अलिबाग : धैर्यशील पाटील यांच्या भाजप प्रवेशामुळे वाताहत झालेल्या शेकापसमोर पेण विधानसभा मतदारसंघात यंदा अस्तित्वाची लढाई असणार आहे. एकाच वेळी महाविकास आघाडीतील दोन पक्षांचे उमेदवार निवडणूक रिंगणात असल्याने शेकापच्या अडचणी वाढणार आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
पेण विधानसभा मतदारसंघ हा शेकापचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा. २००४, २०१९ चा अपवाद सोडला तर चार दशकांहून अधिक काळ मतदारसंघावर शेकापचे वर्चस्व राहिले आहे. मोहन पाटील सलग पाच वेळा तर धैर्यशील पाटील दोन वेळा या मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले होते. त्यामुळे पुन्हा मतदारसंघा ताब्यात घेण्यासाठी शेकाप प्रयत्नशील असणार आहे.
हेही वाचा >>>Jalgaon Vidhan Sabha Election 2024 : जळगावमध्ये बंडखोरांवरील कारवाईत भाजपचा दुजाभाव; माजी खासदारास अभय
पेण, सुधागड पाली आणि रोहा तालुक्यातील काही भाग मिळून हा मतदारसंघ तयार झाला आहे. मतदारसंघात ३ लाख ०७ हजार ९७९ मतदारांचा समावेश आहे. यात १ लाख ५४ हजार ६६१ पुरुष, १ लाख ५३ हजार ३१७ महिला तर एका तृतीयपंथी मतदाराचा समावेश आहे. महायुतीकडून भाजपचे विद्यामान आमदार रवींद्र पाटील पुन्हा एकदा निवडणूक रिंगणात आहेत, तर शेकापकडून व्यवसायाने वास्तुरचनाकार असलेल्या अतुल म्हात्रे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून प्रसाद भोईर निवडणूक रिंगणात आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीतील दोन घटक पक्षांचे उमेदवार निवडणूक रिंगणात असणार आहेत.
हेही वाचा >>>‘आम्ही काहीही करू शकतो’, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासमोर मिथुन चक्रवर्तींची मुस्लिमांना धमकी
निर्णायक मुद्दे
● पूर्वी शेकाप आणि काँग्रेस असे दोन प्रमुख पक्ष मतदारसंघात होते. मात्र गेल्या पाच वर्षांत मतदारसंघातील राजकीय समीकरणे बरीच बदलली आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीआधी काँग्रेसच्या रवींद्र ऊर्फ रविशेठ पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे मतदारसंघातील काँग्रेसचे अस्तित्व जवळपास संपुष्टात आले. भाजपकडून निवडणूक लढवून ते आमदारही झाले.
● शेकापच्या धैर्यशील पाटील यांचा त्यांनी पराभव केला होता. पण निवडणुकीनंतर धैर्यशील पाटील हेदेखील शेकापची साथ सोडत भाजपमध्ये दाखल झाले. त्यामुळे मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलली. धैर्यशील पाटील यांच्या भाजप प्रवेशामुळे मतदारसंघात शेकापचे अस्तित्व अडचणीत आले आहे. शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार प्रसाद भोईर यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवल्याने शेकापच्या अडचणी वाढणार आहेत.