Delhi Budget Ram Rajya Play दिल्लीच्या अर्थमंत्री आतिशी यांनी सोमवारी दिल्ली सरकारचा ७६ हजार कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर करताना ९० मिनिटांच्या आपल्या भाषणात किमान ४० वेळा राम, रामराज्य आणि रामायणाचा उल्लेख केला. लोकसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पक्षाने (आप) सादर केलेल्या या अर्थसंकल्पाला धार्मिक प्रतिमा तयार करण्याचा प्रयत्न आणि हिंदू मतदारांना आकर्षित करण्याचा उद्देश म्हणून पाहिले जात आहे. आपची हिंदुत्ववादी भूमिका काय? लोकसभा निवडणुकीसाठी फायद्याचे ठरेल का? याबद्दल जाणून घेऊ.

अर्थमंत्री आतिशी यांनी अर्थसंकल्पातील त्यांच्या संपूर्ण भाषणात, अर्थसंकल्प रामराज्य आणि रामायणाने प्रेरित आहे आणि आप दिल्लीत रामराज्य स्थापन करण्यासाठी गेल्या नऊ वर्षांपासून अहोरात्र काम करत आहे, असे सांगितले. “जेव्हा जेव्हा अयोध्येचे वर्णन केले जाते तेव्हा असे म्हटले जाते की, जगभरात अयोध्येसारखे सुंदर आणि समृद्ध शहर नाही. आज मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली आम्ही दिल्लीत प्रभू रामाच्या अयोध्येप्रमाणेच समृद्धी आणण्यासाठी कठोर परिश्रम करत आहोत”, असे आतिशी म्हणाल्या. प्रत्येक मुलाला शिक्षित करून गरिबी दूर केली जाऊ शकते, असा सरकारचा विश्वास आहे, असेही त्या म्हणाल्या.

Wardha, crushed notes caught fire,
नोटांचा चुरा भरलेला ट्रक पेटला, तर्कवितर्क सुरू
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Baramati Assembly Constituency Assembly Election 2024 Ajit Pawar Yugendra Pawar print politics news
लक्षवेधी लढत: बारामती : बारामती कोणत्या पवारांची?
Ramesh Chennithala
Ramesh Chennithala : “हरियाणाच्या निवडणुकीतून खूप शिकायला मिळालं, त्यामुळे ८० टक्के बंडखोरांनी…”, रमेश चेन्निथला यांचं महाराष्ट्राच्या निवडणुकीबाबत मोठं भाष्य
shweta mahale vs congress rahul bondre
चिखलीत ‘ताई’ आणि ‘भाऊ’ची प्रतिष्ठा पणाला; तुल्यबळ लढतीत कोण बाजी मारणार?
vidarbh election
विदर्भात लोकसभा निकालाची पुनरावृत्ती की महायुतीला कौल? 
thackeray shiv sena break in panvel
पनवेलमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेत फूट
Washim District, maha vikas aghadi, mahayuti
वाशीम जिल्ह्यात तिरंगी-चौरंगी सामने; जातीय समीकरण, मतविभाजन कुणाच्या पथ्यावर?

आप सत्तेवर येण्यापूर्वी दिल्लीतील रुग्णालये आणि इतर पायाभूत सुविधांची अवस्था वाईट होती असे आतिशी यांनी सांगितले. भ्रष्टाचाराचे आरोप असलेले आणि अंतरिम जामिनावर बाहेर असलेले माजी आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांच्या कामासाठी आतिशी यांनी त्यांची तुलना भगवान हनुमान यांच्याशी केली. त्या म्हणाल्या, “जसे भगवान हनुमानाने संकटाच्या वेळी संजीवनी बुटी आणली, तसेच आमच्या बंधूंनी (सत्येंद्र जैन) दिल्लीच्या आरोग्य व्यवस्थेत क्रांती घडवून आणली.”

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पक्षाच्या रामराज्य भूमिकेबद्दल विचारले असता, केजरीवाल म्हणाले, “आमचा रामराज्यावर विश्वास आहे. आम्ही अनेक अर्थसंकल्पीय सादरीकरणांमध्ये या संकल्पनेचा उल्लेख केला आहे. अगदी मनीष सिसोदिया (माजी अर्थमंत्री) यांच्या काळातही या संकल्पनेचा उल्लेख केला गेला आहे”, असे ते म्हणाले.

