कर्नाटक विधानसभा निवडणुकीची घोषणा कोणत्याही क्षणी होऊ शकते. ही निवडणूक जिंकण्यासाठी भाजपाने कंबर कसली आहे. निवडणुकीची घोषणा होण्याआधीच येथे भाजपाने सभांचा धडाका लावला आहे. फक्त कर्नाटकच नव्हे तर इतर राज्यांमधील नेतेमंडळीदेखील कर्नाटकमध्ये सभा घेत आहेत. दरम्यान, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सर्मा यांनी कर्नाटकमधील बेळगावमध्ये बोलताना मोठे विधान केले आहे. राज्यातील सर्व मदरसे बंद करण्याचा माझा प्रयत्न आहे, असे सर्मा म्हणाले आहेत. त्यांच्या या विधानामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >> राहुल गांधींच्या ब्रिटनमधील ‘त्या’ विधानानंतर विरोधक आक्रमक, खासदारकी रद्द करण्याची मागणी!

राज्यातील सर्व मदरसे बंद करण्याचा माझा मानस

“मी आसाम राज्यातील आहे. आपली संस्कृती आणि परंपरांना धोका निर्माण झाला आहे. मी आतापर्यंत ६०० मदरसे बंद केले आहेत. राज्यातील सर्व मदरसे बंद करण्याचा माझा मानस आहे. तुम्ही राज्यातील सर्व मदरसे कसे बंद करू शकता? असे मला विचारले जाते. मी त्यांना सांगतो की, आपल्याला मदरशांची गरज नाही. आपल्याला डॉक्टर, अभियंत्यांची गरज आहे. आपल्याला मदरसे नव्हे तर शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे हवी आहेत,” असे हिमंता बिस्वा सर्मा म्हणाले.

हेही वाचा >> शिंदेंबाबत आजी-माजी प्रदेशाध्यक्षांच्या वादग्रस्त वक्तव्यांवरून भाजपची सारवासारव

सभेत बोलताना त्यांनी काँग्रेस आणि कम्युनिस्टांना लक्ष्य केले. काँग्रेस आणि कम्युनिस्टांकडून इतिहासाची मोडतोड करण्यात येत असून चुकीच्या पद्धतीने तथ्ये मांडली जात आहेत, असे सर्मा म्हणाले. “नव्या भारतात मदरशांची गरज नाही. आपल्याला आपल्या शिक्षण व्यवस्थेत बदल करणे गरजेचे आहे. इतिहास पुन्हा लिहिण्याची वेळ आली आहे. भारत अजूनही सनातनी आणि हिंदू आहे. जोपर्यंत चंद्र आणि सूर्य असेल तोपर्यंत भारत आपल्या परंपरांच्या आधारावरच पुढे जाईल,” असेही हिमंता बिस्वा सर्मा म्हणाले.

हेही वाचा >> ‘भ्रष्ट नेत्यांवरील कारवाईबाबत ममता बॅनर्जींचे दुटप्पी धोरण’; भाजपाची टीका, तर तृणमूलच्या नेत्यांमध्ये नाराजी

दरम्यान, त्यांनी काँग्रेसची मुघलांशी तुलना केली. “पूर्वी मुघलांनी भारताला कमजोर करण्याचा प्रयत्न केला. आता हे काम काँग्रेसकडून केले जात आहे. काँग्रेसचे लोक सध्याचे नवे मुघल आहेत. राम मंदिराबाबत त्यांना आक्षेप आहे. काँग्रेस पक्ष बाबरी मशिदीच्या बाजूने का बोलतो?” असा सवाल हिमंता बिस्वा सर्मा यांनी केला.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Assam chief minister himanta biswa sarma said i intend to shut all madrasas prd