लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष प्रचारसभांमध्ये व्यग्र आहेत. हैदराबादच्या जुन्या शहरातील गल्लीबोळांतही जोरदार प्रचार सुरू आहे. ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहाद-उल मुस्लिमीन (एआयएमआयएम)चे हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसीदेखील यंदा जोरदार प्रचार करीत आहेत. “हैदराबाद के अमन को मजबूत करिये, ये आपके बुजुर्गों की कुर्बानीयों का नतीजा है. पतंग के निशान पर वोट डालिए, एक मत का इस्तमाल करिये (हैदराबादमधील शांतता मजबूत करा; जी तुमच्या पूर्वजांच्या बलिदानाचे फळ आहे. एआयएमआयएमच्या पतंग चिन्हाला मतदान करा. प्रत्येक मताचा वापर करा),” असा संदेश ते मतदारांना देत आहेत. तर, दुसरीकडे ओवेसी यांच्या प्रतिस्पर्धी भाजपाच्या उमेदवार माधवी लतादेखील भगवे झेंडे लावलेल्या खुल्या वाहनातून मतदारांपर्यंत पोहोचत आहेत. एआयएमआयएम आणि ओवेसी हे केवळ एका समुदायासाठी काम करीत असल्याचा आरोप करताना दिसत आहेत.

ओवेसी कुटुंबाची हैदराबाद लोकसभा मतदारसंघावर पकड आहे. १९८४ पासून एआयएमआयएमने या जागेवर विजय मिळविला आहे. असदुद्दीन ओवेसी यांचे वडील सुलतान सलाहुद्दीन ओवेसी पहिल्यांदा येथून खासदार झाले. त्यानंतर आणखी पाच वेळा जनतेने त्यांना निवडून दिले. २००४ मध्ये ओवेसी यांनी पदभार स्वीकारला आणि आता सलग पाचव्यांदा खासदार म्हणून निवडून येणे हे त्यांचे लक्ष्य आहे. २०१९ च्या मध्ये त्यांनी भाजपाच्या भगवंतराव पवार यांचा २.८२ लाख मतांनी पराभव केला होता.

Madhukar Kukde returns to BJP after 10 years
तब्बल १० वर्षांनंतर मधुकर कुकडे यांची भाजपात घरवापासी
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Jitu Patwari said cm Shivraj Singh launched Ladli Behan Yojana but payments in mp irregular
‘लाडक्या बहिणींना रक्कम नियमित मिळणार का? कारण मध्य प्रदेशात…’
thane city BJP president JP Nadda, walk out of the Gurdwara
Video : …आणि गुरुद्वारातून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांना काढता पाय घ्यावा लागला
Rahul Gandhi ashok chavan nanded
नांदेडमध्ये राहुल गांधींकडून चव्हाण कुटुंबिय बेदखल !
old womans dead body found in Mutha river police investigation underway
पुणे : मुठा नदी पात्रात ज्येष्ठ महिलेचा मृतदेह, पोलिसांकडून तपास सुरू
Jayant Patil criticizes Mahayuti, corruption, Jayant Patil,
पिंपरी : भ्रष्टाचार करणाऱ्यांना प्रायश्चित्त मिळालेच पाहिजे; जयंत पाटील यांचे विधान
maharashtra assembly election 2024 fight between Rohit Pawar and Ram Shinde will be significant
रोहित पवार-राम शिंदे यांच्यातील लढत लक्षणीय
असदुद्दीन ओवेसी आणि माधवी लता दोघेही प्रचारसभांमध्ये व्यग्र आहेत. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

हेही वाचा : अखिलेश यादवांची प्रतिष्ठा पणाला; गमावलेला गड परत मिळवण्यासाठी झुंज पण मतदारांचा कल भाजपाकडे?

लोकसभेच्या या मतदारसंघातील सात विधानसभा जागांपैकी एआयएमआयएम मागील तीन विधानसभा निवडणुकांत सहा जागा जिंकत आला आहे. गेल्या वर्षीच्या विधानसभा निवडणुकीतही गोशामहल वगळता त्यांनी सर्व जागा जिंकल्या. गोशामहल ही जागा भाजपा नेत्याने जिंकली होती. ओवेसी यांचे बंधू अकबरुद्दीन ओवेसी हे १९९९ पासून सात विधानसभा क्षेत्रांपैकी एक असलेल्या चंद्रयांगुट्टाचे आमदार आहेत.

भाजपा इतिहास घडविणार

राजकीय पदार्पण करीत असलेल्या भाजपाच्या माधवी लता यांनी त्यांच्या भाषणांद्वारे सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. भाजपा इतिहास घडविणार आहे, असे त्या ठामपणे सांगतात. ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला त्यांनी सांगितले की, ओवेसी चिंतेत आहेत. मतदार आता उत्साही, आत्मविश्वासू व निर्भय असल्याचा दावाही त्यांनी केला. “गेल्या ४० वर्षांपासून मतदारांमध्ये, विशेषत: अल्पसंख्याकबहुल भागात भीतीचे वातावरण होते. जेथे अल्पसंख्याक मतदार कमी असतील तेथे ते (एआयएमआयएम) मतदारांवर नियंत्रण ठेवायचे आणि महिलांबद्दल अपमानास्पद भाषादेखील वापरायचे,” असा दावा लता यांनी केला.

