नवी मुंबई : विधानसभा निवडणुकीत संदीप नाईक यांच्या बंडामुळे विभागलेल्या नवी मुंबईतील भाजपची बेलापूर आणि ऐरोली अशा दोन विधानसभा क्षेत्रात स्पष्ट विभागणी दिसू लागली आहे. बेलापूर विधानसभा मतदारसंघातून निसटत्या मताधिक्याने विजयी होताच आमदार मंदा म्हात्रे यांनी वाशीत पक्षाचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत यांच्या उपस्थितीत जाहीर केलेल्या भाजप सदस्य नोंदणी अभियानाकडे ऐरोलीचे आमदार गणेश नाईक आणि त्यांच्या समर्थकांनी पाठ फिरवली. ऐरोलीतील आपल्या विजयाबद्दल नाईक यांनी ऐरोलीतील आपल्या समर्थक तसेच भाजप कार्यकर्त्यांची एक बैठक खैरणे येथील कार्यालयात घेत पक्ष वाढीसाठी जोमाने कामाला लागा अशा सूचना उपस्थितांना दिल्या. नाईक आणि म्हात्रे यांच्या उघड बेबनावामुळे शहरात भाजपच्या दोन संघटना आहेत की काय असे चित्र निर्माण झाले आहे.

विधानसभा निवडणुकांपुर्वी नवी मुंबई भाजपचे जिल्हाध्यक्षपद हे संदीप नाईक यांच्याकडे होते. मागील वर्षभरात पक्षाचे वेगवेगळे कार्यक्रम संदीप यांनी धडाक्यात राबविले. पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकारणी सदस्यांच्या नव्याने नेमणूका केल्या. या नियुक्त्या करत असताना संदीप यांनी आपल्या समर्थकांना त्यात स्थान दिल्याच्या तक्रारी बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे सातत्याने करत होत्या. बेलापूर विधानसभा क्षेत्रातून भाजपने उमेदवारी नाकारताच नाराज झालेल्या संदीप यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षात प्रवेश केला. हा प्रवेश करत असताना भाजप पदाधिकाऱ्यांची बेलापूर मतदारसंघातील संपूर्ण फळीच त्यांनी पवारांच्या पक्षात नेली. बेलापूरमध्ये भाजपला धक्का देत असताना ऐरोली विधानसभा क्षेत्रातील एकाही पदाधिकाऱ्याला त्यांनी राष्ट्रवादीत घेतले नाही. ऐरोलीत गणेश नाईक यांच्या दिमतीला भाजप संघटन असेल याची पुर्ण काळजी त्यांनी घेतली. संदीप यांच्या या भूमीकेमुळे निवडणुकीनंतर शहर भाजपपुढे एक नवा तिढा निर्माण झाला असून ऐरोली आणि बेलापूर या दोन विधानसभा क्षेत्रात पक्षात दरी दिसू लागली आहे.

Nitin Gadkari on Politics
Nitin Gadkari : “कुणी मुख्यमंत्री झाले नाही म्हणून दु:खी तर कुणाला मुख्यमंत्रीपदावरून…”, राजकीय नेत्यांबद्दल काय म्हणाले नितीन गडकरी?
Eknath Shinde
Eknath Shinde : तुम्ही गृहखातं, विधानसभा अध्यक्षपद मागितलं…
Bharat Gogawale on Eknath Shnde
“…अन् शिंदे म्हणाले, मी सत्तेबाहेर राहून काम करेन”, गोगावलेंनी सांगितल्या शिवसेनेच्या अंतर्गत घडामोडी
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी पुढच्या वर्षी भाऊबीजेपर्यंत वाट पाहावी लागणार? भाजपाने मांडली रोखठोक भूमिका
Sada Sarvankar
Sada Sarvankar : “मला निवडणूक लढवावीच लागेल”, सदा सरवणकर हतबल; म्हणाले, “राज ठाकरेंनी माझी…”
Maharashtra Vidhan Sabha Election Result Live News Update:
Maharashtra Government Formation Live Updates : भाजपाचा गटनेता कधी ठरणार? आमदारांची गटनेते पदाची बैठक कधी होणार? महत्वाची माहिती समोर
Shaina NC Arvind Sawant
Shaina NC : अरविंद सावंत यांची जीभ घसरली; अपशब्द वापरल्याने शायना एन. सी. संतापल्या, म्हणाल्या, “महिलेला…”

