Delhi Assembly Election 2025 Arvind Kejriwal : येत्या काही दिवसांत दिल्ली विधानसभा निवडणुकीचे बिगूल वाजणार आहे. यासाठी सत्ताधारी आम आदमी पार्टीसह भाजपा आणि काँग्रेसनेही जोरदार तयारी सुरू केली आहे. गेल्यावेळी विजयाची हॅट्ट्रीक करणाऱ्या अरविंद केजरीवाल यांच्यासमोर यंदा सत्ता राखण्याचे आव्हान असेल. कारण, त्यांच्या पक्षाला आधीच सत्ताविरोधी लाटेचा सामना करावा लागत आहे. हीच बाब लक्षात घेता, ‘आप’ने पक्षातील ३० टक्के विद्यमान आमदारांचे तिकीट कापण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, २०१३ पासून निवडून आलेल्या डझनभर आमदारांना पुन्हा तिकीट दिले जाणार आहे. सगल चौथ्यांदा ते विधानसभेची निवडणूक लढतील.

‘आप’ने असा निर्णय का घेतला?

आम आदमी पार्टीच्या एका नेत्याने नाव न घेण्याच्या अटीवर सांगितले की, “सलग तीन वेळा सत्तेत राहिल्यानंतर कोणत्याही पक्षाला सत्ताविरोधी लाटेचा सामना करावा लागणं स्वाभाविकच आहे. सलग चौथ्यांदा ज्या उमेदवारांना तिकीट देण्याचा निर्णय घेण्यात आला, सर्वेक्षणात त्यांची निवडून येण्याची शक्यता अधिक आहे.”

स्मृती इराणी दिल्ली विधानसभेची निवडणूक लढवणार? केजरीवालांना शह देण्यासाठी भाजपाचा प्लान काय? (फोटो सौजन्य पीटीआय)
Delhi Elections 2025 : स्मृती इराणी दिल्ली विधानसभेची निवडणूक लढवणार? केजरीवालांना शह देण्यासाठी भाजपाचा प्लान काय?
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Ravindra Chavan talk on local body elections in exclusive interview with Loksatta
‘शक्तिशाली’ भारतासाठी ‘बलशाली’ भाजप आवश्यक
scheme for unemployed youth promises rs 8500 per month
सत्तेत आल्यास सुशिक्षित बेरोजगारांना दरमहा ८५०० रुपये : काँग्रेस
Image Of Ramdas Athawale
Ramdas Athawale : रामदास आठवलेंचा पक्षही दिल्लीच्या मैदानात, विधानसभा निवडणुकीसाठी जाहीर केले १५ उमेदवार
ec hearing against district collector dr sachin ombase for obstructing election process
लोकसभा निवडणुकीत जिल्हाधिकार्‍यांचा सावळा गोंधळ; निवडणूक आयोगाकडून दखल; जिल्हाधिकार्‍यांची सुनावणी
अयोध्येतील पराभवाचा बदला घेण्यासाठी भाजपाने उत्तर प्रदेशात कोणती रणनीती आखली? (फोटो सौजन्य पीटीआय)
Uttar Pradesh Election : अयोध्येतील पराभवाचा बदला घेण्यासाठी भाजपाने उत्तर प्रदेशात कोणती रणनीती आखली?
Image Of Ramesh Bidhuri.
आधी मंत्रिपद हुकले आता उमेदवारी रद्द होण्याची शक्यता; प्रियांका गांधी, अतिशींविरोधातील वादग्रस्त विधाने रमेश बिधुरींना भोवणार?

हेही वाचा : Mahila Samman Yojana : वित्त विभागाच्या चिंतेला न जुमानता दिल्ली सरकार महिलांना २१०० रुपये का देणार?

‘आप’चे दिल्लीचे संयोजक आणि बाबरपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार गोपाल राय यांना देखील पुन्हा निवडणुकीचे तिकिट मिळणार आहे. “सलग चौथ्यांदा पक्षाने माझ्यावर विश्वास दाखविल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे”, असे गोपाल राय यांनी द इंडियन एक्सप्रेसला सांगितले. ते म्हणाले की, “माझा मतदारसंघ ईशान्य दिल्लीत येतो, जो दाट लोकवस्तीचा परिसर असून तिथे विकासाची गरज आहे. आम्ही अनेक विकासकामे सुरू केली असून काही कामे पूर्ण झाली आहेत. आम आदमी पार्टी नेहमी केलेल्या कामाच्या आधारे मतं मागते. यावेळीही लोक मला निवडून देतील, अशी मी आशा करतो.”

