Delhi Elections 2025 : दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी अवघे काही तास शिल्लक असताना भाजपाला मोठा बूस्टर डोस मिळाला. अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीतील आठ विद्यमान आमदारांनी भाजपात प्रवेश केला. महत्त्वाची बाब म्हणजे ‘आप’ला राम राम ठोकणाऱ्या आठपैकी सात आमदारांचं तिकीट पक्षानं कापलं होतं. मात्र, या आमदारांनी पक्ष सोडताना राज्यातील वाढता भ्रष्टाचार आणि पक्षांतर्गत लोकशाहीच्या अभावाची कारणं दिली. इतकंच नाही, तर त्यांनी अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आणि तत्त्वांपासून दूर गेल्याचा आरोपही केला.

२०२० च्या विधानसभा निवडणुकीत या आठही आमदारांनी ‘आप’च्या तिकिटावर दणदणीत विजय मिळवला होता. मात्र, सत्ताविरोधी लाटेचा सामना करणाऱ्या केजरीवालांनी यंदाच्या निवडणुकीत त्यांना तिकीट नाकारलं. पक्षाच्या या निर्णयामागे आमदारांबद्दलची नाराजी आणि विरोधकांचे आरोप, अशी कारणं देण्यात आली. तिकीट न मिळाल्यानं पक्ष सोडून गेलेले कस्तुरबा नगरचे विद्यमान आमदार मदन लाल म्हणाले की, ‘आप’ने २० विद्यमान आमदारांना निवडणुकीचं तिकीट नाकारलं आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत आणखी तीन आमदार पक्षाला सोडचिठ्ठी देऊ शकतात.

AAP
Delhi Election : ‘आप’मधून बाहेर पडलेल्या ८ आमदारांचा भाजपामध्ये प्रवेश, कालच सोडला होता पक्ष
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Delhi Assembly Elections 2025 Seven AAP MLAs resign
‘आप’च्या सात आमदारांचे राजीनामे; पक्ष नेतृत्व विचारसरणीपासून दूर जात असल्याचा आरोप
question arises if the second term of election wasted former corporators and aspirants
दुसरी टर्मही वाया जाणार ? निवडणुकांवरची सुनावणी लांबल्याने अनेकांच्या पोटात गोळा
Ajit Pawar On Mahayuti Politics
Ajit Pawar : राज्याला तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार? संजय राऊतांच्या दाव्यावर अजित पवारांचं चार शब्दांत उत्तर; म्हणाले…
Chandrashekhar Bawankule statement on Criteria for opposition leaders to join ruling party
सत्ताधारी पक्षात प्रवेशासाठी विरोधी पक्षातील नेत्यांसाठी ‘हे’ निकष… चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले…
भाजपाने दिल्ली विधानसभा निवडणुकीत फेसबुकवरील जाहिरातींवर किती रुपये खर्च केले? (फोटो सौजन्य पीटीआय)
भाजपाने दिल्ली विधानसभा निवडणुकीत फेसबुकवरील जाहिरातींवर किती रुपये खर्च केले?
response on loksatta editorial
लोकमानस : विलंब, नाराजीनाट्यांची मालिका

भाजपाकडून आमदारांच्या निर्णयाचं स्वागत

पक्षातून राजीनामा दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी आठही आमदारांनी शनिवारी भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व दिल्लीचे प्रभारी बैजयंत पांडा यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला. या आमदारांचे स्वागत करताना पांडा म्हणाले, “हा एक ऐतिहासिक दिवस ​​आहे. कारण- हे आठही आमदार ‘आपत्ती’ पक्षातून बाहेर पडले आहेत.” दरम्यान, ‘आप’मधून बाहेर पडलेल्या काही आमदारांनी सांगितले की, निवडणुकीचं तिकीट मिळेल या आशेनं त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत वाट पाहिली. परंतु, अंतिम मुदत संपल्यानंतर आठही आमदारांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला.

