अलिबाग : धैर्यशील पाटील यांच्या भाजप प्रवेशामुळे वाताहत झालेल्या शेकापसमोर पेण विधानसभा मतदारसंघात यंदा अस्तित्वाची लढाई असणार आहे. एकाच वेळी महाविकास आघाडीतील दोन पक्षांचे उमेदवार निवडणूक रिंगणात असल्याने शेकापच्या अडचणी वाढणार आहेत.

पेण विधानसभा मतदारसंघ हा शेकापचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा. २००४, २०१९ चा अपवाद सोडला तर चार दशकांहून अधिक काळ मतदारसंघावर शेकापचे वर्चस्व राहिले आहे. मोहन पाटील सलग पाच वेळा तर धैर्यशील पाटील दोन वेळा या मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले होते. त्यामुळे पुन्हा मतदारसंघा ताब्यात घेण्यासाठी शेकाप प्रयत्नशील असणार आहे.

Loksatta chavadi political drama in maharashtra
चावडी: बंटी पाटील एवढे का संतापले?
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Ajit Pawar warning regarding criticism of Sharad Pawar print politics news
शरद पवारांवरील वैयक्तिक टीका खपवून घेणार नाही; अजित पवार यांचा महायुतीच्याच नेत्यांना इशारा
Assembly Election 2024 Sillod Constituency Challenging Abdul Sattar print politics news
लक्षवेधी लढत: सिल्लोड: सत्तार यांच्यासमोर आव्हानांचा डोंगर?
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप; “धनंजय आणि पंकजा मुंडे या दोघांनी माझी जमीन लाटली, आणि..”
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
Nawab Malik big claims about maharashtra Election
Nawab Malik: शरद पवार आणि एकनाथ शिंदे संपर्कात?, ‘निवडणुकीनंतर काहीही होऊ शकतं’, नवाब मलिक यांचा दावा

हेही वाचा >>>Jalgaon Vidhan Sabha Election 2024 : जळगावमध्ये बंडखोरांवरील कारवाईत भाजपचा दुजाभाव; माजी खासदारास अभय

पेण, सुधागड पाली आणि रोहा तालुक्यातील काही भाग मिळून हा मतदारसंघ तयार झाला आहे. मतदारसंघात ३ लाख ०७ हजार ९७९ मतदारांचा समावेश आहे. यात १ लाख ५४ हजार ६६१ पुरुष, १ लाख ५३ हजार ३१७ महिला तर एका तृतीयपंथी मतदाराचा समावेश आहे. महायुतीकडून भाजपचे विद्यामान आमदार रवींद्र पाटील पुन्हा एकदा निवडणूक रिंगणात आहेत, तर शेकापकडून व्यवसायाने वास्तुरचनाकार असलेल्या अतुल म्हात्रे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून प्रसाद भोईर निवडणूक रिंगणात आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीतील दोन घटक पक्षांचे उमेदवार निवडणूक रिंगणात असणार आहेत.

हेही वाचा >>>‘आम्ही काहीही करू शकतो’, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासमोर मिथुन चक्रवर्तींची मुस्लिमांना धमकी

निर्णायक मुद्दे

● पूर्वी शेकाप आणि काँग्रेस असे दोन प्रमुख पक्ष मतदारसंघात होते. मात्र गेल्या पाच वर्षांत मतदारसंघातील राजकीय समीकरणे बरीच बदलली आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीआधी काँग्रेसच्या रवींद्र ऊर्फ रविशेठ पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे मतदारसंघातील काँग्रेसचे अस्तित्व जवळपास संपुष्टात आले. भाजपकडून निवडणूक लढवून ते आमदारही झाले.

● शेकापच्या धैर्यशील पाटील यांचा त्यांनी पराभव केला होता. पण निवडणुकीनंतर धैर्यशील पाटील हेदेखील शेकापची साथ सोडत भाजपमध्ये दाखल झाले. त्यामुळे मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलली. धैर्यशील पाटील यांच्या भाजप प्रवेशामुळे मतदारसंघात शेकापचे अस्तित्व अडचणीत आले आहे. शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार प्रसाद भोईर यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवल्याने शेकापच्या अडचणी वाढणार आहेत.