गुजरातमध्ये विधानसभेच्या निडणुका जाहीर झाल्या आहेत. १ आणि ५ डिसेंबर अशा दोन टप्प्यात गुजरातमध्ये मतदान होणार आहे. यंदा भाजपा आणि काँग्रेस शिवाय आम आदमी पक्ष हा नवा पर्याय गुजरातमधील मतदारांपुढे असणार आहे. यासाठी आम आदमी पक्षाकडूनही जोरदार तयारी सुरू आहे. महत्त्वाचे म्हणजे दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आप आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल हे गुजरामध्ये पाच दिवस मुक्कामी होते. या पाच दिवसांत त्यांनी सौराष्ट्र आणि कच्छमध्ये ११ रोडशो केले.

हेही वाचा – Gujarat Election 2022 : भाजपची पहिली यादी जाहीर, ३८ विद्यमान आमदारांना उमेदवारी नाकारली, हार्दिक पटेल यांना मात्र संधी

maharashtra vidhan sabha election 2024 uncle dharmarao baba atram vs nephew ambrishrao atram in aheri assembly constituency gadchiroli print politics news
अहेरीत आत्राम काका-पुतण्यात थेट लढत? अपक्षांमुळे प्रस्थापितांच्या मनात धाकधूक…
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
ECI remove NCP Ajit Pawar Faction Ad
अजित पवारांच्या राष्ट्रवादीची नवी जाहीरात वादात, निवडणूक आयोगाकडून आक्षेप; निवडणुकीच्या तोंडावर नामुष्की
Tiroda Constituency, Vijay Rahangdale,
तिरोड्यात पुन्हा कमळ फुलणार, की तुतारी वाजणार?
navi Mumbai Narendra modi
महायुतीची मतपेरणी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचार सभेत विकास प्रकल्पांवर भाष्य
Vidhan Sabha Elections, Elections Pune City,
विचार करण्याची हीच ती वेळ…
Political Parties in Maharashtra Vidhan Sabha Election 2024
रविवार प्रचारवार; घरोघरी भेटी, गृहनिर्माण संकुलांना भेटी, चौक सभा यांना जोर
election day fun facts election day activities voting activities on Election Day
मतदान दिनाच्या गमतीजमती!

अरविंद केजरीवाल यांनी शुक्रवारी इशूदान गढवी यांची आपच्या मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून घोषणा केल्यानंतर पाच दिवसीय प्रचाराची सुरुवात केली. यावेळी मुख्यत: सौराष्ट्र आणि कच्छच्या भागात त्यांनी ११ रोडशो आणि प्रत्येक मतदारसंघात दोन ते तीन प्रचार सभा घेतल्या. आपने सुरुवातीपासून सौराष्ट्र आणि कच्छमध्ये लक्ष केंद्रीत केले आहे. महत्त्वाचे म्हणजे आपचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार इशूदान गढवी हेदेखील सौराष्ट्रच्या जमखामबालीया येथील आहेत. दरम्यान, यावेळी बोलताना त्यांनी भाजपा आणि काँग्रेसवर जोरदार टीका केली. “कोणताही पक्ष शाळा, रोजगार, वीज, आरोग्य सेवा याबाबत बोलत नाही. मात्र, आम आदमी पक्ष केवळ या मुद्द्यांवर मतं मागत आहे”, अशी प्रतिक्रिया केजरीवाल यांनी दिली.

हेही वाचा – काँग्रेसचे सरकार आल्यानंतर मोदींनी सहकार क्षेत्रावर लावलेले कर रद्द करणार, राहुल गांधी यांचे आश्वासन

२०१७ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला शेतकरी आणि पाटीदार आंदोलनाचा फटका बसला होता. त्यावेळी सौराष्ट्र आणि कच्छच्या १२ जिल्ह्यांमधील ५४ जागांपैकी ३० काँग्रेसला, तर २३ भाजपा आणि एका जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसला विजय मिळाला होता. मात्र, यंदा शेतमालाला चांगला भाव मिळाल्याने या भागातील शेतकरी समाधानी असल्याचे बोलले जात आहे. असे असतानाही आपला या भागात पाटीदार समाजाचे समर्थन मिळत असल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा – ‘भारत जोडो’चा प्रतिसाद पाहून यात्रेसाठी काँग्रेस कार्यकर्त्यांची सहभागासाठी आयत्यावेळी धावपळ

दरम्यान, किनारी भागातील मतदारसंघामध्येही केजरीवाल यांनी जोरदार प्रचार केला. येथील मच्छीमारांनी त्यांनी डिझेवर २५ टक्के सबसिडी, बिनव्याजी कर्ज, एमएसपी, घरकूल योजनेंतर्गत घरे आणि अपघातात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच केजरीवाल यांनी मोरबी येथील वांकानेर येथील सभेत बोलताना झुलता पूल कोसळून ज्या १३५ जणांचा मृत्यू झाला होता, या अपघाताला भाजपा जबाबदार असल्याचा आरोप केला.