पुणे : जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघापैकी सात मतदारसंघात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार आणि अजित पवार यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर सात मतदारसंघात राष्ट्रवादी विरोधात राष्ट्रवादी अशा लढती रंगणार आहेत. जिल्ह्याच्या राजकारणात कोणत्या पवारांचे एकहाती वर्चस्व राहणार, यादृष्टीने या लढतींकडे पाहिले जात आहे.

पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर अजित पवार भाजप-शिवसेना शिंदे पक्षाच्या सरकारमध्ये सामील झाले. त्यावेळी पुणे, पिंपरी-चिंचवडसह ग्रामीण भागातील अनेक आमदार, नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी अजित पवार यांना जाहीर समर्थन दिले. मात्र, लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांना विशेष प्रभाव दाखविता आला नाही. बारामतीत अजित पवारांच्या पत्नीचा पराभव झाला. त्याउलट राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला लोकसभा निवडणुकीत चांगले यश मिळाले. त्यामुळे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये येण्यासाठी अनेकांची चढाओढ सुरू झाली. अजित पवार यांच्याकडील काही आमदारही शरद पवार यांच्या संपर्कात होते. मात्र, त्यांना पक्षात न घेता शरद पवार यांनी नवे उमेदवार दिले आहेत. त्यामुळे अजित पवार विरोधात शरद पवार अशा लढती सात ठिकाणी होणार आहेत.

Akola Washim Assembly Constituency Mahayuti Maha Vikas Aghadi Candidate List
Akola Washim Assembly Constituency : अकोला, वाशीम जिल्ह्यात लढतींचे चित्र अस्पष्ट, अनेक मतदारसंघांमध्ये प्रमुख पक्षांच्या उमेदवारांची प्रतीक्षा; शेवटच्या दोन दिवसांत मोठ्या घडामोडी?
27th Rashibhavishya In Marathi Horoscope Today
27 October Horoscope : अचानक धनलाभ ते‌ वैवाहिक…
assembly elections in Satara the BJP won four seats from the Mahayuti the Sena and the Rashtravadi two seats
साताऱ्यात महायुतीकडून भाजपला चार तर सेना, राष्ट्रावादीला दोन जागा; भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांची माहिती
Fifteen Devla Nagar Panchayat corporators resigned from BJP protesting former president Keda Ahers non candidacy
चांदवड-देवळा मतदारसंघात भाजपला धक्का, केदा आहेर समर्थक १५ नगरसेवकांचे राजीनामे
Congress Latur, constituencies in Latur, Latur latest news,
लातूरमधील सर्व मतदारसंघांवर काँग्रेसचा दावा
aspirant Rejects from Parvati and Pune Cantonment constituencies Srinath Bhimale Dilip Kamble on board
पर्वती, पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघातील इच्छुकांवर फुली? श्रीनाथ भिमाले, दिलीप कांबळे यांची मंडळावर वर्णी
Chinchwad Assembly, Opposition to Jagtap family, BJP,
चिंचवड विधानसभा : जगताप कुटुंबाला भाजपमधून विरोध; माजी नगरसेवकांचा ठराव! म्हणाले तरच आम्ही…
Parvati Assembly Constituency, Madhuri Misal Parvati,
‘पर्वती’मध्ये आमदार मिसाळांची धाकधूक वाढली?

आणखी वाचा-कोकणातून काँग्रेसचा ‘हात’ गायब; रायगड, रत्नागिरी, सिंधूदुर्ग जिल्ह्यांत एकही जागा नाही

अजित पवार यांना स्वत: बारामतीमधून त्यांचे पुतणे, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे युवा नेते युगेंद्र पवार यांचे कडवे आव्हान राहणार आहे. शिरूरमध्ये राष्ट्रवादी अजित पवार पक्षाने शिवसेना ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख माऊली कटके यांना पक्षात घेत उमेदवारी दिली आहे. शेळके यांचे विद्यमान आमदार अशोक पवार यांना आव्हान असणार आहे. इंदापूरमध्ये माजी मंत्री, भाजपने हर्षवर्धन पाटील यांना पक्षात घेऊन शरद पवार यांनी महायुतीला धक्का दिला आहे. इंदापूरमध्ये अजित पवार समर्थक आमदार दत्तात्रय भरणे आणि हर्षवर्धन पाटील अशी लढत होणार आहे. आंबेगाव तालुक्यात अजित पवार यांचे समर्थक दिलीप वळसे पाटील यांना त्यांचे एकेकाळचे सहकारी देवदत्त निकम राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून आव्हान देणार आहेत.

आणखी वाचा-मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आग्रही! धनुष्य की घड्याळ? सिंदखेड राजात युतीचा मजेदार तिढा कायम!

जुन्नर विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे आमदार अतुल बेनके यांच्याविरोधात विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे संचालक सत्यशील शेरकर आहेत. सत्यशील शेरकर काँग्रेसचे उमेदवार होते. मात्र, त्यांना पक्षात घेऊन शरद पवार यांनी उमेदवारी जाहीर केली आहे. शहरातील हडपसर मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे आमदार चेतन तुपे विरोधात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप असा सामाना रंगणार आहे. तर वडगावशेरी मतदारसंघात अजित पवार समर्थक आमदार सुनील टिंगरे यांच्यापुढे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे माजी आमदार बापूसाहेब पठारे यांचे आव्हान असणार आहे. बापूसाहेब पठारे यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली असून शरद पवार यांनी त्यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे या सात ठिकाणी पवार कुटुंबीयांची प्रतिष्ठा पणाला लागली असून या सात लढती राष्ट्रवादीचे जिल्ह्यातील वर्चस्व ठरविणार आहेत.