Jharkhand Assembly elections Results 2024 : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत भाजप व मित्रपक्षांना प्रचंड बहुमत मिळालं. परंतु, झारखंडमध्ये त्यांना सलग दुसऱ्यांदा पराभव स्वीकारावा लागला. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वात झारखंड मुक्ती मोर्चाने पुन्हा सत्तेत येण्याची किमया करून दाखविली. इतकेच नव्हे तर, गेल्या वेळच्या तुलनेत यंदा मतांमध्ये ९ टक्के (एकूण २३.४ टक्के ) इतकी घसघशीत वाढही केली. भाजपाने सत्तेत येण्यासाठी राज्यात संपूर्ण ताकद लावली होती, मात्र अपयशाने प्रदेशस्तरावरील त्यांच्या नेतृत्वाच्या मर्यादा स्पष्ट झाल्या आहेत. दरम्यान, महाराष्ट्रातील निवडणूक एकहाती जिंकणाऱ्या भाजपाची झारखंडमध्ये इतकी फजिती का झाली? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. स्वत: भाजपाच्या नेत्यांनी पराभवाची ५ प्रमुख कारणं सांगितली आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, झारखंडची राजधानी रांची येथे शनिवारी भाजपा नेत्यांची एक महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस बीएल संतोष, राज्य युनिटचे अध्यक्ष बाबुलाल मरांडी यांच्यासह भाजपाच्या निवडणूक व्यवस्थापन समितीचे सदस्य व सर्व ८१ मतदारसंघाचे प्रभारी उपस्थित होते. बैठकीत सर्वच नेत्यांनी झारखंडमधील भाजपाच्या पराभवाची कारणे बोलून दाखवली.

Delhi election result updates in marathi
‘आप’ची मतपेढी फुटण्यावरच दिल्लीतील निकालाचे गणित?
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Delhi Exit Poll
Delhi Election : “चौथ्यांदा असं घडतंय…”, एक्झिट पोलमधील अंदाज विरोधात असूनही ‘आप’ला का आहे विजयाची खात्री
Rahul Gandhi on Maharashtra election result
राज्याच्या निकालाचे संसदेत पडसाद; निवडणूक आयोगाच्या निष्पक्षतेवर राहुल गांधींकडून शंका
काँग्रेसची ईगल समिती नेमकं कसं काम करणार? कथित मतदार घोटाळ्यांचा छडा लागणार? (फोटो सौजन्य)
Political News : काँग्रेसची ईगल समिती नेमकं कसं काम करणार? कथित मतदार घोटाळ्यांचा छडा लागणार?
delhi assembly elections 2025
लालकिल्ला : दिल्ली भाजपसाठी आणखी प्रतिष्ठेची!
AAP
Delhi Election : ‘आप’मधून बाहेर पडलेल्या ८ आमदारांचा भाजपामध्ये प्रवेश, कालच सोडला होता पक्ष
Bhagwant Mann's Delhi residence
Bhagwant Mann: दिल्लीत मोठी घडामोड; पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या घरावर निवडणूक आयोगाची धाड, ‘आप’चा आरोप

हेही वाचा : Two Child Policy : आंध्र प्रदेशनंतर तेलंगणातही दोन अपत्यांसंदर्भात निर्णय रद्द होणार? दक्षिणेकडील राज्यांना सतावतेय ‘ही’ चिंता

झारखंडमध्ये भाजपाचा दारुण पराभव का झाला?

“राज्यात बांग्लादेशी घुसखोर येत असल्याच्या भाजपाच्या आरोपावर इतर मुद्दे अधिक प्रभावी ठरणे, आदिवासी आणि इतर मागासवर्गीय (OBC) समाजातील नवीन चेहऱ्यांचा अभाव, हेमंत सोरेन सरकारच्या मैय्या सन्मान योजनेचा तसेच इतर कल्याणकारी उपक्रमांचा प्रभाव, राष्ट्रीय नेत्यांवरील निर्भरता आणि पक्षांची फोडाफोडी, ही ५ कारणं निवडणुकीतील पराभवाला जबाबदार आहेत”, असं भाजपा उमेदवारांनी बैठकीत सांगितलं. बैठकीतील चर्चेची माहिती देताना भाजपा नेत्याने सांगितले की, “सर्वच उमेदवारांनी या ५ कारणांना आपल्या पराभवास जबाबदार धरलं आहे. बांग्लादेशी घुसखोरांमुळे राज्यातील लोकसंख्येतील बदल ही समस्या नक्कीच आहे. परंतु ती फक्त संथाल प्रदेशातील १८ जागांपुरतीच मर्यादित आहे. राज्यातील अन्य चार विभागांतील मतदारांच्या मनात निर्माण झालेले स्थानिक प्रश्न भाजपाने अधिक तीव्रतेने मांडले नाहीत. दुसरीकडे झारखंड मुक्ती मोर्चाने आदिवासींच्या प्रश्नांवर अधिक लक्ष केंद्रित केले. स्थानिकांना सरकारी नोकरीत प्राधान्य देणार असल्याचंही मतदारांना सांगितलं. भाजपाने फक्त संथाल परगणाशी संबंधित एकच मुद्दा लावून धरला होता.”