आणखी वाचा : UCC Marriage Law : समान नागरी कायद्याअंतर्गत ‘या’ व्यक्तींबरोबर करता येणार नाही लग्न; नेमक्या अटी काय?

आपला सोडचिठ्ठी देणारे आठ आमदार कोण?

भाजपात प्रवेश करणाऱ्या आमदारांमध्ये कस्तुरबा नगरचे ६८ वर्षीय आमदार मदन लाल यांचा समावेश आहे. त्यांनी २०१३, २०१५ व २०२० मध्ये सलग तीन विधानसभा निवडणुकांत कस्तुरबा नगर मतदारसंघातून विजयाची हॅट्ट्रिक केली आहे. ‘आप’मध्ये सामील होण्यापूर्वी मदन लाल हे साकेत बार असोसिएशनच्या संस्थापक सदस्यांपैकी एक होते. ‘आप’नं सलग तीन वेळा आमदार राहिलेल्या मदन लाल यांचं तिकीट कापलं आणि भाजपामधून पक्षात आलेल्या रमेश पहेलवान यांना उमेदवारी दिली. आपल्या राजीनामा पत्रात, मदन लाल म्हणाले की, त्यांचा केजरीवाल आणि पक्षावरील विश्वास उडाला आहे.

इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना लाल यांनी, “माझ्याबरोबर इतर आठ आमदारांनी आपला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला. कारण- दिल्लीतील भ्रष्टाचार संपवण्यासाठी स्थापन झालेला पक्ष स्वतः भ्रष्टाचारात गुंतलेला आहे. पक्षानं माझ्यासारख्या प्रामाणिक कार्यकर्त्याला डावलून गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीला उमेदवारी दिली”, असा आरोप केला आहे. आम आदमी पार्टीनं २० पेक्षा जास्त विद्यमान आमदारांना तिकिटं दिलेली नाहीत. ज्यांना त्यांनी तिकिटं दिली आहेत, ते जिंकणार नाहीत. त्यांनी पैशाच्या बदल्यात तिकिटं दिली आहेत आणि आम्हाला कोणत्याही पक्षाचा भाग व्हायचं नाही, असंही ते म्हणाले.

नरेश यादव, मेहरौली विधानसभा मतदारसंघ

नरेश यादव (वय ५२) यांनी मेहरौली मतदारसंघातून सलग दोन वेळा विजय मिळवला आहे. २०१५ च्या निवडणुकीत त्यांनी १६ हजार ५०० मतांनी विजय मिळवला होता. २०२० मध्ये पुन्हा १८ हजारांहून जास्त मतांनी विजय मिळवला. नरेश यादव २०१३ मध्ये ‘आप’मध्ये सामील झाले होते, त्यापूर्वी ते वकील होते. गेल्या डिसेंबरमध्ये पंजाबच्या एका न्यायालयाने २०१६ च्या कुराण अपवित्रतेच्या प्रकरणात यादव यांना दोषी ठरवून दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली.

त्यानंतरही २०२० मध्ये अरविंद केजरीवाल यांनी त्यांना विधानसभेची उमेदवारी दिली. परंतु, आता त्यांची जागा २०२२ मध्ये ‘आप’मध्ये सामील झालेले माजी काँग्रेस नेते महेंद्र चौधरी यांनी घेतली आहे. “मी अण्णांच्या आंदोलनाच्या काळापासून पक्षासोबत आहे. सुरुवातीला अरविंद केजरीवाल यांची विचारसरणी प्रामाणिक होती; परंतु आता संपूर्ण पक्षच भ्रष्ट झाला आहे. आमदारांपासून ते नगरसेवकांपर्यंत सर्व जण भ्रष्टाचारात बुडाले आहेत”, अशी टीका नरेश यादव यांनी केली.

