छत्रपती संभाजीनगर : उद्धव ठाकरे यांच्याविषयी असणारी सहानुभूतीची लाट टिकेल का, एमआयएमचा कट्टर धार्मिक चेहरा खरा की धर्मनिरपेक्षतेची नवी झुल खरी, वंचितची ताकद उरलीय की विरली, याच बरोबर हिंदू-मुस्लिम व मराठा-ओबीसी हे विभाजन यातील कोणते इंजिन चालेल हे ठरविणाऱ्या औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात पुन्हा एकदा तिरंगी लढत होत आहे. तिरंगी लढतीत कोणाला कसे मतदान होते यावर निकालाचे गणित ठरणार आहे.

हरिनाम सप्ताह करणारा की मद्यविक्रेता असा प्रचार शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या केंद्रस्थानी होता. महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांचा प्रचाराचा केंद्रबिंदू चंद्रकांत खैरे आणि उद्धव ठाकरे हे मुस्लिमस्नेही झाल्याचे सांगणारा होता आणि एमआयएमच्या प्रचाराचे रंग शहरात हिरवा आणि ग्रामीणमध्ये भगवा असे होते. वजाबाकीच्या मतपेढीत गुंतागुंतीची बेरीज असल्याने मतदार संभ्रमावस्थेत आहेत. राजकारणाचा बदलत जाणारा पोत कौल देतानाही तो खूप एककल्ली असणार नाही. कोणीही निवडून आले तरी मतांचा फरक फक्त पाच – दहा हजाराच्या घरातच राहील, एवढी अटीतटीची लढत असेल असे दिसून येत आहे.

57 lakh worth of goods seized in Nashik district in two days nashik news
नाशिक जिल्ह्यात दोन दिवसात ५७ लाखांचा मुद्देमाल जप्त
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Rahul Gandhi ashok chavan nanded
नांदेडमध्ये राहुल गांधींकडून चव्हाण कुटुंबिय बेदखल !
Mehkar Assembly constituency shinde shiv sena thackeray shiv sena Siddharth Kharat Sanjay Raimulkar buldhana district
शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात शिंदे-ठाकरे गटांत सामना, संजय रायमूलकर यांची घोडदौड सिद्धार्थ खरात रोखणार?
Rajasthan By-Election Independent candidate assault SDM
Rajasthan By-Election : अपक्ष उमेदवाराची अधिकाऱ्याला मारहाण; कार्यकर्त्यांकडून पोलिसांवर दगडफेक, वाहनं पेटवली, जिल्ह्यात तणाव
Maharashtra kunbi vidhan sabha
कुणबी समाजाला डावलल्याची खंत, यवतमाळात तिसरा पर्याय देण्याचा प्रयत्न
Ramdas Athawales message of unity to Advocate prakash ambedkar
रामदास आठवलेंकडून ॲड.आंबेडकरांना पुन्हा ऐक्याची साद; म्हणाले, ‘आपण दोघेही नरेंद्र मोदींच्या..’
pm modi said ek hai toh safe
योगींच्या ‘बटेंगे तो कटेंगे’नंतर पंतप्रधान मोदींकडून ‘एक हैं तो सेफ है’चा नारा

हेही वाचा – ना बालाकोट, ना राम मंदिराचा प्रभाव; मोदींनी विरोधकांसमोर गुडघे टेकल्याचा अधीर रंजन चौधरींचा दावा

महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे हे पाच वेळा निवडून आलेले पैठणचे आमदार. पण पैठण हा विधानसभा मतदारसंघ शेजारच्या जालना मतदारसंघात. त्यामुळे उमेदवाराचे म्हणून असणारे पायाभूत मतदान त्यांच्याकडे नाही. बाळासाहेब ठाकरे यांना आवडणारे गाव असा वर्षानुवर्षाचा प्रचार, एकनाथ शिंदे यांच्याबरोबर आलेले आमदार रमेश बोरनारे, प्रदीप जैस्वाल, संजय शिरसाट यांच्या ताकदीवर अवलंबून भुमरे लोकसभेच्या मैदानात उतरले. त्याला मंत्री अतुल सावे, प्रशांत बंब ही मंडळी किती साथ देतात यावर महायुतीचे भवितव्य ठरणार आहे. कागदावर सशक्त आणि गर्दी जमविण्यात पुढाकार घेणाऱ्या नेत्यांना मतदार स्वीकारणार की राजकीय खिचडीमुळे उद्धव ठाकरे यांच्या गटाविषयी निर्माण झालेली सहानुभूती तारणार हे निकालानंतरच स्पष्टच होईल. पण उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भुमरे यांची प्रतिमा ‘मद्यविक्रेता’ अशी करून त्यांची प्रतिमा समाजमनातून उतरावी या ठाकरे गटाच्या प्रयत्नाला यश मिळल्याचे चित्र ग्रामीण भागातही आहे.