झारखंड मुक्ती मोर्चाची खास रणनीती

झारखंड मुक्ती मोर्चाच्या नेतृत्वात इंडिया आघाडीने सलग दुसऱ्यांदा ऐतिहासिक विजय मिळवत विधानसभेच्या ५६ जागा जिंकल्या. तर भाजपाला केवळ २१ जागांवरच समाधान मानावे लागले. २०१९ च्या निवडणूक भाजपाने २५ जागा जिंकल्या होत्या. यंदा त्यांना ४ जागांचे नुकसान सहन करावे लागले. प्रचारादरम्यान इंडिया आघाडीने आदिवासी अस्मितेवर आपले लक्ष्य केंद्रित केले. दुसरीकडे, आसामचे मुख्यमंत्री आणि झारखंड निवडणूक सह-प्रभारी हिमंता बिस्वा सरमा यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने प्रचारात बांग्लादेशी घुसखोरांचा मुद्दा उचलून धरला.

दरम्यान, निवडणूक निकालानंतर भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस बीएल संतोष यांनी रविवारी झारखंडचा दौरा केला. यावेळी त्यांनी जिल्हाध्यक्ष, निवडणूक प्रभारी आणि पराभूत उमेदवारांची भेट घेतली. सोबतच मित्रपक्षांनी लढवलेल्या १० जागांवरील उमेदवारांसोबतही चर्चा केली. सुदेश महतो यांच्या नेतृत्वाखालील ऑल झारखंड स्टुडंट्स युनियन पक्षाला (AJSU) निवडणुकीत फक्त एका जागेवर विजय मिळवता आला. सुदेश यांचाही सिल्ली विधानसभा मतदारसंघातून दारुण पराभव झाला. या निकालांवर चर्चा करण्यासाठी भाजपाचे नेते AJSU पक्षासोबत स्वतंत्र बैठक घेणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

हेही वाचा : Ajmer Sharif Dargah : पंडित नेहरू ते पंतप्रधान नरेंद्र मोदी, मोठ्या राजकीय नेत्यांचा अजमेर दर्ग्याशी ऋणानुबंध, जाणून घ्या इतिहास

झारखंडमध्ये कोणता फॅक्टर चालला?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बैठकीत मैया सन्मान योजनेची घोषणा आणि वीजबिल थकबाकी माफ करण्याच्या हेमंत सोरेन सरकारचा निर्णय या विषयावरही चर्चा झाली. याशिवाय भाजपा नेत्यांनी पक्षाविरुद्ध भूमिका घेणाऱ्या इतर नेत्यांबद्दल वरिष्ठांकडे तक्रार केली. ते म्हणाले की, पक्षातील बंडखोरीमुळे काही ठिकाणी आपल्या उमेदवारांचा पराभव झाला. भाजप उमेदवारांच्या सूत्रांनी सांगितले की, जयराम महतो यांनी उभ्या केलेल्या आव्हानाचा सामना करण्यासाठी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या पत्नी कल्पना सोरेन यांनी तरुण आदिवासी नेते आणि ओबीसी नेत्यांना पुढे आणले.

दरम्यान, शनिवारच्या सभेला उपस्थित राहिलेल्या एका नेत्याने सांगितले की, “बाबूलाल मरांडी, (माजी मुख्यमंत्री) अर्जुन मुंडा हे तरुण वयातच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री झाले होते. झारखंडच्या जनतेने नेहमीच तरुण नेत्यांवर विश्वास ठेवला आहे. जयराम महतो हे अशाच नेत्यांपैकी एक असून त्यांना भाजपाने कमी लेखले आहे”. दुसऱ्या नेत्याने सांगितले की, “जयराम महतो यांच्या पक्षामुळे १४ विधानसभा मतदारसंघातील निकालांवर परिणाम झाला. ज्यामुळे एनडीएला मोठे नुकसान सहन करावे लागले. स्थानिक उमेदवारांना देखील कल्पना केली नव्हती की, जयराम महतो यांचा पक्षामुळे इतके नुकसान सहन करावे लागले. कारण, त्यांनी अनेक अनोळखी उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते.

हेही वाचा : महायुतीत समन्वयाचा अभाव नाही; ‘मुख्यमंत्री पदाबाबतचा निर्णय मोदी, शहा घेतील’, एकनाथ शिंदे यांचे स्पष्टीकरण

‘भाजपाने स्थानिक नेतृत्वाला कमी लेखलं’

बाबूलाल मरांडी आणि अर्जुन मुंडा यांच्यासारख्या स्थानिक चेहऱ्यांना पुढे करण्याऐवजी हिमंता बिस्वा सरमा, केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान आणि निवडणूक प्रभारी यांच्यावर जास्त अवलंबून राहणे, हे देखील पक्षाच्या पराभवाचं कारण असल्याचं राज्यातील काही भाजपा नेत्यांचं म्हणणं आहे. त्यांच्या मते, पक्षाचा हा निर्णय उलटा फिरला असून निवडणुकीत ‘झारखंडी’ ओळखीने महत्वाची भूमिका बजावली आहे. भाजपाच्या एका नेत्याने सांगितले की, “आदिवासी आणि ओबीसी हेमंत सोरेन आणि जयराम महतो यांच्याकडे झुकत होते. त्याचवेळी भाजपाने प्रचाराची जबाबदारी राज्याबाहेरील नेत्यांकडे दिली. झारखंडच्या जनतेला हे आवडले नाही. कारण, त्यांच्यासाठी झारखंडची ओळख सर्वात महत्त्वाची होती. हेमंत सोरेन आणि कल्पना सोरेन यांनी त्यांच्या भाषणात स्थानिक मुद्द्यांना प्राधान्य दिले. परिणामी राज्यातील २८ एसटी आरक्षित जागांपैकी भाजपला फक्त एकच जागा जिंकता आली.”

Story img Loader