काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा यांनी आजअखेर काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली. अनेक दिवसांपासून ते पक्ष सोडणार असल्याची चर्चा होती. आज काँग्रेस नेते राहुल गांधी मणिपूर येथून भारत जोडो न्याय यात्रेची सुरुवात करीत असतानाच मिलिंद देवरा यांनी पक्ष सोडण्याचा मुहूर्त साधला आहे. काँग्रेसचे खासदार जयराम रमेश यांनी यानिमित्ताने भाजपावर टीका केली. ते म्हणाले, “आजच (१४ जानेवारी) देवरा यांचा शिंदे गटात प्रवेश होणार असल्याचे सांगितले जाते. भारत जोडो न्याय यात्रेवरून लक्ष वळविण्यासाठी भाजपाने हा मुहूर्त साधला आहे.” द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना जयराम रमेश पुढे म्हणाले, “मिलिंद देवरा यांनी २००४ पासून चार वेळा या मतदारसंघातून निवडणूक लढविली. २०१४ आणि २०१९ साली शिवसेनेने या ठिकाणी विजय मिळवल्यामुळे ही जागा उद्धव ठाकरे गटाकडे गेली. त्यामुळे देवरा दक्षिण मुंबई लोकसभेच्या जागेवरून चिंतीत होते.”
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा