ठाणे : ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार संजय केळकर यांच्याविरोधात दंड थोपटत अपक्ष निवडणूक लढविण्याची घोषणा करणारे शिंदे सेनेचे माजी नगरसेवक संजय भोईर आणि माजी महापौर मिनाक्षी शिंदे या दोघांनी शेवटच्या दिवसापर्यंत उमेदवारी अर्ज दाखल केलेले नसल्यामुळे महायुतीमधील बंडखोरी टळली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोळे वाटारत महायुतीचा धर्म पाळण्याचे आदेश दिल्याने या दोघांनी निवडणूक लढायची नाही असा निर्णय घेऊन अर्ज दाखल केलेले नसल्याचे सुत्रांकडून समजते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेले शिंदेच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक संजय भोईर यांनी उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्न सुरू केले होते. दादाचं काम बोलतय असे पोस्टर शहरभर झळकवून त्यांनी या मतदारसंघावर दावाही ठोकला होता. परंतु महायुतीच्या जागा वाटपामध्ये ही जागा भाजपला गेली. या मतदारसंघातून भाजपचे आमदार संजय केळकर हे दोनदा निवडून आले आहेत. त्यामुळे या मतदारसंघाची जागा महायुतीच्या जागा वाटपामध्ये भाजपच्या वाट्याला गेली आणि भाजपने येथे संजय केळकर यांना तिसऱ्यांदा उमेदवारी जाहीर केली. यामुळे भोईर हे नाराज झाले होते. त्याचबरोबर शिंदे सेनेच्या माजी महापौर मिनाक्षी शिंदे यांनीही संजय केळकर यांच्याविरोधात निवडणूक लढविण्याची घोषणा करत बंडखोरी करण्याची तयारी सुरू केली होती. हे दोघे अपक्ष निवडणूक लढण्याच्या निर्णयावर ठाम होते. यामुळे ठाणे शहर मतदारसंघात बंड अटळ मानले जात होते. या बंडामुळे भाजप आणि महायुतीच्या नेत्यांची डोकेदुखी वाढली होती.

हेही वाचा – पुणेकर बंडखोरांना ‘योग्य जागा’ दाखवितात!

शिंदे सेनेच्या नेत्यांकडून ठाणे शहरात बंडाची भाषा होऊ लागताच मतदारसंघाशेजारीच असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघ देण्याची मागणी करत भाजपनेही दबावतंत्राचा अवलंब केला होता. असे असतानाच, कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघात भाजप इच्छुकांनी अपक्ष अर्ज दाखल केले नाहीत. तर, अपक्ष निवडणूक लढविण्याची घोषणा करणारे शिंदे सेनेचे माजी नगरसेवक संजय भोईर आणि माजी महापौर मिनाक्षी शिंदे या दोघांनी शेवटच्या दिवसापर्यंत उमेदवारी अर्ज दाखल केलेले नसल्यामुळे महायुतीमधील बंडखोरी टळली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोळे वाटारत महायुतीचा धर्म पाळण्याचे आदेश दिल्याने या दोघांनी निवडणूक लढायची नाही असा निर्णय घेऊन अर्ज दाखल केलेले नसल्याचे सुत्रांकडून समजते.

हेही वाचा – आता प्रचाराची रणधुमाळी, पुणे जिल्ह्यातील लढतींचे चित्र स्पष्ट; बहुतांश लढती चुरशीच्या

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली आणि त्यांनी महायुतीचा धर्म पाळण्याचे आदेश दिले. त्यांचा शब्द अंतिम मानून निवडणूक लढवायची नाही असा निर्णय घेतला. – संजय भोईर, माजी नगरसेवक, शिवसेना (शिंदे गट)

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: As soon as chief minister eknath shinde gave instructions the rebellion in thane subsided print politics news ssb