पंजाबमधील एका महत्वाच्या पोटनिवडणुकीपुर्वी पंजाबमध्ये मोर्चे आणि आंदोलने यांचे प्रमाण फार मोठ्या प्रमाणात वाढले आहे. लिपिक आणि हवालदार पदाच्या भरती प्रक्रियेतील प्रतिक्षा यादीतील उमेदवार, नोकरीत कायम करण्याच्या मागणीसाठी परिचारिका, परिवहन विभागातील कंत्राटी कामगार आणि इतर कर्मचारी संघटना आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरले आहेत. मुख्यमंत्री भगवंत मान यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या संगरूर लोकसभेच्या जागेवर २३ जून रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीपुर्वी पंजाबमधील मान यांच्या सरकारला अनेक धक्के बसले आहेत. यामध्ये पंजाबचे आरोग्य मंत्री विजय सिंगला यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. गायक सिद्धू मुसेवाला यांची हत्या, पंजाब पोलिसांच्या गुप्तचर यंत्रणेवर आरजीपीचा हल्ला, विविध मागण्यांसाठी होत असलेली आंदोलने ही मान सरकारसाठी धोक्याची घंटा आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा