Uma Bharti Babri Masjid Case: अयोध्येमध्ये राम मंदिराच्या उद्घाटनाची लगबग सुरू असून २२ जानेवारी रोजी राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. एकीकडे या सोहळ्याची देशभर चर्चा होत असताना दुसरीकडे ६ डिसेंबर १९९२ साली घडलेल्या घडामोडी अजूनही चर्चेत येताना दिसतात. त्याबाबत वेगवेगळे दावे-प्रतिदावेही केले जातात. याचसंदर्भात माजी केंद्रीय मंत्री व राम जन्मभूमी आंदोलनातील आघाडीच्या नेतृत्वापैकी एक राहिलेल्या उमा भारती यांनी राम मंदिर उद्घाटन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर त्या दिवसाच्या काही आठवणी ताज्या केल्या आहेत.

गेल्या काही काळापासून राजकारणापासून लांबच राहिलेल्या उमा भारती या ६ डिसेंबर रोजी बाबरी मशीद पाडली गेली, तेव्हा तिथेच होत्या. किंबहुना आपल्या डोळ्यांसमोर कारसेवक बाबरीवर चढल्याचं त्यांनी सांगितलंय. त्या वेळी नेमकी काय परिस्थिती होती? कोण कुठे होतं? कुणी कुणाला नेमकं काय सांगितलं? या सर्व गोष्टींवर उमा भारती यांनी सविस्तर भाष्य केलं आहे. बाबरी प्रकरणातील ३२ आरोपींपैकी उमा भारती याही एक होत्या. २०२०मध्ये सीबीआयच्या विशेष न्यायालयाने त्यांची या प्रकरणातून निर्दोष मुक्तता केली. या सुटकेविरोधात करण्यात आलेली याचिकाही २०२३ मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाने फेटाळून लावली.

nala sopara railway station
मराठीचा आग्रह करणाऱ्या प्रवाशाला डांबले, तिकीट तपासनीसाची दमदाटी
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
Akshay Kumar And Shreyas Talpade
“पहिल्या दिवसापासून त्याने मला…”, श्रेयस तळपदेने सांगितला अक्षय कुमारबरोबर काम करण्याचा किस्सा; म्हणाला…
chhagan bhujbal on manoj jarange decision to not contest maharashtra assembly election spb 94
मनोज जरांगेंची विधानसभा निवडणुकीतून माघार; छगन भुजबळ म्हणाले, “हा निर्णय म्हणजे…”
maharashtra assembly election
“लोकसभेला साहेबांना खूश केलं, आता विधानसभेला मला खूश करा”; अजित पवारांचं बारामतीकरांना आवाहन!
vidya balan reveals kartik aaryan love life
कार्तिक आर्यन मिस्ट्री गर्लला करतोय डेट. भर शोमध्ये विद्या बालनने केली पोलखोल; म्हणाली, “फोनवर बोलताना…”
raosaheb danve compared himself as shivaji maharaj
“मी शिवाजी तर, अब्दुल सत्तार औरंगजेब”; रावसाहेब दानवेंचं विधान!
arvind sawant
“तेव्हा मी त्यांची लाडकी बहीण होती, पण आता…”; ‘त्या’ विधानावरून शायना एनसींचं अरविंद सावतांवर टीकास्र!

राम जन्मभूमी आंदोलनाचे सुरुवातीचे दिवस…

वयाच्या १२व्या वर्षीच पहिल्यांदा अयोध्येला गेल्याचं उमा भारतींनी सांगितलं. “काही धार्मिक प्रवचनांसाठी मी १२ वर्षांची असतानाच अयोध्येला गेले होते. मी तेव्हा बालप्रवचनकार म्हणून रामायण व महाभारतावर प्रवचन देत असे. तेव्हा महंत राम चरण दास यांनी मला तिथे प्रवचनासाठी नेलं होतं. मी त्या ठिकाणी मोठं कुलूप पाहिलं आणि त्याचबरोबर तिथे काही लोक प्रार्थना करत असल्याचंही मला दिसलं. मी महंत रामचरण दास यांना विचारलं की तिथे कुलूप का लावलं आहे. तर ते म्हणाले की तिथलं मंदिर फार पूर्वीच पाडण्यात आलं आहे. आता न्यायालयाच्या आदेशांनुसार तिथे कुलूप लावण्यात आलं आहे. पण आत प्रार्थना करण्यास परवानगी दिली आहे. मला ते कुलूप पाहून फार वाईट वाटलं. त्या आठवणी माझ्या मनात घर करून गेल्या”, असं उमा भारती म्हणाल्या.