कुणाकुणाला मिळाली चौथ्यांदा उमेदवारी?

दरम्यान, आमदार गोपाल राय आणि अरविंद केजरीवाल यांच्या व्यतिरिक्त चौथ्यांदा विधानसभेची निवडणूक लढवणाऱ्या नेत्यांमध्ये सौरभ भारद्वाज (ग्रेटर कैलाश), सोमनाथ भारती (मालवीय नगर), इम्रान हुसेन (बल्लीमारन), सत्येंद्र जैन (शकूर वस्ती), जर्नेल सिंग (टिळक नगर), सोम दत्त (सदर बाजार), विशेष रवी (करोल बाग), दिनेश मोहनिया (संगम विहार) आणि संजीव झा (बुरारी) यांच्या नावाचा समावेश आहे. गेल्या निवडणुकीत संजीव झा यांनी बुरारी विधानसभा मतदारसंघातून तब्बल ८८ हजार मताधिक्यांनी विजय मिळवला होता.

माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि उपसभापती राखी बिर्ला यांनाही कायम ठेवण्यात आले आहे. मात्र, त्यांच्या जागा बदलण्यात आल्या आहेत. सिसोदिया हे जंगपुरा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढतील. तर बिर्ला यांना मंगोलपुरी ऐवजी मादीपूर विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानात उतरवलं जाणार आहे.

दिल्ली विधानसभेसाठी ‘आप’चा प्लान काय?

आम आदमी पार्टीच्या एका नेत्याने सांगितले की, “कथित मद्य घोटाळा प्रकरणात अरविंद केजरीवाल यांना अटक झाली, तेव्हा पक्षाने सप्टेंबरमध्ये फीडबॅक सर्वेक्षण सुरू केले होते.” तर दुसरा नेते म्हणाले की, “नेत्याच्या लोकप्रियतेचे मूल्यांकन करण्यासाठी आम्ही घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले. याशिवाय बूथ पातळीवरूनही अभिप्राय गोळा केला. यामुळे नेत्यांनी आपापल्या भागात काय काम केले, त्यांच्या विजयाच्या शक्यता आणि लोकांबरोबर संबंध कसा आहे, याचे मूल्यांकन करण्यात आम्हाला खूप मदत झाली.”

हेही वाचा : Delhi Election 2025 : दिल्लीत भाजपाची उमेदवार आणि नेता निवडीत चालढकल? काय आहेत समीकरणं?

पक्षाच्या आणखी एका नेत्याने असंही सांगितले की, विद्यमान आमदारांना फक्त सत्ताविरोधी लाटेमुळे हटवण्यात आले, किंवा त्यांचे मतदारसंघ बदलण्यात आले. सूत्रांनी सांगितले की, अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनंतर आम आदमी पार्टीने त्यांच्या नेत्यांची लोकप्रियता, वरिष्ठ नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांशी असलेले संबंध तसेच कार्यक्रम व आंदोलनांमधील त्यांच्या उपस्थिती देखील विचारात घेतली. याशिवाय मागील तीन निवडणुकांमधील नेत्यांची सोशल मीडियावरील उपस्थिती, मतांचा वाटा आणि विजयाचे अंतर देखील विचारात घेण्यात आले.”

‘आप’कडून सर्व उमेदवारांची घोषणा

दरम्यान, आम आदमी पार्टीने दिल्लीतील सर्व ७० जागांवर आपले उमेदवार जाहीर केले आहेत. तर काँग्रेसने आतापर्यंत २१ उमेदवारांची घोषणा केली आहे. दुसरीकडे भाजपाने मात्र अद्याप एकाही उमेदवाराचे नाव जाहीर केलेले नाही. राजधानी दिल्लीत पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्यामुळे ‘आप’ सत्ता राखण्यात यशस्वी होणार की भाजपा बाजी मारणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Story img Loader