यादव म्हणाले, “केजरीवाल यांच्या विनंतीवरून मी निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला नव्हता. परंतु, त्यांनी माझ्या जागी काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या व्यक्तीला उमेदवारी दिली. माझ्याविरुद्ध उच्च न्यायालयात काही खटले प्रलंबित होते. केजरीवालजींनी मला सांगितले होते की, जर मी निवडणूक लढवली, तर पक्षाची मुस्लिम मतं कमी होतील. त्यांच्या विनंतीला मान देऊन मी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आणि प्रामाणिक उमेदवाराला तिकीट देण्याची विनंती केली. मात्र, त्यांनी दुसऱ्या पक्षातील एका व्यक्तीला उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला, जो नेहमी ‘आप’च्या विरोधात काम करीत होता.”

भूपिंदर सिंह जून, बिजवासन विधानसभा मतदारसंघ

२०१८ मध्ये आपमध्ये सामील होण्यापूर्वी बिजवासनचे आमदार भूपिंदर सिंह जून हे वकील होते. २०२० मध्ये त्यांनी भाजपातून आम आदमी पार्टीत प्रवेश केला होता. ७१ वर्षीय जून यांनी विधानसभा निवडणुकीत ७५३ मतांनी विजय मिळवला होता. २०२० च्या निवडणुकीत हा सर्वांत कमी मताधिक्याने मिळालेला विजय होता. यंदाच्या निवडणुकीत ‘आप’नं त्यांचं तिकीट कापलं असून, सुरेंद्र भारद्वाज यांना उमेदवारी दिली आहे.

“माझ्या कामगिरीमुळे प्रजा फाउंडेशननं मला सर्वोत्तम आमदार म्हणून निवडलं; परंतु पक्षानं माझ्या जागी लैंगिक छळाचे आरोप असलेल्या गुन्हेगाराला निवडणुकीचं तिकीट दिलं,” असा आरोप भूपिंदर सिंह यांनी दी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना केला. “तिकिटांचं वाटप करणाऱ्या ‘आप’च्या टीममध्ये गुन्हेगारांचा समावेश आहे. दुर्गेश पाठक यांच्यावर दारू घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यात भ्रष्टाचार झाला होता. मी माझ्या मतदारसंघातील अनेक मुद्दे उपस्थित केले होते, ज्यामुळे केजरीवाल नाराज झाले आणि त्यांनी मला तिकीट नाकारले”, असंही जून म्हणाले.

रोहित कुमार मेहरौलिया, त्रिलोकपुरी मतदारसंघ

२०११ मध्ये झालेल्या भ्रष्टाचारविरोधी चळवळीतून मेहरौलिया यांना आम आदमी पार्टीत प्रवेश केला होता. ४८ वर्षीय दलित नेते २०२० च्या विधानसभा निवडणुकीत त्रिलोकपुरी या राखीव मतदारसंघातून विजयी झाले होते. यावेळी मात्र, त्यांच्या जागी आप कार्यकर्त्या अंजना परचा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आपल्या राजीनामा पत्रात मेहरौलिया म्हणाले, “मी माझी नोकरी सोडली आणि अण्णा हजारे यांच्या आंदोलनादरम्यान तुम्हाला (केजरीवाल) साथ दिली. तुम्ही माझ्या समुदायाला समान दर्जा आणि सामाजिक न्याय देऊन, बाबासाहेबांचे स्वप्न पूर्ण कराल, अशी मला आशा होती. परंतु, तुम्ही आमचा (दलितांचा) वापर फक्त मतपेढीसाठी केला.”

भावना गौर, पालम विधानसभा मतदारसंघ

पालम मतदारसंघातून दोन वेळा आमदार राहिलेल्या ५४ वर्षीय भावना गौर २०१२ मध्ये ‘आप’मध्ये सामील झाल्या होत्या. २०१३ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी भाजपाचे उमेदवार धर्मदेव सोलंकी यांच्याविरोधात निवडणूक लढवली. मात्र, या निवडणुकीत गौर यांचा पराभव झाला. त्यानंतर २०१५ आणि २०२० च्या विधानसभा निवडणुकीत गौर यांनी ३० हजारपेक्षा जास्त मताधिक्याने विजय मिळवला. मात्र, आगामी निवडणुकीत पक्षानं त्यांना तिकीट नाकारलं आणि जोगिंदर सोलंकी यांना उमेदवारी दिली. माझा अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पार्टीवरील विश्वास उडाला आहे, असं भावना गौर यांनी आपल्या राजीनामा पत्रात म्हटलं.