बाबरी पतनानंतर झाल्या ‘मौनी माता’, राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा होताच सोडणार ३० वर्षांचे मौन व्रत

“१९८४ साली विश्वहिंदू परिषदेनं तिथे ‘जोर से बोलो, राम जन्मभूमी का ताला खोलो’ अशी घोषणा देत आंदोलन केलं. तोपर्यंत मी राजकारणात प्रवेश केला होता. मला त्या आंदोलनात सहभागी व्हायला सांगण्यात आलं. त्याप्रमाणे मी आंदोलनात सहभागी झालेही”, असंही त्यांनी सांगितलं.

राम जन्मभूमी आंदोलन कसं सुरू झालं?

उमा भारतींनी त्यानंतर राम जन्मभूमी आंदोलन कसं सुरू झालं, याविषयी सांगितलं. “१९८९ साली तिथलं कुलूप तोडण्यात आल्यानंतर मी तिथे झालेल्या भूमीपूजन सोहळ्यात सहभागी झाले होते. त्यानंतर मथुरेमध्ये एक बैठक झाली. या बैठकीत ३१ ऑक्टोबर १९९० रोजी कारसेवा करण्याची तारीख निश्चित करण्यात आली. तत्कालीन पंतप्रधान व्ही. पी. सिंह संभ्रमात होते. कधी ते आमच्या भूमिकेशी सहमत व्हायचे तर कधी डाव्या पक्षांच्या भूमिका त्यांना पटायच्या. आमच्या दोघांच्या बाहेरून दिलेल्या पाठिंब्यावरच त्यांचं सरकार तगलं होतं. त्या घडामोडींबाबत मुलायम सिंह यादव ठामपणे म्हणाले होते ‘अयोध्येमध्ये चिटपाखरूही येऊ शकणार नाही’. ३१ ऑक्टोबर १९९० रोजी मी राजमाता विजयाराजे सिंदिया यांच्यासोबत कारसेवेसाठी गेले. पण त्यांना ताब्यात घेऊन चिनार तुरुंगात पाठवण्यात आलं. मला बांदा गेस्ट हाऊसला ठेवलं गेलं. ३१ ऑक्टोबरला कारसेवा झाली, पण अशोक सिंघल पोलीस कारवाईत जखमी झाले. दूरदर्शनवर आम्ही हे वृत्त पाहिलं. मला फार वाईट वाटलं. मला वाटलं की आम्ही सगळीकडे फिरून लोकांना कारसेवेत सहभागी होण्याचं आवाहन करत होतो, पण आता त्यांना पोलिसांच्या गोळ्यांचा सामना करावा लागतोय आणि मी एखाद्या व्हीआयपीप्रमाणे गेस्टहाऊसवर बसले होते”, अशी आठवण त्यांनी सांगितली.

पुढे त्या म्हणाल्या, “मी विचार केला आणि लगेच एक योजना बनवली. अयोध्येत तेव्हा कर्फ्यू होता. मी काही लोकांबरोबर अयोध्येला निघाले. मी अयोध्येला पोहोचले तेव्हा मला २ नोव्हेंबरला निघणाऱ्या कारसेवकांच्या एका मोर्चाचं नेतृत्व करायला सांगण्यात आलं. आमच्यातले काही लोक चुकून भरकटले. कर्फ्यू लागू असतानाही ते जवळच्या रस्त्याने हनुमान गढीच्या दिशेनं निघाले होते. त्यांच्यापैकी रामकुमार कोठारी व सोहित कुमार कोठारी पोलीस कारवाईत ठार झाले.”

“सीआरपीएफच्या महिला अधिकाऱ्यांनी मला अक्षरश: खेचूनच तिथून लांब नेलं. मला अटक करून फैजाबाद तुरुंगात धाडण्यात आलं. दुसऱ्याच दिवशी काही स्थानिक महिलांनी तुरुंगाला घेराव घातला. त्यानंतर मला नैनी तुरुंगात पाठवण्यात आलं. आंदोलन चालूच राहिलं. अशोक सिंघल यांनी ते तसं ठेवण्याचा आग्रह धरला. त्यातच ६ डिसेंबर १९९२ च्या कारसेवेची घोषणा करण्यात आली”, उमा भारतींनी बाबरी आंदोलनाचे पैलू उघडून समोर ठेवायला सुरुवात केली.

