मुंबई : लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या रवींद्र वायकर यांना फक्त २२१ मतांची आघाडी देणाऱ्या अंधेरी पश्चिम मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार अमित साटम यांना यंदा कडव्या आव्हानाला तोंड द्यावे लागणार आहे. गेल्या दोन विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या ज्या अशोक जाधव यांचा मोठ्या फरकाने पराभव केला, तेच यावेळी पुन्हा समोर आहेत. मात्र यावेळची परिस्थिती वेगळी असून शिवसेनेतील फुटीनंतर काँग्रेस आणि शिवसेना (ठाकरे गट) एकत्र असल्याचा फायदा जाधव यांना मिळणार असून तीच साटम यांच्यासाठी डोकेदुखी ठरणार आहे.

२००८ मध्ये झालेल्या मतदारसंघ पुनर्रचनेनंतर अंधेरी पश्चिम मतदारसंघ अस्तित्वात आला. पूर्वीच्या आंबोली विधानसभा मतदारसंघाचे विभाजन होऊन हा नवा मतदारसंघ निर्माण झाला व काँग्रेसचे अशोक जाधव ५९ हजार ८९९ मते मिळवून आमदार बनले. भाजप-सेना युतीत हा मतदारसंघ शिवसेनेकडे होता. परंतु सेनेच्या विष्णू कोरगावकर यांना फक्त २७ हजार ७४१ मते मिळाली. २०१४ मध्ये मोदी लाटेत काँग्रेसच्या जाधव यांचा दणदणीत पराभव झाला. त्यावेळी भाजप व सेना स्वतंत्रपणे लढत असल्याचा फायदा भाजपाला झाला आणि साटम पहिल्यांदा आमदार बनले. त्यावेळी जाधव यांना ३४ हजार ९८२ आणि सेनेच्या जयवंत परब यांना २६ हजार ७२१ मते मिळाली. २०१९ मध्ये युती असल्यामुळे साटम यांच्या मतांमध्ये वाढ होऊन त्यांना ६५ हजार ६१५ मते मिळाली तर जाधव यांना ४६ हजार ६५३ मते मिळाली. यावरून एक मात्र निश्चित आहे की, काँग्रेस शिवसेना (ठाकरे गट) यांची एकत्रित मते साटम यांना विजयापासून दूर नेऊ शकतात. लोकसभेत महाविकास आघाडीच्या उमेदवाराला आघाडी मिळाल्यानंतरच अशोक जाधव अधिक सक्रिय झाले. त्याआधी त्यांचा फारसा संपर्क या मतदारसंघाशी नव्हता. त्यामुळे जाधव यांना मतदारांची कितपत साथ मिळते यावर या साटम यांचे भवितव्य अवलंबून आहे.

Ramesh Chennithala Nana Patole
Congress : बंडखोरांविरोधात काँग्रेस अ‍ॅक्शन मोडवर, मतदानाच्या १० दिवस आधी १६ जण निलंबित
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Will Ramdas Athawale take care of BJP or Republican workers
रामदास आठवले भाजपला सांभाळणार की रिपब्लिकन कार्यकर्त्यांना?
maharashtra assembly election 2024 ravindra dhangekar vs hemant rasane kasba peth assembly constituency
धंगेकर-रासने लढतीच्या दुसऱ्या फेरीत कोणाची बाजी?
Political Parties in Maharashtra Vidhan Sabha Election 2024
रविवार प्रचारवार; घरोघरी भेटी, गृहनिर्माण संकुलांना भेटी, चौक सभा यांना जोर
maharashtra assembly election 2024 uddhav thackeray hoarding
‘प्रकल्प रोखणारे सरकार’ला ठाकरे गटाचे फलकबाजीतून उत्तर
maha vikas aghadi releases manifesto for maharashtra assembly poll 2024
महिला, शेतकऱ्यांवर आश्वासनांची खैरात; मविआचा ‘महाराष्ट्रनामा’ जाहीर
congress mp abhishek manu singhvi remarks on cji chandrachud
चंद्रचूड यांच्या कार्यकाळात सत्तासंघर्षाचा निकाल लांबणीवर पडणे अतर्क्य ; सिंघवी

हेही वाचा >>>पूर्व नागपूरच्या बालेकिल्ल्यात भाजपपुढे प्रथमच आव्हान

या मतदारसंघात ८१ हजार १०० (२८ टक्के) मुस्लिम तर ६७ हजार ८०० (२४ टक्के) मराठी मते आहेत. याशिवाय गुजराती-मारवाडी ४१ हजार ७०० तर उत्तर भारतीय ४१ हजार १०० मते आहेत. याशिवाय २७ हजार दक्षिण भारतीयांची मते आहेत. यापैकी बरेचसे मतदार हे उच्चभ्रु, उच्च मध्यमवर्गीय वस्तीत राहतात. मतदार करण्यात फारसे उत्साही नसतात. याउलट येथे मोठ्या संख्येने इंदिरा नगर, कपासवाडी, गावदेवी आदी झोपडपट्टीचा परिसर असून तो हमखास मतदानाला उतरतो. त्याचाच फायदा महाविकास आघाडीच्या उमेदवाराला लोकसभा निवडणुकीत झाला होता. यंदाही तशीच स्थिती राहिली तर साटम यांना ही निवडणूक कठीण जाणार आहे.

हेही वाचा >>>कारंजामध्ये मतदारांचे पाठबळ कुणाला?; कार्यकर्ते सतरंज्या उचलण्यासाठीच मर्यादित

गेल्या दहा वर्षांत सक्रिय आमदार म्हणून साटम यांची मतदारसंघात प्रतिमा असून विधीमंडळाच्या उत्कृष्ट संसदपटूचेही ते मानकरी ठरले आहेत. उच्चभ्रु, उच्च मध्यमवर्गीयांच्या सहकारी गृहनिर्माण संस्था, अत्याधुनिक परिसर व्यवस्थापन (एएलएम) या संस्थांच्या माध्यमातून साटम यांनी जोरदार संपर्क जाळे निर्माण केले आहे. या मतांच्या जोरावरच गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना मोठी आघाडी मिळाली होती. परंतु यंदा लोकसभा निवडणुकीत मुस्लिम मतांचे ध्रुवीकरण झाल्याने साटम थोडे धास्तावले आहेत. त्यातच माजी नगरसेवक मोहसीन हैदर यांनी बंडखोरी मागे घेतल्याने मुस्लिम मतांचे विभाजन टळले आहे. त्यामुळेच साटम यांना ही निवडणूक यंदा सोपी नाही, असे जाणकारांना वाटत आहे. मात्र साटम यांनी पुढील पाच वर्षांचा आराखडा तयार केला असून आपणच आमदार असू, याबाबत ते ठाम आहेत.

एकूण मतदार – दोन लाख ८८ हजार १२५ : एक लाख ४८ हजार ८४६ (पुरुष), एक लाख ३९ हजार २७२ (महिला)