हेही वाचा : बलात्काराच्या आरोपांवरून काँग्रेसच्या खासदाराला अटक; कोण आहेत राकेश राठोड?

पवन शर्मा, आदर्शनगर विधानसभा मतदारसंघ

६६ वर्षीय पवन शर्मा यांनी २०१२ मध्ये आम आदमी पार्टीत प्रवेश केला होता. २०१५ मध्ये त्यांनी आदर्श नगरमधून पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढवली आणि २० हजारपेक्षा जास्त मतांनी विजय मिळवला. २०२० च्या निवडणुकीत त्यांनी पुन्हा विजय मिळवला. मात्र, त्यांच्या विजयाचं अंतर फक्त एक हजार ५०० इतकं होतं. यंदाच्या निवडणुकीत ‘आप’नं पवन शर्मा यांना तिकीट नाकारलं आणि त्यांच्या जागी नगरसेवक मुकेश गोयल उमेदवारी दिली. “अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पार्टी त्यांच्या विचारसरणीपासून दूर गेले आहेत”, असा आरोप शर्मा यांनी आपल्या राजीनामा पत्रात केला.

राजेश ऋषी, जनकपुरी मतदारसंघ

राजेश ऋषी हे आम आदमी पार्टीच्या स्थापनेपासूनच पक्षाचे एकनिष्ठ सदस्य होते. त्यांनी २०१३ मध्ये पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढवली होती. मात्र, भाजपा उमेदवाराने त्यांचा दारुण पराभव केला. त्यानंतर २०१५ व २०२० च्या विधानसभा निवडणुकीत राजेश ऋषी यांनी विजय मिळवला. यंदाच्या निवडणुकीत त्यांच्या जागी आता जंगपुराचे आमदार प्रवीण कुमार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यासाठी प्रवीण कुमार यांनी जंगपुराची जागा सोडली आहे. आपल्या राजीनामा पत्रात ऋषी म्हणाले, “अरविंद केजरीवाल यांच्यावर विश्वास ठेवून, मी त्यांना राजकीय पक्ष स्थापन करण्यासाठी मदत केली होती. परंतु, पक्षाचे नेतृत्व भ्रष्टाचार, घराणेशाही व हुकूमशाहीशी जोडले गेले आहे. मला राजीनामा देताना दु:ख होत आहे.”

गिरीश सोनी, मादीपूर विधानसभा मतदारसंघ

गिरीश सोन (वय ६१ ) हे २०१३ पासून सलग तीन वेळा मादीपूर राखीव मतदारसंघातून निवडून आलेले आहेत. यावेळी पक्षाने त्यांच्या जागी विधानसभेच्या उपसभापती राखी बिडलान यांना उमेदवारी दिली. सत्ताविरोधी लाटेचा हवाला देत पक्षाने सोनी यांना तिकीट नाकारलं. दरम्यान, गिरीश सोनी यांनी आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवरून राजीनामा पत्र शेअर केलं. “आम आदमी पार्टीत बऱ्याच काळापासून सुरू असलेल्या कारवाया टीकेचा विषय होत आहेत. ‘शीशमहल’सारख्या गोष्टी प्रश्नचिन्ह निर्माण करीत आहेत. या सर्व मुद्द्यांमुळे धक्का बसल्याने, मी ‘आप’च्या सर्व जबाबदाऱ्यांवरून राजीनामा देत आहे. आपण खरोखर सामान्य लोक आहोत का?”, असा प्रश्नही सोनी यांनी उपस्थित केला आहे.

Story img Loader