मतदानाची टक्केवारी कमी

दोन्ही दावेदारांनी मतदारांना मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन केले आहे. संपूर्ण मतदारसंघात पसरलेल्या १९ लाखांहून अधिक मतदारांच्या मतांची टक्केवारी कमी होत आली आहे. १९८४ मध्ये ७६.७६ टक्के मतदान होते, ते २०१४ मध्ये ५३.३ टक्के व २०१९ मध्ये फक्त ४४.८४ टक्क्यांवर आले.

हैदराबाद जिल्हा काँग्रेस कमिटीचे (डीसीसी) अध्यक्ष मोहम्मद समीर वलीउल्ला हे काँग्रेसचे उमेदवार आहेत. त्यांनी असा आरोप केला आहे की, एआयएमआयएम आणि भाजपा दोघेही जातीय राजकारण करीत आहेत. काही जणांना असेही वाटते की, एआयएमआयएमला ही निवडणूक सहज जिंकता येईल. कारण- पक्षाने गेल्या काही वर्षांत आपल्या कामातून लोकांचा पाठिंबा मिळवला आहे.

लता यांना स्वयंसेवक संघाचा पाठिंबा

शहरातील मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या अध्यक्ष असलेल्या लता यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पाठिंबा आहे. २०१४ व २०१९ मध्ये ओवेसी यांच्याविरोधात निवडणूक लढवणारे हैदराबादचे ज्येष्ठ व्हीएचपी नेते भगवंत राव पवार यांना डावलून यंदा भाजपाने लता यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या प्रचारशैलीने अनेकांची मने जिंकली आहेत; तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही त्यांच्या उमेदवारीला पाठिंबा देणारी पोस्ट टाकल्याचे पाहायला मिळाले आहे. मुस्लीम महिलांसाठीही लता यांनी अनेक कामे केली आहेत. मुस्लीम महिलांविरुद्ध होणार्‍या भेदभावाबद्दल बोलणार्‍या लता म्हणतात की, पसमंदा मुस्लिम महिलांचा मला पाठिंबा आहे.

इंडियन पीपल्स फोरम (यूएई चॅप्टर)चे अध्यक्ष जितेंद्र वैद्य म्हणतात, “त्यांनी हैदराबादमधील भाजपा कार्यकर्त्यांमध्ये यापूर्वी असा उत्साह पाहिला नाही.” माधवी लता यांना निवडून दिले पाहिजे, असे त्यांच्या प्रचारादरम्यान वैद्य म्हणाले. २०१४ मधील ३२.०५ टक्के मतांवरून २०१९ मध्ये २६.९ टक्के मतांपर्यंत भाजपाचा मतसाठा घसरला आहे. त्यामुळे यंदा माधवी लता यांना उमेदवारी दिल्याने काय बदल होतील, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

मतदारसंघातील सामाजिक कार्यकर्ते एस. क्यू. मसूद म्हणतात की, या मतदारसंघातील हिंदूंनी एकत्रितपणे भाजपाला मते देण्याचा निर्णय घेतल्यास भाजपाला मोठ्या प्रमाणात मताधिक्य मिळेल. पण, एआयएमआयएमची मतदारसंघावरील पकड मजबूत असल्याचेही त्यांनी सांगितले. “सध्या ओवेसी यांना भाजपा पराभूत करू शकेल, असे मला वाटत नाही,” असे मसूद म्हणाले.

हेही वाचा : काँग्रेसकडून बंडखोर ‘जी-२३’ गटातील नेत्यांनाही उमेदवारी, कारण काय?

भाजपाच्या परभवाचा इतिहास

हैदराबादमध्ये जवळपास ७० टक्के मतदार मुस्लीम आहेत. त्यातील अधिकाधिक मुस्लीम एआयएमआयएमचे समर्थक आहेत. ज्येष्ठ पत्रकार व माजी आमदार सय्यद अमिनुल हसन जाफरी म्हणतात की, भाजपाचा या जागेवर पराभवाचा इतिहास राहिला आहे. १९९६ मध्ये भाजपाने माजी उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू यांना उमेदवारी दिली होती. त्यांचा ७० हजार मतांनी पराभव झाला होता. २००९ मध्येही भाजपाने टीडीपीबरोबर युती करून जाहिद अली खान यांना उमेदवारी दिली होती. मात्र, त्यांनाही पराभव पत्करावा लागला आणि एआयएमआयएमने आपली हैदराबादची जागा कायम ठेवली आहे.