Arvind Kejriwal Delhi Assembly Election News : आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेससोबत युती करणार नसल्याचं रविवारी जाहीर केलं. दोन्ही पक्ष हे राष्ट्रीय पातळीवरील इंडिया आघाडीतील घटकपक्ष आहेत. मात्र, लोकसभा निवडणुकीनंतर त्यांनी युतीमधील अटींवर असहमती दर्शवली आहे. दिल्लीतील आकडेवारी दर्शवते की, काँग्रेसने लोकसभा निवडणुकीत ‘आप’च्या तुलनेत चांगली कामगिरी केली आहे. तर विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाचे पारडे जड आहे.

२०१४ पासून राज्यातील निवडणुकांमध्ये भाजपा आणि ‘आप’ या दोन्ही पक्षांमध्ये अटीतटीची लढत होत आहे. भाजपाने लोकसभा, तर आम आदमी पक्षाने विधानसभा निवडणुकीत आपले वर्चस्व राखले आहे. तर काँग्रेसला काही मोजक्याच जागा जिंकता आल्या आहेत. २०१३ मध्ये फक्त एकदाच राजकीय पक्षाला राज्यात बहुमत मिळवता आले नव्हते. त्यावेळी अरविंद केजरीवाल यांचा पक्ष राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

devendra fadnavis bjp majority seats
विदर्भाची भाजपला साथ, काँग्रेसचीही राखली लाज
eknath shinde
Eknath Shinde: एकनाथ शिंदे विरोधी पक्ष नेते? ‘दाल…
Girgaon Marathi Marwari Conflict
“इथे मराठीत न बोलता..”, गिरगावमध्ये मराठी भाषेच्या गळचेपीवर भाजपा आमदार मंगल प्रभात लोढांची मोठी प्रतिक्रिया
Sachin Tendulkar Meets Vinod Kambli
Sachin Tendulkar Meet Vinod Kambli : सचिन भेटायला आला पण विनोद कांबळीला उभंही राहता आलं नाही, मैत्रीतला ‘तो’ क्षण राज ठाकरेही पाहातच राहिले!
Eknath Shinde News
Eknath Shinde : एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार का? उदय सामंत यांनी दिलं उत्तर; म्हणाले, “त्यांनी…”
mahayuti vidhan sabha result
कलंकितांवरून कोंडी; शिवसेनेच्या मंत्र्यांची नावे भाजपने ठरविण्यावर आक्षेप; राष्ट्रवादीसमोरही पेच
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…

हेही वाचा : Delhi Election 2025 : आम आदमी पक्षासाठी I-PAC मैदानात; दिल्ली विधानसभा निवडणुकीची समीकरणं बदलणार?

मात्र, सत्तास्थापनेसाठी त्यांना काँग्रेसचा पाठिंबा घ्यावा लागला. काही महिन्यानंतर काँग्रेसने पाठिंबा काढून घेतल्यानंतर आम आदमी पक्षाचे सरकार कोसळले होते. १९९१ मध्ये विधानसभा अस्तित्वात आल्यानंतर दिल्लीत एकदाही युतीचे सरकार स्थापन झाले नाही. नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणानुसार ‘आप’-काँग्रेस आघाडीचा निवडणुकीच्या निकालांवर मर्यादित परिणाम होऊ शकतो.

दरम्यान, नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत दिल्लीतील ७ जागा लढवण्यावर दोन्ही पक्षांचं एकमत झालं होतं. आम आदमी पक्षाने ४ तर काँग्रेसने ३ जागांवर उमेदवार दिले होते. निवडणुकीत १० विधानसभा मतदारसंघातून ‘आप’च्या उमेदवारांना आघाडी मिळाली होती. तर काँग्रेसचे उमेदवार ८ जागांवर आघाडीवर होते. दिल्लीतील प्रत्येक लोकसभा मतदारसंघात विधानसभेचे १० मतदारसंघ येतात.

