लोकसत्ता प्रतिनिधी

नागपूर: वारंवार पक्षबदल आणि त्यानुसार विधानसभा मतदारसंघ बदलणारे नेते, अशी ओळख आशीष देशमुख यांची राजकारणात तयार झाली आहे. यावेळी ते सावनेर विधानसभा मतदारसंघांतून भाजपकडून विधानसभा निवडणूक लढवत असून त्यांचा राजकारणातील धरसोडपणा यावेळी त्याना भोवण्याची शक्यता आहे.

What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप; “धनंजय आणि पंकजा मुंडे या दोघांनी माझी जमीन लाटली, आणि..”
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
women are saying no to sex after Trumps win
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर अमेरिकेतील महिलांचा लैंगिक संबंधास नकार; कारण काय? काय आहे 4B चळवळ?
maharashtra assembly election 2024
काँग्रेस अखेर शंभरीपार, अर्जमाघारीनंतर सर्वच पक्षांची अंतिम आकडेवारी आली समोर; वाचा काय आहे नेमकं समीकरण!
Dhananjay Mahadik
Dhananjay Mahadik : धनंजय महाडिक आगीतून फुफाट्यात? महिलांबाबत केलेल्या वक्तव्यावरून माफी मागताना नवं वक्तव्य, म्हणाले…
Narendra modi BHIM UPI Babasaheb Ambedkar
“BHIM UPI चं नाव बाबासाहेबांच्या नावावर”, मोदींचा दावा ठाकरेंच्या शिवसेनेने खोडून काढला? पुरावा देत म्हणाले…

नागपूर जिल्ह्यातील सावनेर विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेस नेते सुनील केदार यांचा बालेकिल्ला मानला जातो. यावेळी ते न्यायालयीन निर्णयामुळे निवडणूक लढवू शकत नसल्याने काँग्रेसने त्यांच्या पत्नी अनुजा केदार यांना उमेदवारी दिली. ही त्यांची पहिलीच निवडणूक. पण त्यांच्याविरुद्ध अनेक निवडणुका लढवण्याचा अनुभव असणारे भाजप नेते आशीष देशमुख लढतीत आहेत.

आणखी वाचा-‘एमआयएम’वर उद्धव ठाकरेंपेक्षा देवेंद्र फडणवीस यांची अधिक प्रखर टीका

मुळात देशमुख आणि केदार कुटुंब काँग्रेसचेच. स्थानिक राजकारणात न पटल्याने देशमुख कुटुबाच्या दुसऱ्या पिढीने म्हणजे आशीष देशमुख यांनी भाजपशी जवळीक केली. भाजपलाही केदार विरूद्ध लढण्यासाठी देशमुखांची गरज होतीच. त्यातूनच सोयीनुसार दोन्ही बाजूंनी पावले टाकली गेली, असे आजवरच्या राजकारणातून दिसून येते.

आशीष देशमुख यांचा राजकीय प्रवास त्याला अपवाद नाही. २००८ ते २०१८ या काळात ते भाजपमध्ये होते. नंतर ते काँग्रेसमध्ये आले.नंतर त्यांनी यापक्षाचा त्याग केला व पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला. पक्ष बदलताना त्यांनी प्रत्येक वेळी विधानसभा मतदारसंघही बदलला २००९ मध्ये ते सावनेरमधून लढले, २०१४ मध्ये काटोल मध्ये लढले, २०१९ मध्ये ते काँग्रेसकडून दक्षिण -पश्चिम नागपूर या मतदारसंघाचे थेट तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात लढले. पराभूत झाले तरी त्यांनी भाजपच्या तोंडाला चांगलाच फेस आणला होता.

आणखी वाचा-महायुतीमध्ये असंतोषाची दरी, बंडखोरीमुळे वाशीम जिल्ह्यात वाद वाढले; कारवाईत पक्षपातीपणा?

देशमुख यांच्या निमित्ताने काँग्रेसला दक्षिण पश्चिममध्ये भाजप विरोधात चांगला नेता मिळाला असे वाटत असतानाच पुन्हा देशमुख यांची पावले भाजपच्या दिशेने वळली. आपण सावनेरमधून निवडणूक लढवणार नाही, असे देशमुख यांनी त्यांच्या भाजप प्रवेशाच्या वेळी जाहीर केले होते. यावेळी उपस्थित प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही देशमुख फक्त पक्षाचे काम करणार असे या कार्यक्रमातच सांगितले होते. नेहमी प्रमाणे अगदी उलट झाले. देशमुख काटोल मतदारसंघात तयारी करू लागले. त्यांनी पक्षाकडे काटोलसाठीच उमेदवारीही मागितली होती. पण ऐन वेळी त्यांना सावनेरची उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे राजकीय समीकरणे बदलली.सावनेरमध्ये देशमुख विरूद्ध केदार अशी पारंपरिक लढत पुन्हा एकदा होऊ घातली.

नेहमीप्रमाणे भाजपने सुनील केदार यांना लक्ष्य करण्यासाठी जिल्हा बँक घोटाळा प्रकरण प्रचाराचा प्रमुख मुद्दा केला. मात्र सुनील केदार रिंगणात नसल्याने आणि हे प्रकरण प्रत्येक निवडणुकीत भाजप काढत असलने प्रभावहीन ठरल्याने भाजप प्रचारासाठी दुसरा मुद्दा शोधत आहे. अनुजा केदार हा नवा चेहरा आहे व त्यांच्या मागे पती सुनील केदार यांची संपूर्ण राजकीय शक्ती उभी असल्याने काँग्रेसची बाजू भक्कम आहे.

आणखी वाचा-खामगावात आकाश फुंडकर – दिलीप सानंद यांच्यात चुरशीची लढत; गटबाजी, मतविभाजन निर्णायक

वारंवार पक्षबदल देशमुखांना भोवणार ?

दुसरीकडे सावनेर – काटोल – नागपूर आणि पुन्हा सावनेर असे मतदारसंघ बदलणारे तसेच वारंवार पक्षबदल करणारे देशमुख अशी प्रतिमा त्यांची मतदारसंघात निर्माण झाली असून ती त्यांच्यासाठी अडचणीची ठरण्याची शक्यता आहे.

Story img Loader