थित होते. बांधकाम विभागाकडून याबाबतचा अहवाल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या रायगड येथील कार्यालयाला पाठवण्यात येणार आहे.
हेही वाचा- विमानतळाच्या मागणीतही भाजपामधील गटबाजीचे प्रदर्शन
आमदार साळवी यांच्या मालमत्तेबाबत रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चौकशीची नोटीस गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात पाठवली होती. त्यानुसार गेल्या २० जानेवारी रोजी मालमत्तेची कागदपत्रे घेऊन साळवी यांनी या विभागाच्या रायगड येथील कार्यालयात हजेरी लावली. या वेळी त्यांच्याविषयी, तसेच कुटुंबीयांच्या मालमत्तेची चौकशी करण्यात आली. आमदार साळवी यांनी सादर केलेल्या कागदपत्रांनी समाधान न झाल्याने आणखी काही कागदपत्रे लाच लुचपत विभागाने मागवली. त्यानुसार गेल्या महिन्यात तीही देण्यात आली. त्या भेटीमध्ये लाच लुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी सुमारे साडेसात तास चौकशी करून अजूनही काही कागदपत्रांची माहिती मागवली आहे.
हेही वाचा- नागपूरमधील गडकरींच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात कोलदांडा कोणाचा?
यावर, आत्तापर्यंत झालेल्या चौकशीने त्यांचे समाधान होत नाही, हा त्यांचा किंवा माझा दोष असेल. मात्र चौकशीत मी निर्दोष सुटणार, असा विश्वास आमदार साळवी यांनी चौकशीनंतर कार्यालयाबाहेर आल्यानंतर व्यक्त केला. त्यानंतर आता रत्नागिरीतील त्यांच्या घरी व हॉटेलचीही मोजमापे या विभागाने मागवली आहेत.
हेही वाचा– धर्मांतर केलेल्या दलित ख्रिश्चन, दलित मुस्लिमांना आरक्षणाचा लाभ द्यावा का? संघ परिवार करणार चिंतन
साळवी यांच्याबरोबरच त्यांचे स्वीय्य सहाय्यक सुभाष मालप आणि ठेकेदारांचीही चौकशी करण्यात आली आहे. त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनाही चौकशीसाठी बोलावले जाते. त्यासाठी या सर्वांना रायगड कार्यालयात हजर राहावे लागते. त्यामुळे वैतागलेल्या आमदार साळवी यांनी, एकदाचे काय ते करा, मला आत टाका. परंतु कुटुंबियांना त्रास देऊ नका,अशी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.