मुंबई : सरकारने एकूण किती डास पकडले… डासांचे वर्गीकरण करताना किती नर आणि किती मादी डास आढळले…यात नर डास जास्त धोकादायक आहेत की मादी डास धोकादायक आहेत. डासांच्या विच्छेदनाचे अहवाल प्राप्त झाले आहेत का ? याचा व्हीसेरा उपलब्ध आहे का ? अशा अनेक मिश्किल प्रश्नांची सरबत्ती माजी मंत्री छगन भुजबळ यांनी केल्याने आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची विधानसभेत भंबेरी उडाली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा… आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यास मिळणाऱ्या प्रतिसादाने बंडखोर अस्वस्थ

हेही वाचा… नवनीत राणांच्‍या खासदारकीमागे नेमके कुणाचे आशीर्वाद? पवार की फडणवीस? नव्‍या दाव्‍याने राणा दाम्‍पत्‍य पुन्‍हा चर्चेत

पालघर जिल्ह्यातील हत्तीरोगाचा वाढता प्रभाव पाहता शासनाने काय उपाययोजना केली यावर लेखी उत्तरात सरकारने निवडक भागातील डास पकडून त्याचे वर्गीकरण केले, विच्छेदन केले, व डास घनता काढली असे उत्तर आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी आज सभागृहात दिले. या उत्तरानंतर माजी मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या खास शैलीत सावंत यांना कोंडीत पकडले. डासांचे वर्गीकरण आणि विच्छेदन यावरून प्रश्नांची सरबत्ती केली. माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या अचानक आलेल्या या प्रश्नांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत गोंधळले आणि सभागृहात एकच हशा पिकला.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Are male mosquitoes more dangerous or female mosquitoes chhagan bhujbal hilarious question in vidhan sabha print politics news asj