ईडीने आम आदमी पक्षाचे (आप) सुप्रीमो आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिल्लीतील मद्य धोरणातील कथित घोटाळा प्रकरणात यापूर्वी तीन वेळा ईडीने समन्स देऊनही चौकशीस गैरहजर राहिल्यांनातर चौथे समन्स देऊन चौकशीसाठी गुरुवारी हजर राहण्यास सांगितले.

आप आणि दिल्ली सरकार या दोघांकडूनही या वेळीही स्पष्ट संकेत मिळाले होते की, केजरीवाल ईडीसमोर हजर होण्याची शक्यता नाही. गुरुवारी आपचे प्रमुख आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, खासदार राघव चड्ढा व पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस संदीप पाठक यांच्यासह आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी तीन दिवसांच्या गोव्याच्या दौऱ्यावर जात आहेत.

Amol Kolhe on Devendra Fadnavis
Amol Kolhe: “…याचा अर्थ महायुतीचे सरकारच येणार नाही”, देवेंद्र फडणवीसांचे नाव घेत अमोल कोल्हेंची सूचक टिप्पणी!
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
maharashtra assembly election 2024 ncp participation in power was certain with shinde rebellion ajit pawar
शिंदे यांच्या बंडाच्या वेळीच राष्ट्रवादीचाही सत्तेत सहभाग निश्चित; अजित पवार यांचा गौप्यस्फोट
Ranveer Singh not allowed to walk into my office and say he wants to be Shaktimaan
रणवीर सिंहला ऑफिसमध्ये ३ तास वाट का पाहायला लावली? मुकेश खन्ना म्हणाले, “मी त्याला थांबायला भाग…”
Eknath Shinde allegation regarding Mahavikas Aghadi manifesto Jalgaon news
महाविकास आघाडीने जाहीरनामा चोरला; एकनाथ शिंदे यांचा आरोप
Uddhav Thackeray criticized Eknath Shinde
“माझी बॅग तुझ्याकडे देतो, फक्त त्यातले कपडे…”; उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं!
nawab malik
नवाब मलिक यांचा जामीन रद्द करा ,मागणीसाठी उच्च न्यायालयात याचिका; जामिनाच्या अटींचे उल्लंघन केल्याचा दावा
congress mp abhishek manu singhvi remarks on cji chandrachud
चंद्रचूड यांच्या कार्यकाळात सत्तासंघर्षाचा निकाल लांबणीवर पडणे अतर्क्य ; सिंघवी

बुधवारी दिल्लीतील एका कार्यक्रमात, केजरीवाल यांना पत्रकारांनी ईडीच्या चौथ्या समन्सबद्दल विचारले असता, ते म्हणाले, “कायद्यानुसार जे काही करणे आवश्यक आहे, ते आम्ही करू.”

यापूर्वी दिल्लीचे मंत्री सौरभ भारद्वाज यांनीही असेच मत व्यक्त केले. “ते जे काही करतील, ते कायद्यानुसार आणि कायदेशीर सल्लागारांच्या सल्ल्यानुसारच करतील,” असे भारद्वाज यांनी सांगितले.

राज्यसभा निवडणुका आणि प्रजासत्ताक दिनाच्या तयारीचा हवाला देत, केजरीवाल यांनी ३ जानेवारीला तिसऱ्यांदा ईडीसमोर हजर राहण्यास नकार दिला होता. मुख्यमंत्र्यांनी ईडीच्या कृतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यापूर्वी आप प्रमुखांना ईडीने गेल्या वर्षातील २ नोव्हेंबर आणि २१ डिसेंबर रोजी हजर राहण्यास सांगितले होते. या दोन्ही वेळेला ते चौकशीला गैरहजर होते.

ईडीने केलेल्या चौकशीनंतर केजरीवाल यांना अटक होण्याची भीती ‘आप’ने वारंवार व्यक्त केली आहे. केजरीवाल यांना आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारापासून रोखण्यासाठी भाजप केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करीत असल्याचा आरोप आप पक्षाने केला आहे.

माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, राज्यसभा खासदार संजय सिंह व विजय नायर यांच्यासह केजरीवाल यांच्या आपच्या सहकार्‍यांना यापूर्वीच दिल्ली मद्य धोरण प्रकरणात अटक करण्यात आली होती. अनेक महिन्यांपासून हे सर्व मंत्री न्यायालयीन कोठडीत आहेत.

चंदिगड येथील महापौरपदाची निवडणूक

गुरुवारी होणार्‍या चंदिगड महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपाचा सामना करण्यासाठी आप आणि काँग्रेस एकत्र आले आहेत.

