लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान उद्या (ता. २६ एप्रिल) पार पडणार आहे. पश्चिम उत्तर प्रदेशमधील आठ मतदारसंघांसाठीचे मतदान या टप्प्यामध्ये होणार आहे. त्यामध्ये काही हायप्रोफाईल लढतींचाही समावेश आहे. अभिनेत्री हेमा मालिनी, अभिनेता अरुण गोविल आणि बसपामधून काँग्रेसमध्ये गेलेले नेते दानिश अली यांच्या लढतींनी सर्वांचे लक्ष वेधले आहे.

हेही वाचा : रायबरेलीत ‘गांधी विरुद्ध गांधी’?; वरुण गांधींना मिळणार का तिकीट?

Dr. Nitin Raut, Dr. Milind Mane
उत्तर नागपूरमध्ये तिसऱ्यांदा राऊत- माने लढत
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
Video captured of collarwali tigress and her cubs while playing in Tadoba Andhari Tiger Project
Video : ताडोबातील “कॉलरवाली” आणि तिचे बछडे..
Hadapsar assembly constituency
आघाडीत बिघाडी, त्यावर ‘आघाडी’चीच कुरघोडी! हडपसरमध्ये ‘मविआ’च्या उमेदवाराला ‘मविआ’मधूनच विरोध, खासदारांकडे गाऱ्हाणे
Nationalist Ajit Pawar Group MLA Yashwant Mane
यशवंत माने यांच्या विरोधात महाविकास आघाडीचा कोण? मोहोळमध्ये आघाडीत इच्छुकांची भाऊगर्दी
Buddhist Dalit communitys displeasure is a challenge to Congress in Bhandara Constituency
बौद्ध दलित समाजाच्या नाराजीचे भंडारा मतदारसंघात काँग्रेससमोर आव्हान!
Stree 2 fame Shraddha Kapoor might also join telugu allu arjun much awaited pushpa 2 movie
अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २’ चित्रपटात स्त्रीची एन्ट्री? श्रद्धा कपूर घेणार ‘या’ अभिनेत्रीची जागा
MP Amar Kale is trying for his wife Mayura Kales candidacy
पत्नीच्या तिकिटासाठी खासदार प्रयत्नशील, मात्र काँग्रेस नेत्यांचा विरोध

दुसऱ्या टप्प्यातील मतदानामध्ये, उत्तर प्रदेशमधील अमरोहा, मेरठ, बागपत, गाझियाबाद, गौतम बुद्ध नगर, बुलंदशहर, अलिगढ आणि मथुरा या मतदारसंघांचा समावेश आहे. या ठिकाणी बेरोजगारी हा सर्वांत कळीचा मुद्दा आहे. तसेच विविध स्पर्धा परिक्षांमध्ये वारंवार होत असलेल्या पेपरफुटीचा मुद्दाही खूप चर्चेत आहे. इथे पुरेशा नोकऱ्या उपलब्ध नसल्यामुळे तरुण वर्गामध्ये संतापाची लाट आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये या आठ मतदारसंघांपैकी सात मतदारसंघांमध्ये भाजपाचा विजय झाला होता. फक्त अमरोहा मतदारसंघामध्ये बसपा-सपा-रालोद युतीचे उमेदवार दानिश अली यांचा विजय झाला होता. या निवडणुकीमध्ये सपा आणि काँग्रेसने युती केली आहे. राष्ट्रीय लोक दलाने भाजपाबरोबर युती केली आहे, तर बसपा स्वतंत्रपणे लढत आहे.

यापूर्वी बागपत मतदारसंघामध्ये माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह यांच्या कुटुंबीयांपैकी कुणी ना कुणी लढत होते. मात्र, पहिल्यांदाच त्या मतदारसंघातून त्यांच्या कुटुंबीयांपैकी कुणीही निवडणूक लढवत नाही. या ठिकाणी रालोदने राजकुमार संगवान यांना उमेदवारी दिली आहे. समाजवादी पक्षाच्या अमरापाल शर्मा यांच्याशी त्यांची लढत होणार आहे. शर्मा हे माजी आमदार असून ब्राह्मण नेते अशी त्यांची ओळख आहे. दुसरीकडे, बसपाने तिथे प्रवीण बैंसला यांना उमेदवारी दिली आहे.

निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यामध्ये, उत्तर प्रदेशमधील तीन मतदारसंघांमध्ये राजपूत समाजाने उघडपणे सत्ताधारी भाजपावर संताप व्यक्त केल्याचे दिसून आले आहे. एकीकडे सपा-बसपा युती भाजपावरील राजपूतांच्या रागाचा आपल्याला कसा फायदा करून घेता येईल, याचे प्रयत्न करताना दिसत आहे. तर, दुसरीकडे भाजपाने पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रोड शो आयोजित करून त्यांचा राग शमवण्याचा प्रयत्न केला आहे. भाजपाने संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि योगी आदित्यनाथ यांच्या सभाही घेतल्या आहेत. ते दोघेही राजपूत समाजाचे प्रतिनिधित्व करतात.