…आणि बाबरी पाडली

ज्या दिवशी बाबरी पाडण्यात आली, त्या दिवशी उमा भारती तिथेच उपस्थित होत्या. त्यांनी त्या दिवसाची प्रत्येक घडामोड सांगितली. त्या म्हणाल्या, “कारसेवेसाठी ५ डिसेंबरला प्रचंड मोठ्या संख्येनं लोक जमा झाले होते. मी माझ्या एका वरिष्ठांना म्हटलं की हे सगळे काही आपले सहकारी नाहीत. त्यातले अनेक रामभक्त आहेत. ते कदाचित आपल्या नियंत्रणात राहणार नाहीत. पण माझ्या वरिष्ठांनी मला काळजी न करण्याचा सल्ला दिला. ६ डिसेंबरच्या सकाळी आचार्य धर्मेंद्र यांनी मला आणि रितंभराजींना जमा झालेल्या लोकांसमोर व्यासपीठावर जायला सांगितलं. राम जन्मभूमीपासून अवघ्या अर्ध्या किलोमीटर अंतरावर एक इमारत होती. त्याच्यावरच व्यासपीठ बांधण्यात आलं होतं. व्यासपीठावरून रामजन्मभूमीचं ठिकाण सहज दिसत होतं. मुरली मनोहर जोशी, लालकृष्ण आडवाणी, राजमाता विजयाराजे सिंदिया तिथे उपस्थित होत्या. आम्हाला एकापाठोपाठ भाषण करण्यास सांगण्यात आलं.”

विश्लेषण : बाबरी पाडल्यानंतर भारतीय राजकारणाला कलाटणी का मिळाली?

उमा भारती पुढे म्हणाल्या, “योगायोगाने मी जेव्हा भाषणाला उभी राहिले, तेव्हाच समोर कारसेवक बाबरी मशिदीवर चढल्याचं दिसायला लागलं. ते पाहून मी मध्येच थांबले. मी इतरांना याविषयी सांगितलं. आडवाणीजींनी मायक्रोफोनवर त्यांना थांबायला सांगण्याचं आवाहन केलं. पण समोरचा जमाव एवढ्या मोठ्या आवाजात घोषणा देत होता की आडवाणींचा आवाज करसेवकांपर्यंत पोहोचलाच नाही.”

कल्याणसिंह सरकार बरखास्त!

“आडवाणीजींनी अतिरिक्त पोलीस अधीक्षक अंजू गुप्ता, त्यांचे स्वीय सहायक दीपक चोप्रा व प्रमोद महाजन यांच्यासह मला सांगितलं की तिथे जाऊन त्या कारसेवकांशी चर्चा करा. आम्ही निघालोही. पण कारसेवकांनी आम्हाला घेराव घातला. आम्ही तिथे का चाललोय, असा प्रश्न केला. दोन वर्षांपूर्वी पोलीस गोळीबारात मारल्या गेलेल्या कोठारी बंधूंची आईही त्यांच्यात होती. मी त्यांना म्हटलं शिस्त पाळली गेली पाहिजे. पण त्यांनी माझं ऐकलं नाही. कारसेवकांनी मला अक्षरश: खेचतच पुन्हा व्यासपीठापर्यंत आणून सोडलं. काही वेळातच आम्हाला समजलं की कल्याणसिंह यांचं सरकार बरखास्त करण्यात आलं आहे आणि निमलष्करी दल शहरात दाखल झालं आहे. बाबरी पडली होती. आम्ही तिथे गेलो तेव्हा तिथे फक्त पाडण्यात आलेले दगड उरले होते. एक सीआरपीएफचा जवान बूट काढून राम लल्लांना नमस्कार करत असल्याचं मी पाहिलं. ते पाहून आम्हाला आश्चर्य वाटत होतं”, असं उमा भारती म्हणाल्या.

राम जन्मभूमी आंदोलनाचं श्रेय कुणाला द्याल?

