कर्नाटक विधानसभा निवडणुकीत विद्यमान सत्ताधारी भाजपाचा पराभव झाल्याच्या दोनच दिवसानंतर लेखक अदांदा सी करिअप्पा (Addanda C Cariappa) यांनी राज्य सरकारपुरस्कृत म्हैसूर येथील रंगायन या नाट्यसंस्थेच्या संचालक पदाचा राजीनामा दिला आहे. नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा देत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. करिअप्पा यांनी विधानसभा निवडणुकीदरम्यान भाजपा आमदार केजी बोपय्ह्या आणि अप्पाचू रंजन यांच्या प्रचारात सहभाग घेतला होता. दोन्ही उमेदवारांचा पराभव झाला आहे. म्हैसूर रंगायनचे संचालक म्हणून त्यांचा कार्यकाळ वादाच्या भोवऱ्यात सापडला होता.

कुर्ग जिल्ह्यात भाजपाच्या उमेदवारांसाठी प्रचार करीत असताना करिअप्पा आपल्या भाषणात म्हणाले, “भाजपाला मतदान करणे म्हणजे एक प्रकारे काशी यात्रा करण्यासारखे आहे. तर काँग्रेसला मतदान करणे म्हणजे बलात्कारी आणि दलालांना मत जाणे.” करिअप्पा यांनी जहाल भाषणे दिल्यामुळे निवडणूक प्रचाराच्या काळात त्यांच्यावर तीन खटले दाखल करण्यात आलेले आहेत. मात्र सत्ता जाताच आणि काँग्रेस सरकार बनविणार हे कळताच करिअप्पा यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊ केला आहे.

Pankaja Munde
Pankaja Munde : बीड जिल्ह्यातील तणावाच्या परिस्थितीवर पंकजा मुंडेंचं मोठं विधान; म्हणाल्या, “मी गृहमंत्र्यांशी…”
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
Devendra Fadnavis and PM Narendra Modi
Devendra Fadnavis : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी “देवाभाऊ” म्हणताच दिलखुलास हसले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नेमकं काय घडलं?
anil Deshmukh Devendra fadnavis
‘गुड गव्हर्नन्स’ अहवालावरून माजी गृहमंत्र्यांकडून फडणवीस यांच्यावर टीका
Hemlata Patil
Hemlata Patil : काँग्रेसला मोठा धक्का? ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर प्रवक्त्या डॉ.हेमलता पाटील पक्ष सोडणार?
What Ajit Pawar Said?
Ajit Pawar : धनंजय मुंडे नैतिकतेच्या आधारावर राजीनामा देणार का? विचारताच अजित पवारांचं उत्तर, “मी इतकं स्पष्ट सांगतो….”
Hrishikesh Shelar
‘तुला शिकवीन चांगलाच धडा’फेम अभिनेत्याने प्रियदर्शन जाधव, विशाखा सुभेदार यांच्याबरोबर काम करण्याचा सांगितला अनुभव, म्हणाला…
readers feedback on loksatta editorial
लोकमानस : सत्ताधाऱ्यांच्या लांगूलचालनाचे उदाहरण

कन्नड आणि संस्कृती विभागाच्या सचिवांना लिहिलेल्या पत्रात करिअप्पा यांनी म्हटले, “माझ्या कार्यकाळात मी संस्थेला आर्थिक सक्षम करण्याचा प्रयत्न केला. संस्थेच्या खात्यात सध्या पाच कोटींची राशी आहे. त्याच वेळी राज्यातील इतर रंगायनाच्या खात्यात १५ लाख रुपयेदेखील नाहीत. म्हैसूरमधील रंगायनची प्रसिद्धी वाढविण्यासोबतच नामवंत कलाकारांना घेऊन नियमित उपक्रमांच्या माध्यमातून संस्थेचा प्रसार व्यापक करण्याचा प्रयत्न केला.”