हेही वाचा >>>सत्ताधारीच प्रतिस्पर्धी पक्षाचे उमेदवार ठरवतात का ?गायकवाड, शेळकेंच्या आरोपाने नव्या चर्चेला तोंड

सदस्य नोंदणी अभियानाला नाईकांची अनुपस्थिती

बेलापूर विधानसभा मतदारसंघातून ३७७ मतांनी पराभव झालेल्या संदीप यांनी आपला भविष्यातील राजकीय प्रवास कसा राहील याविषयीची भूमीका गुलदस्त्यात ठेवली आहे. नवी मुंबईतील वेगवेगळ्या प्रश्नांसाठी आपला संघर्ष सुरु राहील अशी भूमीका त्यांनी मांडली असली तरी शरद पवार यांच्या पक्षाची राज्यभर झालेली अवस्था पहाता संदीप यांचा पुढचा प्रवास कसा असेल याविषयी त्यांच्या समर्थकांमध्येही उत्सुकता आहे. बेलापूर क्षेत्रात अनेक प्रभागांमध्ये भाजपला मताधिक्य मिळाले. विशेषत: वाशी, सीबीडी बेलापूर, सीवूड सारख्या काही प्रभागांमध्ये भाजप उमेदवार मंदा म्हात्रे यांना आघाडी मिळाली. या मतदारसंघांवर वर्षानुवर्षे वरचष्मा राखणारे माजी नगरसेवक यामुळे अस्वस्थ आहेत. संदीप यांच्यासाठी अहोरात्र मेहनत करुनही भाजपला मिळालेल्या मताधिक्यामुळे काही माजी नगरसेवक अवाक झाले आहेत. या पार्श्वभूमीवर सलग तीनवेळा निवडून आलेल्या मंदा म्हात्रे यांच्या उपस्थितीत पक्षाच्या सदस्य नोंदणी अभियानाला ऐरोलीचे आमदार गणेश नाईक यांच्या अनुपस्थितीची चर्चा आता रंगली आहे. पक्षाचे प्रभारी जिल्हाप्रमुख रामचंद्र घरत यांच्या उपस्थितीत या अभियानाला सुरुवात करण्यात आली. असे असताना एकाच शहरातील दोन आमदारांपैकी एक आमदार या अभियानास उपस्थित नसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. विशेष म्हणजे यानिमीत्ताने आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत घरत यांनी पक्षात कार्यकर्त्यांचे स्वागत आहे, मात्र निवडणुकीवेळी सोडून गेलेल्या नेत्यांना आणि नगरसेवकांना आता प्रवेश नाही अशी भूमीका घेत थेट नाईकांना अंगावर घेतल्याची चर्चा आहे.

हेही वाचा >>>विस्कळीत कारभारामुळे चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेसचा पराभव; ज्येष्ठ नेते आत्मचिंतन करणार का?

भाजपमध्ये काहीही मागायचे नसते. मंत्री नसले तरी माझी कामे झाली आहेत. मी अशीक्षीत आहे, मला दुरदृष्टी नाही अशी टीका माझ्यावर करण्यात आली. माझ्या शिलेदारांना धमक्या दिल्या गेल्या. मी ऐरोलीत पक्षाविरोधात साधा एक फोन केला नाही. मी अनेकांना सांगायचे की दोन्हीकडे ‘कमळा’चे बटन दाबा. ही शिस्त सगळ्यांनी राखायला हवी. निवडणुकीत ज्यांनी ज्यांनी पक्षाची साथ सोडली त्यापैकी कुणालाही पक्षात घेऊ नका असे मी जिल्हाध्यक्षांना सांगितले आहे.- मंदा म्हात्रे, आमदार

नवी मुंबईत दोन लाख सदस्य नोंदणीचे लक्ष्य आखून घेण्यात आले आहे. विधानसभा निवडणुकीत जे लहान कार्यकर्ते दिशाभूल होऊन बाहेर पडले त्यांचे पक्षात स्वागत आहे. मात्र पहिल्या फळीतील नेते आणि माजी नगरसेवकांना पक्षात आता थारा दिला जाणार नाही.- रामचंद्र घरत, जिल्हाध्यक्ष भाजप