या वेळच्या महापौरपदाच्या निवडणुका महत्त्वाची भूमिका निभावणार आहेत. भाजपा गेल्या आठ वर्षांपासून ही महापौरपदाची निवडणूक जिंकत असल्यामुळे दोन विरोधी पक्ष म्हणजे आप आणि काँग्रेस त्यांच्या पहिल्याच कसोटीत कसे प्रदर्शन करतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय पातळीवर भाजपाचा सामना करण्यासाठी २८ विरोधी पक्षांनी मिळून इंडिया ब्लॉकची स्थापना केली आहे.

चंदिगड महापौरपदाच्या निवडणुकीसाठी आप – काँग्रेस यांच्यात झालेल्या करारानुसार, आप महापौरपदासाठी लढत आहे; तर कॉंग्रेस उपमहापौरपदांसाठी लढत आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पवनकुमार बन्सल आणि आपचे नेते राघव चढ्ढा यांनी मतदानाच्या पूर्वसंध्येला परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आणि रणनीती निश्चित करण्यासाठी चंदिगडला भेट दिली.

चड्ढा यांनी यापूर्वी सांगितले होते की, चंदिगडच्या महापौरपदाच्या निवडणुकीत इंडिया ब्लॉक ‘स्वीप’ करेल आणि एप्रिल-मेमध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी ते महत्त्वाचे असेल.

चंदिगड महापालिकेत ३५ सदस्यांमध्ये सध्या भाजपचे १४ नगरसेवक आहेत. त्यात माजी पदसिद्ध सदस्य व खासदार किरण खेरदेखील आहेत; ज्यांना मतदानाचा अधिकार आहे.

त्यात आपचे १३; तर काँग्रेसचे सात नगरसेवक आहेत. सभागृहात शिरोमणी अकाली दलाचा एक नगरसेवक आहे.

२०२२ आणि २०२३ मध्ये काँग्रेस मतदानापासून दूर राहिल्यामुळे महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपाचा विजय झाला. महापौरपदासाठी भाजपाने मनोज सोनकर यांना उमेदवारी दिली आहे; तर आपने कुलदीपकुमार टिटा यांना उमेदवारी दिली आहे. वरिष्ठ उपमहापौरपदासाठी भाजपाचे कुलजित संधू आणि काँग्रेसचे गुरप्रीत सिंग गाबी यांच्यात लढत होणार आहे.

उपमहापौरपदासाठी भाजपाने राजिंदर शर्मा; तर काँग्रेसकडून निर्मला देवी यांना उमेदवारी दिली आहे.

सभागृहाच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात दरवर्षी तीन पदांसाठी निवडणुका होतात. यंदा महापौरपद अनुसूचित जाती (एससी) प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आले आहे.

भाजपाने यंदाही आपलेच उमेदवार निवडणूक जिंकतील, असा विश्वास व्यक्त केला आहे.

आसाममध्ये राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा

नागालँडमधील तुलीनंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा गुरुवारी सकाळी आसाममध्ये दाखल झाली. बुधवारी राहुल नागा प्रकरणावर तोडगा काढण्यासंदर्भात बोलले. नागालँडच्या मोकोकचुंग शहरात एका जाहीर सभेला संबोधित करताना राहुल गांधी यांनी ‘नागा शांतता चर्चे’बद्दल सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल करताना ते म्हणाले, “जर तुमच्याकडे उपाय नसेल, तर खोटे बोलू नका आणि तुमच्याकडे उपाय आहे, असे म्हणू नका. तुम्ही म्हणू शकता की, आम्हाला समाधानासाठी काम करावे लागेल आणि आम्ही समाधानासाठी काम करू; पण तुम्ही नागा लोकांशी खोटे बोलू नका.“

२०१५ मध्ये पंतप्रधानांनी नागा बंडखोर गटासोबत केलेल्या कराराचा संदर्भ देत राहुल गांधी म्हणाले, “पंतप्रधानांनी नऊ वर्षांपूर्वी जे वचन दिले होते, ते नागा लोकांसाठी एक पोकळ वचन आहे.” दशकापूर्वीच्या नागा राजकीय समस्येवर तोडगा काढण्यासाठी काँग्रेस कटिबद्ध असल्याचेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा : AI : ‘एआय’ करू शकतो तुमची हॅण्डरायटिंग कॉपी? तुमच्यासाठी ठरू शकते धोकादायक?

देशात वैचारिक युद्ध सुरू असल्याचा दावा करीत काँग्रेस नेत्याने आरोप केला की, आरएसएस आणि भाजपा देशातील विविध संस्कृती आणि धर्मांवर हल्लाबोल करीत आहेत. ते म्हणाले, “भारतीय म्हणून प्रत्येकाने एकमेकांच्या परंपरा, संस्कृती, खाद्य सवयी आणि धार्मिक प्रथा यांचा आदर केला पाहिजे. परंतु, आरएसएस आणि भाजपा त्यांच्यावर हल्ला करीत आहेत आणि त्यांचा अनादर करीत आहेत.