नांदेड : काँग्रेसचे दिवंगत नेते शंकरराव चव्हाण यांनी पाच दशकांच्या राजकीय कारकिर्दीत संसद आणि राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे प्रतिनिधित्व केले होते. त्यांच्यानंतर त्यांचे पुत्र अशोक चव्हाण यांच्या नावावरही तशी नोंद आता होणार आहे.

काँग्रेस पक्ष आणि आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर अशोक चव्हाण यांनी मंगळवारी दुपारी भाजपामध्ये प्रवेश करून वयाच्या पासष्टीत आपली पुढील राजकीय वाटचाल निर्धोक केली. २०२४ सालची लोकसभा निवडणूक आपण लढवणार नाही, हे त्यांनी काँग्रेसमध्ये असतानाच जाहीर केले होते आणि आता भाजपच्या माध्यमातून त्यांनी राज्यसभेचा सुरक्षित पर्याय स्वीकारत पिताश्रींच्या पावलावर पाऊल टाकले आहे. शंकररावांनी १९८८ साली वयाच्या ६८व्या वर्षी राज्यसभेत पदार्पण केले होते.

Yogi Adityanath who made the statement Batenge to Katenge now has a different slogan Pune news
‘बटेंगे तो कटेंगे’ असे वक्तव्य करणारे याेगी आदित्यनाथ यांचा आता ‘हा’ नारा
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
ECI remove NCP Ajit Pawar Faction Ad
अजित पवारांच्या राष्ट्रवादीची नवी जाहीरात वादात, निवडणूक आयोगाकडून आक्षेप; निवडणुकीच्या तोंडावर नामुष्की
prithviraj chavan congress cm
मविआची सत्ता आल्यास पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असणार? स्वतःच उत्तर देताना म्हणाले…
vidhan sabha elections school holiday
राज्यात १८, १९ नोव्हेंबरला शाळांना सुटी नाही… काय आहे शिक्षण आयुक्तांनी दिलेले स्पष्टीकरण?
yogi Adityanath batenge to katenge
‘बटेंगे तो कटेंगे’, ‘एक हैं तो सेफ हैं’, योगी आदित्यनाथ यांची घोषणा
Hansraj Ahir Rajura Constituency candidate Devrao Bhongle Narendra Modi
मोदींच्या मंचावर माजी केंद्रीय मंत्र्यालाच प्रवेश नाकारला….निमंत्रण दिले, खुर्चीही लावली पण……
Manoj Jarange Patil onMaharashtra Assembly Election 2024
मनोज जरांगे पाटील कुणाच्या बाजूने? उमेदवार मागे घेण्याचे कारण सांगताना म्हणाले…

हेही वाचा – रामटेकमध्ये शिंदे गटाच्या जागेबाबत अनिश्चितता कायम

संसद आणि विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे प्रतिनिधित्व करणारे मराठवाड्यातील एकमेव नेते अशी नोंद शंकररावांच्या नावावर १९९०च्या सुमारास झाली होती. १९८४ ते १९८९ या पाच वर्षांतच त्यांनी लोकसभा-विधान परिषद आणि राज्यसभा या तीन सभागृहांचे प्रतिनिधित्व केले. भारतीय राजकारणात अशी नोंद कोणाच्याही नावावर नसावी, असे मानले जाते.

१९८४ साली लोकसभा सदस्य व केंद्रीय मंत्री झालेल्या शंकररावांना १९८६ साली महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी पाठविण्यात आल्यानंतर या कार्यकाळात त्यांना विधान परिषद सदस्यही स्वीकारावे लागले. पुढे १९८८ साली ते केंद्रात अर्थमंत्री झाले आणि तेथूनच त्यांचा राज्यसभा कार्यकाळ सुरू झाला. २००२ पर्यंत त्यांनी या सभागृहाचे प्रतिनिधित्व केले. शंकरराव १९५७ ते १९८० दरम्यान मुंबई आणि महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य होते. पण तत्कालीन हैदराबाद राज्याच्या विधानसभेतील त्यांचा प्रवेश हुकला होता. १९५१-५२च्या पहिल्या निवडणुकीतच त्यांच्या वाट्याला पराभव आला.

हेही वाचा – जयंत पाटील आणि विश्वजित कदम यांच्याबद्दलचा संशय कायम

अशोक चव्हाण यांची राजकीय कारकिर्द थेट लोकसभेच्या पोटनिवडणुकीतून १९८७ साली सुरू झाली. पण १९८९ साली सार्वत्रिक निवडणुकीत त्यांना पराभवाचा धक्का बसला. त्यानंतर १९९२ ते १९९८ या काळात त्यांना महाराष्ट्र विधान परिषदेत संधी मिळाली. १९९९ ते २०१४ या काळात ते महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य होते. त्यानंतर ते पाच वर्षांसाठी लोकसभेवर गेले आणि २०१९ साली पुन्हा विधानसभेवर निवडून गेले. या सभागृहाच्या सदस्यत्वाचा त्यांनी सोमवारी राजीनामा दिल्यानंतर भाजपात सुरू झालेल्या त्यांच्या नव्या राजकीय पटाची सुरुवात या महिन्यातच राज्यसभेतून होईल. १९८०-९० या दशकात नांदेड जिल्ह्यातून शंकरराव, सूर्यकांता पाटील आणि विठ्ठलराव जाधव या तिघांनी राज्यसभेत प्रतिनिधित्व केले.