हे वाचा >> Karnataka : टिपू सुलतान यांना कुणी मारले? ब्रिटिश की वोक्कालिगा? भाजपाचे मंत्री यावर चित्रपट बनविण्याच्या तयारीत

करिअप्पा यांचे ‘टिपू निजा कनसुगालू’ (टिपूची खरी स्वप्ने) हे पुस्तक वादग्रस्त ठरले होते. या पुस्तकात त्यांनी दावा केला होता की, म्हैसूर प्रांताचे शासक टिपू सुलतान यांनी हिंदूंचे मोठ्या प्रमाणात शिरकाण केले होते. वोक्कालिगा समुदायाचे टोळीप्रमुख ‘उरी गौडा’ आणि ‘नांजे गौडा’ यांनी टिपू सुलतानचा नाश करेपर्यंत हिंदूंचे हत्याकांड सुरू होते, असेही या पुस्तकात म्हटले आहे. करिअप्पा यांच्या दाव्याशी विसंगत इतर इतिहासकारांचे मत आहे. करिअप्पा यांच्या आधी इतिहासकारांनी लिहून ठेवल्यानुसार ब्रिटिश आणि म्हैसूर प्रांतामध्ये झालेल्या चौथ्या अँग्लो-म्हैसूर लढाई दरम्यान १७९९ साली टिपू सुलतान मारले गेले होते. या लढाईत म्हैसूर प्रांताच्या विरोधात ईस्ट इंडिया कंपनी, मराठा, हैदराबादचे निझाम यांनी एकत्र येऊन हल्ला चढवला होता.

दरम्यान, करिअप्पा यांनी आपल्या दाव्याला सिद्ध करणारे अनेक पुरावे असल्याचे म्हटले होते. यानंतर भाजपाचे मंत्री एन. मुनिरत्ना यांच्या चित्रपटनिर्मिती संस्थेने या पुस्तकावर चित्रपट बनविणार असल्याची घोषणा केली होती. मात्र या मुद्द्यावर राजकीय वातावरण तापल्यानंतर वोक्कालिगा समाजाचे आध्यात्मिक गुरू आणि आदिचुंचनगिरी मठाचे मठाधिपती निर्मलानंद स्वामी यांनी करिअप्पा यांचे दावे फेटाळून लावले. त्यांनी सांगितले की, अशा प्रकारचे दावे करण्याआधी खूप संशोधन होणे गरजेचे आहे. यातून भाजपाला थेट इशारा देण्यात आला होता की, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक विषयात त्यांनी जास्त नाक खुपसू नये.

हे वाचा >> टिपू सुलतानवरील पुस्तकाच्या विक्री, वितरणाला स्थगिती

वोक्कालिगा समाजाच्या गुरूंनी यात भाष्य केल्यानंतर करिअप्पा यांनी आपल्या दाव्यावरून घुमजाव केले. ते म्हणाले, मी पुस्तकातील कथानकात दोन पात्रे निर्माण केली असून ती पूर्णपणे कपोलकल्पित आहेत. तसेच त्यांनी निर्मलानंद स्वामी यांची माफीदेखील मागितली होती. म्हैसूर रंगायनच्या संचालकपदी नियुक्ती झाल्यानंतर करिअप्पा यांच्यावर बरीच टीका झाली होती. रंगायनच्या ‘बहुररूपी’ या वार्षिक संमेलनासाठी २०२१ साली त्यांनी हिंदुत्ववादी, उजव्या विचारसरणीचे नेते चक्रवर्ती सुलिबेले यांना आमंत्रित केले होते. त्या वेळी रंगायनच्या बाहेरच अनेक कलाकार आणि दिग्दर्शकांनी निषेध आंदोलन करीत सुलिबेले यांना निमंत्रित करण्याबद्दल प्रश्न विचारले होते.

करिअप्पा यांनी ज्ञानपीठ पुरस्कार विजेते चंद्रशेखर कंबारा यांच्या ‘संबाशिव प्रहसन’ या नाटकाचे प्रयोग केले होते. या नाटकात त्यांनी काँग्रेसचे नेते सिद्धरामय्या आणि डी .के. शिवकुमार यांची नकारात्मक प्रतिमा रंगवल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. तसेच नाटकाच्या गाभ्यात छेडछाड करून ते सादर केले असल्याचाही आरोप करण्यात आला. काँग्रेसकडून जेव्हा नाटकाच्या विरोधात आंदोलन करण्यात आले, तेव्हा लेखक कंबारा यांनी स्वतः म्हैसूर पोलीस आयुक्तांना पत्र लिहून या नाटकावर कारवाई करण्याची मागणी केली.

Story img Loader