तिहार तुरुंगात असलेल्या इंजिनीअर रशीद यांनी बारामुल्ला लोकसभा मतदारसंघात अवघ्या दहा दिवसांमध्ये निवडणुकीत उलटफेर करून ओमर अब्दुल्ला आणि सज्जाद लोन यांच्यासारख्या दिग्गजांचा पराभव केला होता. विधानसभा निवडणुकीतही रशीद यांचा झंझावात कायम राहिला तर खोऱ्यात त्यांची ‘आवामी इत्तेहाद पार्टी’ लक्षवेधी ठरेल. म्हणूनच त्यांच्या निवडणुकीचे ‘इंजिनीअरिंग’ नेमके कोण करतेय, असा प्रश्न विचारला जात आहे.

लोकसभा निवडणुकीत ओमर आणि सज्जाद यांची थेट लढत झाली असती तर कदाचित ओमर यांचा विजय होऊ शकला असता. पण, तिसरा तगडा उमेदवार दिला तर ओमर यांच्या मतांचे विभाजन होऊन भाजपचा ‘ब’ चमू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सज्जाद लोन यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले असते. इंजिनीअर रशीद निवडणुकीत उतरल्यामुळे लोन सुरक्षित झाल्याचे मानले गेले. पण, झाले भलतेच. रशीद यांना सुमारे पाच लाख मते मिळाली! लोन हरले याचे दु:ख कोणाला झाले नसले तरी ओमर अब्दुल्ला यांच्या पराभवामुळे ‘दिल्लीकरां’च्या चेहऱ्यावर मात्र हास्य पसरले, अशी चर्चा अख्ख्या खोऱ्यात रंगली होती.

maharashtra assembly election 2024 ravindra dhangekar vs hemant rasane kasba peth assembly constituency
धंगेकर-रासने लढतीच्या दुसऱ्या फेरीत कोणाची बाजी?
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
narendra modi yogi adityanath campaign in maharashtra
लालकिल्ला : मोदी-योगींच्या प्रचाराने काय साधणार?
assembly election 2024 Frequent party and constituency changes make trouble for Ashish Deshmukh
वारंवार पक्ष व मतदारसंघ बदल आशीष देशमुखांना भोवणार
anup dhotre
काँग्रेसची सत्ता असलेली राज्ये शाही परिवाराचे ‘एटीएम’; अकोल्यातील प्रचारसभेत पंतप्रधान मोदींची टीका
Dhule City Polarization of votes beneficial to any candidate print politics news
लक्षवेधी लढत: धुळे शहर : मतांचे ध्रुवीकरण कोणाला फायदेशीर?
Challenge for Kiran Samant from Rajapur Assembly Election Constituency print politics news
लक्षवेधी लढत: राजापूर : उदय सामंत यांच्या भावासमोर कडवे आव्हान
dcm devendra fadnavis praise obc community
भाजपच ओबीसींच्या पाठीशी!, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावा

हेही वाचा >>>Aryan Mishra Murder : गोरक्षकांकडून आर्यन मिश्राची हत्या, हिंदुत्ववादी संघटनांनी हात झटकले; म्हणाले, “हिसांचाराचे समर्थन नाही”

‘सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून आम्ही रशीद यांचा उमेदवारी अर्ज भरला. जमानत भरण्यासाठी देखील आमच्याकडे पैसे नव्हते’, असे रशीद यांचे पुत्र अब्रार यांनी सांगितले. ‘बारामुल्ला भागात लोक रशीद यांना ओळखतात, ते निवडणुकीत उतरले आहेत एवढेच आम्ही सांगत होतो. प्रचारासाठी बाहेर पडलो तेव्हा आमच्यासोबत कोणीही नव्हते. एक कार घेऊन एकटेच फिरत होतो. पण, दोन-चार दिवसांत ठिकठिकाणी शेकडो गाड्यांचा ताफा प्रचारात सामील झाला. लोक स्वत:हून आले. त्यांनी रशीद यांना जिंकून दिले’, असे अब्रार म्हणाले.

‘रशीद यांच्यासाठी आम्ही लोकांना भावनिक आव्हान केले. खरा प्रचार फेसबुक पेजवरून केला. दिल्ली सरकारकडून होणाऱ्या अन्यायाच्या मुद्दा प्रचंड प्रतिसाद मिळाला’, असा दावा पक्षाच्या एका ज्येष्ठ नेत्याने केला. रशीद यांचा लोकसभेतील विजयातून केंद्र सरकार व भाजप यांच्याविरोधातील संताप बाहेर पडल्याचे मानले जाते. पण, रशीद यांना उमेदवारी अर्ज भरू देण्यापासून प्रचाराला मिळालेल्या प्रतिसादापर्यंत अनेक बाबी आश्चर्यकारक म्हणता येतील. त्यामुळे रशीद यांना बळ कोणी दिले, असा प्रश्न करत एका राजकीय विश्लेषकाने दिल्लीकडे अंगुलीनिर्देश केला.

हेही वाचा >>>Madhabi Puri Buch : ‘सेबी’च्या अध्यक्षा माधवी पुरी बुच यांच्या अडचणीत वाढ? ‘हिंडनबर्ग’च्या आरोपांची लोकलेखा समितीकडून चौकशीची शक्यता

विधानसभा निवडणुकीत रशीद यांच्या पक्षाकडून उमेदवार उभे केले जाणार असून अब्रारही मैदानात उतरण्याची शक्यता आहे. सध्या अब्रार आणि त्यांचे नेते अनंतनाग वगैरे दक्षिण काश्मीरमध्ये प्रचार करत आहेत. ‘उत्तरेप्रमाणे दक्षिणेतही आम्हाला लोकांचा उदंड प्रतिसाद मिळू लागला आहे’, असा दावा अब्रार रशीद यांनी केला. लोकसभा निवडणुकीत उत्तरेतील प्रतिसाद विधानसभा निवडणुकीत दक्षिणेत मिळाला तर रशीद इंजिनीअर यांचे ‘आझादी’वादी उमेदवार सत्तास्थापनेमध्ये कदाचित मोठी भूमिका बजावू शकतील असे मानले जात आहे. इंजिनीअर यांच्या विजयामुळे लोकसभेतील ओमर यांचा संभाव्य भाजपविरोधी आवाज बंद केला गेला. आता विधानसभा निवडणुकीत इंजिनीअर यांचा पक्ष ‘नॅशनल कॉन्फरन्स’च्या घोडदौडीला खीळ बसवू शकणाऱ्या काही घटकांपैकी एक असू शकतो असे मानले जात आहे.