या प्रश्नावर बोलताना उमा भारतींनी पहिलं श्रेय कारसेवकांना दिलं. “त्या दिवशी बाबरीचं बांधकाम ज्यांनी पाडलं, त्या कारसेवकांना याचं पहिलं श्रेय द्यायला पाहिजे. त्यामुळेच पुरातत्वशास्त्र विभागाला तिथे उत्खनन करणं शक्य झालं. त्यांना तिथे मंदिराचे अवशेष सापडले. सर्वोच्च न्यायालयाने ते पुरावे आधार मानले. दुसऱ्या शब्दांत बाबरी पाडण्यासाठी तिथले कारसेवक जबाबदार होते. पण आडवाणीजी, मी आणि इतरांची नावं या प्रकरणाच्या आरोपपत्रात टाकण्यात आली होती. २०१७ साली आमच्याविरोधात फौजदारी स्वरुपाचे खटले चालवण्यास सर्वोच्च न्यायालयानं मंजुरी दिली. पण मला काळजी नव्हती. जर त्या दिवशी कारसेवकांवर गोळीबार झाला असता, तर त्यांना वाचवण्यासाठी मी माझा प्राणही दिला असता”, असं त्या म्हणाल्या.

“मोदींनी जेव्हा हिंदू-मुस्लीम असा कोणताही फरक जाणवू न देता मंदिराच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम केला, तेव्हा आमचा ऊर अभिमानानं भरून आला. जगानं जात किंवा धर्माधारित वाद हीच भारताची ओळख मानली आहे. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ज्या प्रकारे हे सगळं घडवून आणलं, त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. राष्ट्रीय एकतेच्या त्या जाणिवेमुळेच आजपर्यंत राम जन्मभूमीवर कोणताही वाद निर्माण झाला नाही”, असंही त्या म्हणाल्या.

९०च्या दशकातील दंगली, हिंसाचार टाळता आला असता का?

“२०१० साली अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर कोणत्याही दंगली झाल्या नाहीत. २०१९सालच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतरही कोणतीही दंगल झाली नाही. पंतप्रधानांनी भूमीपूजन केल्यानंतरही दंगल झाली नाही. आता राम मंदिराचं उद्घाटन होत असताना कोणताही तणाव नाहीये. याचा अर्थ असा आहे, की ९०च्या दशकाच्या पूर्वार्धात काँग्रेसनं तणाव व फूट निर्माण करण्याचंच नियोजन केलं होतं. डाव्या लोकांनाही हिंदू-मुस्लीम वाद हवे होते. दंगली होत नाहीत, त्या घडवल्या जातात. हिंदू-मुस्लीम एकत्र सुखाने नांदू शकतात.”

उमा भारतींचा विरोधकांना सल्ला…

दरम्यान, राम मंदिर उद्घाटनाला येण्यासंदर्भात उमा भारतींनी काँग्रेससह विरोधी पक्षांना सल्ला दिला आहे. “आमच्याकडे रामभक्तीचा कॉपीराईट नाहीये. प्रभू श्रीराम व हनुमानजी हे काही भाजपा नेते नाहीत. ते आपला राष्ट्रीय स्वाभिमान आहेत. त्यांच्या प्राणप्रतिष्ठेसाठी कुणीही सहभागी होऊ शकतं आणि कुणालाही आमंत्रण दिलं जाऊ शकतं. माझं सगळ्या राजकारण्यांना आवाहन आहे की याकडे राजकीय दृष्टीने पाहू नका. या सोहळ्याला उपस्थित राहा. तुम्ही मतं गमवाल याची काळजी करू नका. भाजपाच्या नेत्यांनाही माझं आवाहन आहे की फक्त तुम्हीच रामाची भक्ती करू शकता या गर्वातून बाहेर या. आणि विरोधकांना मी हे सांगेन की तिथे आपण जायला नको, या भीतीतून तुम्ही बाहेर या”, असं त्यांनी नमूद केलं.

अयोध्येनंतर आता काशी, मथुरा?

अयोध्येनंतर आता काशी व मथुरेतही अशाच प्रकारची मागणी होत असताना त्यावर उमा भारतींनी भूमिका स्पष्ट केली आहे. “यावर माझी तीच भूमिका आहे जी मी १९९१ साली संसदेत जेव्हा अयोध्येला धार्मिक स्थळांच्या यादीतून बाहेर ठेवण्यासंदर्भातलं एक विधेयक मंजुरीसाठी मांडण्यात आलं तेव्हा मांडली होती. या स्थळांची ओळख पुसली जाता कामा नये. मी म्हटलं होतं की या यादीत काशी आणि मथुरेचाही अपवाद म्हणून समावेश करून घ्या, जेणेकरून पुढील पिढ्या शांततेत जगू शकतील”, असं त्या म्हणाल्या.