अमरावती : महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही सरकारांमध्ये सहभागी होणारे प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू यांनी या वेळी तिसऱ्या आघाडीचा झेंडा हाती घेतला आहे. सत्ताधारी पक्षात असो किंवा विरोधात, बच्चू कडू हे शेतकरी, शेतमजूर, अपंगांच्या प्रश्नांवर लढताना दिसले. उत्तरार्धात महायुती सरकारशी बिनसल्याने त्यांनी वेगळी चूल मांडली असली, तरी सत्तेचा लाभ मिळवल्याचा आरोप करीत विरोधकांनी त्यांच्या विरोधात रान पेटवले आहे. काँग्रेस, भाजपची व्यूहरचना भेदण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे.

बच्चू कडू यांनी सलग चार वेळा अचलपूर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. २०१९ मध्ये स्थापन झालेल्या महाविकास आघाडी सरकारचा ते भाग होते. नंतर २०२२ साली बच्चू कडू एकनाथ शिंदे गटाबरोबर गेले. एकनाथ शिंदेंसह त्यांनी महायुतीत प्रवेश केला. काही महिन्यांतच महायुतीच्या विरोधात अनेक वेळा भूमिका घेतली. मंत्रीपद न मिळल्याने त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली. अमरावती लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या विरोधात प्रहार जनशक्ती पक्षाचा उमेदवार उभा करून भाजपचा रोष ओढवून घेतला. आता राणा दाम्पत्याने बच्चू कडू यांना खिंडीत गाठण्याचा प्रयत्न चालवला आहे. त्यांच्या विरोधात प्रवीण तायडे हे भाजपचे नवखे उमेदवार आहेत.

khanapur vidhan sabha
सांगली, जत, खानापूरमध्ये बंडखोरी; अन्यत्र आघाडी – महायुती लढत
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
sangli vidhan sabha 2024
बंडखोरीने सांगलीतील तीन लढती लक्षवेधी!
Loksatta lalkilla Assembly elections in Maharashtra BJP campaign
लालकिल्ला: भाजपचा प्रचार करणार कोण?
Vidhan Sabha election 2024, Arvi Constituency,
बंडखोरी शमवण्यासाठी भाजपकडून प्रथमच चार्टर्ड विमानाचा वापर, आर्वीत विद्यमान आमदार घेणार माघार
maharashtra assemly election 2024 Rebellion challenge of Dr Devrao Holi and Ambrishrao Atram for BJP in aheri and gadchiroli Constituency
भाजपपुढे होळी, आत्रामांच्या बंडखोरीचे आव्हान, फडणवीसांच्या भूमिकेकडे लक्ष….
Devendra Fadnavis, Nagpur Devagiri, Nagpur,
नागपूरच्या देवगिरीवर फडणवीसांच्या उपस्थितीत रात्री अडीचपर्यंत बंडखोरांची समजूत घालण्यासाठी प्रयत्न
Kolhapur third alliance
कोल्हापुरात तिसऱ्या आघाडीलाही बंडखोरीचे ग्रहण

हेही वाचा >>>नवाब मलिक वि. अबू आझमी: मानखूर्दमध्ये दोन मुस्लीम नेत्यांच्या लढतीत शिवसेना शिंदे गटाला लाभ मिळणार?

भाजपचे हिंदुत्ववादी बंडखोर उमेदवार प्रमोदसिंह गड्रेल यांच्यामुळे कितपत नुकसान होईल, याची चिंता भाजपला आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला येथून चांगले मताधिक्य मिळाले होते. गेल्या दोन निवडणुकांमध्ये पराभवाची चव चाखणारे काँग्रेसचे बबलू देशमुख पुन्हा मैदानात उतरले आहेत. गेल्या निवडणुकीत कडू यांना ८१, २५२ तर बबलू देशमुख यांना ७२, ८५६ मते मिळाली होती. तर शिवसेनेला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते. भाजपला दशकभरानंतर अचलपुरातून निवडणूक लढण्याची संधी मिळाली आहे.

हेही वाचा >>>त्र्यंबकनगरीत पूजाअर्चेसाठी उमेदवारांची गर्दी वाढली

निर्णायक मुद्दे

● गेल्या चार वर्षांपासून बंद पडलेलेली फिनले मिल, रखडलेले सिंचन प्रकल्प, बेरोजगारी हे मुद्दे या निवडणुकीत चर्चेत आले आहेत. बच्चू कडू यांनी प्रहार जनशक्ती पक्षाचा विस्तार करताना मतदारसंघाकडे दुर्लक्ष केल्याचा विरोधकांचा आक्षेप आहे.

● जातीय-धार्मिक समीकरणे या मतदारसंघात परिणामकारक ठरत आली आहेत. कुणबी, माळी आणि मुस्लीम मते या ठिकाणी निर्णायक आहेत. या मतांच्या विभाजनावर जय-पराजयाचे गणित अवलंबून राहणार आहे.

लोकसभेतील राजकीय चित्र

महाविकास आघाडी – ८३,४१२ महायुती – ७६,६१९