याबरोबरच आणखीही काही मुद्दे या निवडणुकीमध्ये चर्चेत आहेत. उसाला मिळणारा भाव, भटक्या प्राण्यांची समस्या, वाढती महागाई आणि बेरोजगारी अशा काही समस्या मेरठ, बागपत, बुलंदशहर मतदारसंघामध्ये महत्त्वाच्या ठरत आहेत. मथुरेत यमुना नदीची स्वच्छता, धार्मिक पर्यटनाचा विकास आणि नव्या उद्योगांची उभारणी असे मुद्दे चर्चेत आहेत.

गाझियाबाद आणि गौतम बुद्ध नगर हे दिल्ली आणि राजधानी परिसरात मोडते. तिथल्या मतदारांना फ्लॅटची नोंदणी, जमीन विकत घेणे आणि नुकसान भरपाई मिळण्यास विलंब होणे यांसारख्या समस्या आहेत.

अमरोहामध्ये दानिश अली यांना उमेदवारी मिळाली आहे. लोकसभेमध्ये भाजपाचे खासदार रमेश बिधुरी यांनी त्यांच्यावर असंसदीय शब्दात टीका केली होती. त्यानंतर ते अधिक चर्चेत आले होते. या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बसपाच्या प्रमुख मायावतींनीही त्यांच्यावर टीका केली आहे. दानिश अली यांच्या विरोधात बसपाचे मुजाहिद हुसेन आणि भाजपाच्या कंवरसिंह तंवर यांचे आव्हान आहे. २०१९ मध्ये दानिश अली यांनी बसपाच्या तिकिटावरून भाजपाच्या कंवरसिंह तंवर यांचा पराभव केला होता.

अरुण गोविल यांना मेरठची उमेदवारी देण्यात आली आहे. ‘रामायण’ या लोकप्रिय टीव्ही सीरियलमध्ये रामाची भूमिका केल्याने प्रसिद्धीचे वलय त्यांच्या पाठिशी आहे. राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यानंतर ही उमेदवारी देण्यात आल्यामुळे ते चर्चेत आहेत. या ठिकाणी त्यांच्यासमोर सपाच्या सुनीता वर्मा यांचे आव्हान आहे. बसपाचे देवव्रत कुमार त्यागीही या लढतीत आहेत.

बॉलीवूड अभिनेत्री हेमा मालिनी भाजपाकडून मथुराच्या दोन वेळा खासदार राहिल्या आहेत. यावेळी त्यांच्या विरोधात काँग्रेसच्या मुकेश धनगर यांचे आव्हान असणार आहे. हेमा मालिनी उपऱ्या आहेत, असा प्रचार ते करत आहेत. ‘प्रवासी (उपऱ्या) विरुद्ध ब्रजवासी’ अशी घोषणा देऊन आपण मथुरेचे सुपुत्र असल्याचे ते सांगत आहेत. बसपाने या मतदारसंघात जाट समाजाचे प्रतिनिधित्व करणारे माजी आयआरएस अधिकारी सुरेश सिंह यांना उमेदवारी दिली आहे.

हेही वाचा : राजपूत, जाट समुदाय भाजपावर नाराज आहेत का? राजस्थान भाजपा प्रमुख सांगतात…

गौतम बुद्ध नगर आणि गाझियाबादमध्ये भाजपाने २०१९ च्या निवडणुकीमध्ये विक्रमी मताधिक्याने विजय संपादन केला आहे. मात्र, यावेळी भाजपाला इथे क्षत्रियांच्या रोषाचा सामना करावा लागतो आहे. ठाकूर समाजाचे प्रतिनिधित्व करणारे जनरल व्ही. के. सिंह (निवृत्त) यांना उमेदवारी न मिळाल्यामुळे हा रोष व्यक्त केला जातो आहे. भाजपाने या ठिकाणी वैश्य समाजाचे प्रतिनिधित्व करणारे अतुल गर्ग यांना उमेदवारी दिली आहे. बसपाने ठाकूर असलेल्या नंद किशोर यांना, तर काँग्रेसने डॉली शर्मा यांना उमेदवारी दिली आहे.

गौतम बुद्ध नगरमध्ये भाजपाने माजी मंत्री आणि दोन वेळा खासदार राहिलेल्या मुकेश शर्मा यांना उमेदवारी दिली आहे. सपाने गुर्जर समाजाचे डॉ. महेंद्र नागर यांना, तर बसपाने माजी आमदार राजेंद्र सोळंकी यांना उमेदवारी दिली आहे. बुलंदशहरमध्ये भाजपाचे विद्यमान खासदार भोला सिंह निवडणूक लढवत आहेत. त्यांना लोध समाजाचा पाठिंबा आहे. बसपाने गिरीश चंद्र जाटव यांना, तर काँग्रेसने शिवराम वाल्मीकी यांना उमेदवारी दिली आहे. अलिगढमध्ये भाजपाचे सतीश गौतम, सपाचे बिजेंद्र सिंह आणि बसपाचे हिंतेद्र उपाध्याय यांच्यात लढत होणार आहे.