मुंबई : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर राज्य सरकारने तब्बल २७ महामंडळांवर अध्यक्ष-उपाध्यक्षांच्या नियुक्त्या केल्या आहेत. निवडणुकीत बंडखोरी टाळण्यासाठी अनेकांची महामंडळांवर वर्णी लावण्यात आली असून यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच्या तारखा टाकून याबाबतचे आदेश काढण्यात आल्याची माहिती मंत्रालयातील सूत्रांनी दिली.

● महाराष्ट्र रोजगार हमी परिषद – शहाजी पवार, अध्यक्ष;

Uddhav Thackeray and Eknath Shinde MLA Chief Ministership
सर्वांत कमी आमदारांच्या जोरावर मुख्यमंत्रीपद !
ankita walawalkar aka kokan hearted girl first told to raj thackeray about her marriage
“लग्नाची बातमी सर्वात आधी राज ठाकरेंना…”, प्रेमाची जाहीर…
dominican republic citizenship
पैसे नाहीत म्हणून ‘या’ देशानं नागरिकत्वच काढलं विकायला; किंमत लावली १ कोटी ७० लाख!
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य पुन्हा येईल, अशी स्थिती…”; शरद पवारांचं वक्तव्य चर्चेत
Sharad pawar on ladki bahin scheme
मविआ सत्तेत आल्यावर लाडकी बहीण योजना बंद करणार? या प्रश्नावर शरद पवार स्पष्टच बोलले…
Eknath shinde MP Prataprao jadhav over Light bill
“आम्ही तीन पिढ्या वीजबिल भरलं नाही, हजार रुपये इंजिनिअरला देतो अन्…”, शिंदे गटाच्या खासदाराचं विधान चर्चेत
Devendra Fadnavis Answer to Uddhav Thackeray
Devendra Fadnavis : ‘एक तर तू राहशील किंवा मी राहिन’, उद्धव ठाकरेंच्या आव्हानाला देवेंद्र फडणवीसांचं उत्तर, “त्यांना वाटत असेल तर..”
New Lady of Justice Statue Freepik all indian radio
New Lady of Justice Statue : भारतात आता ‘अंधा कानून’ नसेल, न्यायदेवतेच्या डोळ्यांवरील पट्टी हटवली; तलवारीऐवजी… नव्या मूर्तीत काय आहे खास?

● लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ – दिलीप कांबळे, अध्यक्ष;

● लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक समिती – सचिन साठे, उपाध्यक्ष;

● महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोग – सतीश डोगा अध्यक्ष, मुकेश सारवान, उपाध्यक्ष; वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ – निलय नाईक, अध्यक्ष;

● महाराष्ट्र राज्य सहकार विकास महामंडळ – अरविंद पोरट्टीवार, अध्यक्ष;

● मौलाना आझाद अल्पसंख्यांक विकास महामंडळ – इद्रिस मुलतानी, अध्यक्ष;

● महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ, व महाराष्ट्र कृषी शिक्षण आणि संशोधन परिषद – प्रमोद कोरडे, अध्यक्ष;

● पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र राज्य मेंढी व शेळी विकास महामंडळ – विजय वडकुते, अध्यक्ष, बाळासाहेब किसवे, संतोष महात्मे, उपाध्यक्ष

हेही वाचा >>>काँग्रेसकडून विदर्भात सांगली प्रारुपाची पुनरावृत्ती? राष्ट्रवादीकडे असलेल्या काटोल मतदारसंघाकडे लक्ष

● पेट्रोकेमिकल्स महामंडळ – अतुल काळसेकर, अध्यक्ष;

● महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ – राजेश पांडे, अध्यक्ष;

● गोपीनाथ मुंडे ऊस तोड कामगार मंडळ – गोविंद केंद्रे, अध्यक्ष;

● महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन (मित्रा) – बळीराम शिरसकर, सदस्य;

● राजे उमाजी नाईक आर्थिक विकास मंडळ – दौलत नाना शितोळे, उपाध्यक्ष;

● वन विकास महामंडळ – अतुल देशकर, उपाध्यक्ष;

● महाराष्ट्र राज्य सहकारी बँक वेतन समिती – नरेंद्र सावंत, अध्यक्ष;

● महिला आर्थिक विकास महामंडळावर (माविम) – मिनाक्षी शिंदे,अध्यक्षा, राणी द्विवेदी, उपाध्यक्ष;

● आदिवासी विकास महामंडळ – काशिनाथ मेंगाळ, अध्यक्ष;

● मारुती चव्हाण वडार आर्थिक विकास महामंडळ – विजय चौगुले, उपाध्यक्ष;

● आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, मुंबई – अजय बोरस्ते, उपाध्यक्ष;

● महाराष्ट्र औद्याोगिक विकास महामंडळ – भाऊसाहेब चौधरी, उपाध्यक्ष;

● महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळांवर – आनंद जाधव, उपाध्यक्ष;

● महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळ – कल्याण आखाडे, उपाध्यक्ष;

● राज्य कंत्राटी कामगार सल्लागार मंडळ – श्रीनाथ भिमाले, अध्यक्ष;

● महाराष्ट्र राज्य ग्राहक सरंक्षण परिषद – संदीप लेले अध्यक्ष, अरुण जगताप उपाध्यक्ष अशा नियुक्त्या आहेत.