छत्रपती संभाजीनगर : गेल्या पाच वर्षांत मतदारसंघात ‘हम करेसो कायदा’ या आविर्भावात वावरणाऱ्या मंत्री अब्दुल सत्तार यांच्या विरोधात सारेच एकवटले आहेत. भाजपचे नेते रावसाहेब दानवे पराभवाचे उट्टे काढण्यासाठी आतुर झाले आहेत. त्यामुळे भाजपची मंडळी प्रचार करीत नाहीत. शिवसेना (ठाकरे) आणि भाजपच्या कार्यकर्त्यांची येथे पडद्याआडून युती झाली आहे. अशी सारी आव्हाने असताना त्याच्याशी सामना करण्याचे सत्तार यांच्यासमोर मोठे आव्हान आहे.

लोकसभा निवडणुकीमध्ये जालना मतदारसंघातून केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा पराभव झाल्यानंतर गावागावात भाजपचे कार्यकर्ते विरुद्ध सत्तार समर्थक यांच्यामध्ये वाद घडू लागले आहेत. आपल्या कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी एका छोट्याशा गावात स्वत: दानवे यांनी आंदोलनात सहभाग घेतला होता. मतदारसंघात सत्तार यांच्याविरोधी वातावरण करण्यासाठी भाजपचे कार्यकर्तेही कामाला लागले आहेत. आपल्या कृतीचे समर्थन करण्यासाठी ‘प्रथम राष्ट्र, मग पक्ष आणि मग व्यक्तिगत महत्त्वाकांक्षा’ असा विचारधागा थेट देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पत्र लिहून कमलेश कटारिया यांनी कळविल्याने ‘महायुती’मधील बेबनाव स्पष्टपणे समोर आला आहे.

Assembly election 2024  Pen Assembly Constituency Mahavikas Aghadi Election
लक्षवेधी लढत:पेण: शेकापसाठी अस्तित्वाची लढाई
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Loksatta chavadi political drama in maharashtra
चावडी: बंटी पाटील एवढे का संतापले?
Ajit Pawar warning regarding criticism of Sharad Pawar print politics news
शरद पवारांवरील वैयक्तिक टीका खपवून घेणार नाही; अजित पवार यांचा महायुतीच्याच नेत्यांना इशारा
dcm leader of opposition bjp state chief maharstara congress president contest maharashtra assembly election 2024 in vidarbha
Vidarbha Vidhan Sabha Election 2024: विदर्भाच्या राजकीय मैदानात दिग्गजांच्या लक्षवेधी लढती; उपमुख्यमंत्री, विरोधीपक्ष नेते, भाजप, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष रिंगणात
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
Nawab Malik big claims about maharashtra Election
Nawab Malik: शरद पवार आणि एकनाथ शिंदे संपर्कात?, ‘निवडणुकीनंतर काहीही होऊ शकतं’, नवाब मलिक यांचा दावा

हेही वाचा >>>Vidarbha Vidhan Sabha Election 2024: विदर्भाच्या राजकीय मैदानात दिग्गजांच्या लक्षवेधी लढती; उपमुख्यमंत्री, विरोधीपक्ष नेते, भाजप, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष रिंगणात

सिल्लोड मतदारसंघात आता शिवसेनेबरोबर (उद्धव ठाकरे) भाजप कार्यकर्त्यांनी युती केली आहे. ही युती जाहीर झाली तरी बेहत्तर, अशीही भाजप कार्यकर्त्यांची मानसिकता आहे. शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे सुरेश बनकर यांच्या प्रचारात भाजप कार्यकर्तेही लागले आहेत.

निर्णायक मुद्दे

● सत्तार यांनी शपथपत्रात खोटी माहिती दिल्याचा आरोप असून त्यांनी केलेल्या विविध वक्तव्यांमुळे त्यांच्या विरोधात वातावरण निर्माण होत आहे. जमीन हडपण्याचा आरोप असून, त्याचा सर्वसामान्यांना त्रास होत आहे. न्यायालयानेही त्यांच्या कार्यशैलीवर ताशेरे ओढले होते.

● सत्तार यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पाठबळ आहे. या मतदारसंघात मुस्लीम मतदारांची संख्या लक्षणीय आहे आणि ती शिवसेनेच्या पाठीशी उभी राहते का, याचे औत्सुक्य आहे. निवडणुकीमध्ये सत्तार यांची कार्यशैली व वक्तव्ये हेच निर्णयक मुद्दे ठरतील.

हेही वाचा >>>Jalgaon Vidhan Sabha Election 2024 : जळगावमध्ये बंडखोरांवरील कारवाईत भाजपचा दुजाभाव; माजी खासदारास अभय

सत्तारांविरोधी आघाडीला बळ

राजकीय प्रवासात अब्दुल सत्तार यांच्या कार्यशैलीविषयी आणि त्यांच्या वक्तव्याविषयी अनेक वाद निर्माण झाले. मात्र, त्या कार्यशैलीचे आणि वादाचे भांडवल उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला करता आले नाही. भाजपतून शिवसेनेमध्ये अनेक कार्यकर्ते गेले. त्यांनी आता सत्तारविरोधातील आघाडीला बळ द्यायला सुरुवात केली आहे. कोणतेही चिन्ह असले तरी निवडून येईन, एवढा ठाम विश्वास सत्तार यांच्याप्रति असल्याचे उद्गार काढून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सत्तार यांचे तोंडभरून कौतुक केले. पण यंदा परिस्थिती वेगळी आहे.