दुसरीकडे, भाजपाच्या उमेदवारांना तब्बल ५२ विधानसभा मतदारसंघातून आघाडी मिळाली. परिणामी २०१४ आणि २०१९ च्या निवडणूक निकालाप्रमाणे भाजपाला सर्वच ७ जागांवर विजय मिळाला. आप-काँग्रेसची युती दोन्ही पक्षाला निवडणुकीत यश मिळवून देण्यास अपयशी ठरली. या निकालांवरून हे दिसून आले की, आम आदमी पक्षाला स्वतंत्रपणे निवडणूक लढवणे अधिक सोयीस्कर आहे. २०२० मधील विधानसभा निवडणुकीत ‘आप’ने ७० पैकी ६२ जागांवर विजय मिळवला होता. तर उर्वरित ८ जागा भाजपाने जिंकल्या. काँग्रेसने या निवडणुकीत संपूर्ण ताकद लावून दिली होती, पण त्यांना भोपळाही फोडता आला नव्हता.

भाजपाने जिंकलेल्या ८ विधानसभा मतदारसंघात काँग्रेस आणि ‘आप’ उमेदवारांची मते एकत्र करूनही आघाडीला फक्त दोन जागांवर विजय मिळवता आला असता. गांधीनगर आणि लक्ष्मीनगर या जागांवर भाजपा उमेदवारांचा जेवढा विजयाचा फरक होता, त्यापेक्षा जास्त मते काँग्रेस उमेदवारांनी घेतली. त्यामुळे येथे आम आदमी पक्षाचा पराभव झाला. राज्यातील इतर सहा मतदारसंघात काँग्रेसमुळे भाजपाला मोठा फटका बसला होता. कारण, ‘आप’च्या उमेदवारांनी जेवढ्या मताधिक्याने विजय मिळवला, त्यापेक्षा जास्त मते काँग्रेस उमेदवारांनी घेतली होती. परिणामी भाजपाचे उमेदवार पराभूत झाले होते.

हेही वाचा : फडणवीसांचा थक्क करणारा राजकीय प्रवास, महापौर ते मुख्यमंत्री, विरोधी पक्ष नेता, उपमुख्यमंत्री आणि पुन्हा मुख्यमंत्री

२०१९ मध्ये ‘आप’, काँग्रेस आणि भाजपने स्वतंत्रपणे लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यावेळी भाजपाच्या उमेदवारांना तब्बल ६५ विधानसभा मतदारसंघातून आघाडी मिळाली होती. तर काँग्रेसचे उमेदवार फक्त ५ मतदारसंघातून आघाडी होते. आम आदमी पक्षाला एकाही विधानसभा मतदारसंघातून आघाडी मिळाली नव्हती. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत आम आदमी पक्ष आणि काँग्रेसची विधानसभा क्षेत्रातील कामगिरी सुधारली आहे. मात्र, दोन्ही पक्षांची मते एकत्रित केल्यास फक्त चार ठिकाणीच त्यांनी भाजपाला मागे टाकलं आहे. यातील तीन विभाग हे पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघात येतात. जिथे माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित काँग्रेसच्या उमेदवार होत्या.

या निवडणुकीत आम आदमी पक्षाला फक्त ५ विधानसभा मतदारसंघातून आघाडी मिळाली, उर्वरित सर्व मतदारसंघातून काँग्रेस आघाडीवर होती. २०१५ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने अभूतपूर्व यश मिळवत ७० पैकी तब्बल ६७ जागा जिंकल्या होत्या. उर्वरित ३ जागांवर भाजपाचे उमेदवार विजयी झाले होते. दरम्यान, भाजपने जिंकलेल्या मतदारसंघातील काँग्रेसचे मताधिक्य आम आदमी पक्षाच्या पारड्यात टाकली तर यातील दोन जागांवर त्यांचा विजय झाला असता.

या विधानसभा निवडणुकीतही काँग्रेस पक्षाला चांगली कामगिरी करता आली नव्हती. केवळ ४ मतदारसंघातच त्यांचे उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर होते. तर उर्वरित ६६ जागांवर काँग्रेस तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला होता. इतर १३ मतदारसंघात काँग्रेस उमेदवारांना विजयाच्या फरकापेक्षा जास्त मते मिळाली, यापैकी ११ जागांवर आम आदमी पक्षाने विजय मिळवला आणि भाजपा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष राहिला.

Story img Loader