‘केजरीवाल का रामराज्य’ हॅशटॅग

सोशल मीडियावर आप ‘केजरीवाल का रामराज्य’ हॅशटॅग चालवत आहेत. २०२४-२५ च्या अर्थसंकल्पातील महत्त्वाचे निर्णय प्रभू रामाच्या प्रतिकात्मक धनुष्य-बाणांसह पोस्ट करण्यात आले आहेत. गेल्या महिन्यात केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आणि त्यांच्या कुटुंबीयांनी अयोध्येतील राम मंदिराला भेट दिली होती. केजरीवाल यांनी इतर विरोधी पक्षांप्रमाणेच जानेवारीत श्रीराम मंदिराच्या अभिषेक समारंभाला न जाण्याचा निर्णय घेतला होता. याऐवजी पक्षाने दिल्लीत ‘सुंदरकांड’ आणि ‘हनुमान चालीसा’ पठण कार्यक्रमांचे आयोजन केले होते.

पक्षाची हिंदुत्ववादी भूमिका

२०२२ च्या दिल्ली महानगरपालिका निवडणुकीपूर्वी पक्षाने त्यागराज स्टेडियममध्ये राम मंदिराची प्रतिकृती तयार केली होती. २०२० च्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, पक्षाने केजरीवाल यांना ‘दिल्लीचा श्रवण कुमार’ असे संबोधले. श्रवण कुमार आई-वडिलांची मनोभावे सेवा करणारा मुलगा होता. तो आई-वडिलांना कावडीमध्ये बसवून तीर्थयात्रेला घेऊन गेला. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी, दिल्ली सरकारनेही तीर्थयात्रा योजना सुरू केली होती. या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत तीर्थयात्रेचे आयोजन केले जाते. आतापर्यंत ८७ हजार ज्येष्ठ नागरिकांनी अयोध्या, मथुरा, वृंदावन आणि रामेश्वरम या तीर्थक्षेत्रांना भेट देण्यासाठी या योजनेचा लाभ घेतला आहे.

एका वरिष्ठ आप नेत्याने सांगितले की, हिंदू मतदारांना आकर्षित करण्यासाठी संपूर्ण भारतातील राम भक्तीच्या लाटेचा फायदा करून घेण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे. “पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अयोध्येतील राम मंदिराचे उद्घाटन केल्याने देशभरात सर्वत्र राम भक्तीची लाट उसळली आहे. जेव्हा निवडणुका जवळ येतात, तेव्हा हिंदूत्व आणि देशभक्ती नेहमीच भाजपाचे बलस्थान राहिले आहे. त्यांची व्होट बँकही मोठ्या प्रमाणात त्यावरच अवलंबून आहे. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून, आप लोकसभा निवडणुकीपूर्वी हिंदू मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे”, असे आप कार्यकर्त्याने सांगितले. दुसऱ्या आप नेत्याच्या म्हणण्यानुसार, जर पक्षाला दिल्लीतील भाजपाची घोडदौड संपवायची असेल तर हिंदू मतदारांपर्यंत पोहोचणे अत्यावश्यक आहे.

अर्थसंकल्पावर भाजपाची प्रतिक्रिया

दिल्ली भाजपाने आपच्या अर्थसंकल्पाला ‘प्रसिद्धी स्टंट’ म्हटले आहे. या अर्थसंकल्पाला राजकीय डावपेच म्हणत दिल्ली भाजपाचे अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा म्हणाले, “आपल्या सर्वांना माहीत आहे की, २०२४-२५ चा अर्थसंकल्प केजरीवाल सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प आहे. राज्याच्या अर्थसंकल्पात लोकांसाठी काहीही नवीन नसून विकास प्रकल्पांबाबतही मौन बाळगण्यात आले आहे.” दिल्ली भाजपाचे प्रवक्ते प्रवीण शंकर कपूर म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांना, विशेषत: राम मंदिराच्या बांधकामानंतर मिळत असलेल्या पाठिंब्यामुळे ते घाबरले असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. यामुळेच लक्ष वेधण्यासाठी म्हणून त्यांनी रामराज्य बजेटसारखे शब्द वापरले आहेत.”

हेही वाचा : मध्य प्रदेश भाजपात मोठे फेरबदल, काय आहे भाजपाचा मास्टरप्लॅन?

भाजपाच्या आणखी एका नेत्याने सांगितले की, “आप हिंदू मतदारांना खूश करण्याचा प्रयत्न करत आहे, पण यामुळे लोकसभा निवडणुकीत मिळणारी थोडी फार मतेही ते गमावतील. कारण त्यांनी सादर केलेल्या रामराज्य अर्थसंकल्पाची तुलना ते राम मंदिराशी करू शकत नाहीत. जर महिला योजनेंतर्गत आप प्रत्येक महिलेला १००० रुपये देत व्होटबँक मजबूत करण्याचा प्रयत्न करत असेल, तर याचा नक्कीच त्यांच्या पक्षाला फायदा होईल. कारण या योजनेचा लाभ १५-१६ लाख महिलांना होईल, पण जर आप हिंदुत्ववादी भूमिका आणि धार्मिक प्रतिमा तयार करण्याचा प्रयत्न करत असेल, तर याचा फायदा त्यांना होणार नाही.