मधू कांबळे

मुंबई : मुंबईतील काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांनी पक्षाचा राजीनामा देऊन अपेक्षेप्रमाणे त्यांनी शनिवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. राष्ट्रवादीकडून सिद्दीकी यांना कोणता राजकीय फायदा होणार हे अजून उघड झालेले नाही. मात्र सिद्दीकींचा काँग्रेसमधून बाहेर पडण्याचा आणि मित्र पक्षातच प्रवेश करण्याचा निर्णय भाजपला फायदेशीर ठरणार आहे.

MVA allegation is that money is being distributed to the police by BJP Pune news
भाजपकडून पाेलीस बंदाेबस्तात पैशांचे वाटप? ‘मविआ’चा आरोप, महायुतीचेही प्रत्युत्तर..
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
Arjuni Morgaon Constituency , Ajit Pawar, Manohar Chandrikapure,
विदर्भात अजित पवारांची भाजपकडून कोंडी
two kerala ias officers suspended over hindu muslim whatsapp group
अन्वयार्थ : ‘कर्त्यां’चा बेभानपणा!
Will Ramdas Athawale take care of BJP or Republican workers
रामदास आठवले भाजपला सांभाळणार की रिपब्लिकन कार्यकर्त्यांना?
नक्षलवादी संविधानाला मानत नाही; भाजपलाही संविधान संपवायचे आहे – छत्तीसगड माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल
Mankhurd  Shivajinagar Muslim community in confusion print politics news
मानखुर्द- शिवाजीनगरात मुस्लीम समाज संभ्रमात
kalyan east shinde shiv sena city chief mahesh gaikwad including nine expelled from shiv sena
कल्याण पूर्वेतील बंडखोर शहरप्रमुख महेश गायकवाड; यांच्यासह नऊ जणांची शिवसेनेतून हकालपट्टी

वांद्रे पश्चिम मतदारसंघात अल्पसंख्यांकाची मते निर्णायक आहेत. बाबा सिद्दीकी यांना या मतदारसंघात अजूनही जनाधार आहे. त्यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने या मतदारसंघातील विद्यमान आमदार व मुंबई भाजपचे अध्यक्ष अॅड. आशिष शेलार यांचा पुढील निवडणुकीतील विजयाचा मार्ग सुकर झाला आहे. २०१४ मध्ये शेलार व सिद्दीकी यांच्यात लढत झाली होती. त्यावेळी शेलार मोठ्या फरकाने निवडून आले होते. २०१९मध्ये सिद्दीकी निवडणूक रिंगणाच्या बाहेर राहिले, त्यामुळे शेलार पुन्हा चांगल्या मताधिक्यांनी निवडून आले.

हेही वाचा… माढा मतदारसंघ : भाजपच्या उमेदवारीसाठी ‘दोन सिंहा’ची प्रतिष्ठा पणाला

देशात सध्या अयोध्या, राममंदिर हे विषय गाजत आहेत. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत त्याचा थोडा बहोत परिणाम होणार आहे. अल्पसंख्याक मते भाजपच्या विरोधात जाण्याची शक्यता आहे. अशा वेळी मतदारसंघात चांगला जम असलेला बाबा सिद्दीकी यांच्यासारखा नेताच, काँग्रेसमधून बाहेर पडल्याने व राष्ट्रावादीत सहभागी झाल्याने वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघात आणि उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात त्याचा भाजपला फायदा होणार असल्याचे मानले जात आहे.

बाबा सिद्दीकी यांचा मुलगा झिशान वांद्रे पूर्व मतदारसंघातील आमदार आहे. त्यांनी शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि काँग्रेसवरही नाराजी व्यक्त करुन, तेही राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याचे संकेत दिले आहेत. मागील निवडणुकीत शिवसेनेतील मतविभाजनामुळे झिशान निवडून आले होते. शिवसेनेने विश्वनाथ महाडेश्वर यांना उमेदवारी दिली होती, त्याविरोधात बंडखोरी करुन तत्कालीन आमदार तृप्ती सावंत यांनी निवडणूक लढविली होती. त्यामुळे शिवसनेच्या मतांचे विभाजन झाले आणि झिशान यांना काठावरचा विजय मिळाला.

हेही वाचा… महायुतीच्या उमेदवार निवडीवर निवडणुकीचे भवितव्य अवलंबून

आता महाविकास आघाडीत हा मतदारसंघ शिवसेनेकडे जाण्याची चर्चा आहे. सिद्दीकी यांनी काँग्रेस सोडण्याचे हे एक कारण असल्याचे सांगण्यात येते. पुढील निवडणुकीत भाजप व शिवसेना (शिंदे गट) यांच्या पाठिंब्याने राष्ट्रवादीचा उमेदवार म्हणून झिशानला रिंगणात उतरविण्याची तयारी असल्याचे समजते. काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन आणि सत्ताधारी राष्ट्रवादीत प्रवेश करुन आपल्या मुलाचा मतदारसंघ वाचविण्याचाही बाबा सिद्दीकी यांचा प्रयत्न आहे.