पहिल्या टप्प्यात शरद पवार यांची चंद्रकांत खैरे यांच्यासाठी सभा झाली. पण प्रचारसभेत मागच्या खुर्च्या रिकाम्या होत्या. तत्पूर्वी सिडको येथील मैदानावरील उद्धव ठाकरे यांच्या सभेलाही अगदी शेवटी गर्दी जमली. दुसरीकडे मुख्यमंत्र्यांच्या सभेला बजाजनगरमध्ये महायुतीला चांगली गर्दी जमवता आली. पण सभांना होणारी गर्दी मतदानावर परिणाम करतेच असे नाही. पण आदित्य ठाकरे यांच्या खुलताबाद तालुक्यातील गल्लेबोरगाव येथील सभेस चांगली गर्दी जमली होती. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, सुषमा अंधारे, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात यांनी चंद्रकांत खैरे यांच्यासाठी प्रचार केला. तर महायुतीमध्ये भुमरे यांच्या प्रचारासाठी महायुतीचे बडे नेते फिरकले नव्हते. समन्वयाच्या बैठकांच्या पुढे गाडी सरकायला प्रचाराचा शेवटचा टप्पा यावा लागला. केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड, रावसाहेब पाटील दानवे ही मंडळी भुमरे यांच्या प्रचारात होती. मात्र, देवेंद्र फडणवीस, अमित शहा यांची सभा काही झाली नाही. मुख्यमंत्री मात्र दाेन दिवस ठाण मांडून होते. करेक्ट कार्यक्रम करू, असेही म्हणत होते. भाजपशिवाय निवडणूक लढविताना चंद्रकांत खैरेनी मतांची बेरीज मुस्लिम भागातून होईल, असे गृहीत धरुन प्रचार केला. त्यामुळे ते अचानक धर्मनिरपेक्ष वागू लागले. त्याची ‘एमआयएम’ ने खिल्ली उडवली. नवधर्मनिरपेक्षवादी उद्धव ठाकरे यांनी बाबरी पतन हा गुन्हा होता, असे मान्य करावे आणि मगच मुस्लिम वस्त्यांमध्ये प्रचाराला यावे, असे आव्हानच दिले. महायुतीकडूनही प्रचाराचा रंग ‘भगवा’ – ‘हिरवा’ रहावा असे प्रयत्न सुरू होते. शहरी भागात एमआयएमचा प्रचाररंग हिरवा होता तर ग्रामीण भागात तो भगवा-निळा रहावा असे प्रयत्न इम्तियाज जलील करत होते.

हेही वाचा – ‘मोकळ्या’ केजरीवालांच्या तावडीत आता भाजपचे सावज!

या लोकसभा निवडणुकीत एवढे दिवस ‘कट्टर’ वाटणारा उद्धव ठाकरेचा गट मवाळ धर्मनिरपेक्ष दिसू लागला. असेच काहीसे एमआयएमचेही घडले. धार्मिक ध्रुवीकरणाच्या खेळात टोकदार असणारे ओवेसी धर्मनिरपेक्ष असल्याचे दाखवत हळूच एखादे वाक्य ‘मुस्लिम मतपेढी’ फुटणार नाही याची खबरदारी घेत होते. आम्ही ‘बाबरी जिंदाबाद’ म्हणणारे आहोत, असेही ते एकदा भाषणात म्हणाले. त्याच वेळी आमचे राजकारण शोषित, वंचितांचे असल्याचेही ते सांगत होते. या सगळ्या प्रचारात वंचित बहुजन आघाडीने मुस्लिम चेहरा दिला. मुस्लिम आपल्या धर्तील व्यक्तीशिवाय अन्य जातीतील उमेदवारास मतदान करत नाहीत. ‘एमआयएम’ने मागील निवडणुकीत पाठीत खंजीर खुपसल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी भूमिका मांडली. प्रचाराच्या टप्प्यात छत्रपती संभाजीनगरमधील प्रचारात मतदान मिळविण्यासाठी मोठा रंगबदल झाला होता. ४०च्या पुढे तापमान असताना हे रंगबदल मतदारांना भावतील का, मतटक्का वाढेल का, हे प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहे. वजाबाकीच्या मतदारसंघात बेरजेची गुंतागुंत सुरू आहे.