नागपूर : प्रहार-जनशक्ती पक्षाचे प्रमुख व माजी मंत्री बच्चू कडू यांनी थेट भाजप नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृहशहरात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून पक्षविस्ताराचे पुढचे लक्ष्य नागपूर जिल्हा असल्याचे संकेत दिले आहेत.

बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कार्यालयापुढे आंदोलन केले. मुद्दा होता. बँकेच्या थकबाकीदार शेतकऱ्यांच्या जमिनीच्या लिलावाचा. बच्चू कडू यांनी हा लिलाव थांबवला. सरकारचे धोरण शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त करणारे आहे, हे खपवून घेणार नाही, अशी टीका केली. त्यामुळे या आंदोलनाची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. प्रहारचा फारसा प्रभाव नसतानाही कडू यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या शहरात आंदोलन केल्याने त्याला राजकीय महत्व असून त्याकडे प्रहार पक्षाच्या विस्ताराच्या नजरेने बघितले जात आहे.

Eknath Shinde criticizes Uddhav Thackeray over the project Print politics news
मोठ्या प्रकल्पातील गतिरोधक दूर केले; एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
Accused in hit and run case in Ravet arrested Pune news
पिंपरी: रावेतमधील हिट अँड रन प्रकरण; चार दिवसांनी आरोपी अटकेत, ८० सीसीटीव्ही…
thane Bhiwandi attempt to murder
ठाणे: सिगारेट मागितली म्हणून हत्येचा प्रयत्न
uke send bomb threats email regarding Jagdish Uikes terrorism book publication
विमानात बॉम्ब असल्याचे फोन, तो का करायचा ? कारण आहे धक्कादायक
12 civilians injured in grenade attack in Srinagar
श्रीनगरमध्ये ग्रेनेड हल्ल्यात १२ जखमी; जखमींमध्ये महिला व दुकानदारांचा समावेश
Pune hit and run case
पुण्यात पुन्हा हिट अँड रन! रस्त्यावर फटाके फोडणाऱ्याला भरधाव कारने दिली धडक; ३५ वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू
terror among the villagers after tiger kills man in melghat
मेळघाटात वाघाच्‍या हल्‍ल्‍यात एकाचा मृत्‍यू ; गावकऱ्यांमध्‍ये दहशत

हेही वाचा… भाजपशी मैत्री केलेल्या अन्य प्रादेशिक पक्षांसारखीच शिवसेनेची अवस्था होणार का ?

बच्चू कडू यांचे राजकीय कार्यक्षेत्र अमरावती जिल्हा आहे. याच जिल्ह्यात त्यांच्या प्रहार जनशक्तीचे दोन आमदार आहेत. कडू हे अचलपूरचे तर त्यांच्या पक्षाचे राजकुमार पटले हे मेळघाट विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. २००९ पर्यंत कडू यांचे राजकारण त्यांच्या मतदारसंघापुरतेच मर्यदित होते. त्यानंतर त्यांनी पक्ष विस्तारावर भर दिला. पाच वर्षे अमरावती जिल्ह्यातील अचलपूरसह तिवसा, मेळघाट आणि अन्य मतदारसंघात त्यांनी राजकीय मोर्चेबांधणी केली. त्याचे फळ त्यांना २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत मिळाले. त्यांनी अचलपूरसह मेळघाटचीही जागा जिकंली.

हेही वाचा… Maharashtra Breaking News Live : आसाममध्ये बसलेल्या ४० आमदारांनी स्वतःच स्वतःला पक्ष म्हणून जाहीर केलं – कपिल सिब्बल; वाचा सुनावणीची प्रत्येक अपडेट…

२०१९ मध्ये महाविकास आघाडी सरकारमध्ये ते शिवसेनेच्या कोट्यातून राज्यमंत्री झाल्यावर त्यांनी पुन्हा पक्षविस्तारावर लक्ष केंद्रीत केले. अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री असल्याने अकोला, बुलढाण्याह राज्यातील इतर जिल्ह्यातही पक्षाच्या शाखा सुरू केल्या. पूर्व विदर्भात गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांचाही प्रश्न प्रहारने हाती घेतला. शालेय शिक्षण खात्याचे राज्यमंत्री म्हणून त्यांनी नागपूरच्या खासगी शाळांकडून होणाऱ्या अवाजवी शुल्क आकारणीवर लगाम लावण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे शहरातील पालकांची संघटना त्यांच्याशी जुळली होती. मात्र याकडे राजकीय दृष्टिकोनातून बघितले जात नव्हते.

हेही वाचा… उद्धव ठाकरे यांना सहानुभूतीचा फायदा होणार का?

महाविकास आघाडी सरकार कोसळल्यावर व शिंदेंची साथ देऊनही मंत्रीपद न मिळाल्याने कडू यांनी वेगवेगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारवर दबाव निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू केले. नागपूरमध्ये झालेले आंदोलनही त्यातीलच प्रकार असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे, नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा हा प्रश्न आहे. जिल्ह्यात भाजपचे तीन आमदार आहेत. खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. त्यांच्याशी चर्चा करून हा प्रश्न निकाली निघू शकला असता. पण कडू यांनी तो मार्ग न स्वीकारता आंदोलनाचा पर्याय निवडला. या माध्यमातून सरकारवर टीका केली व इशाराही दिला. त्यामुळे कडू यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या माध्यमातून जिल्ह्यात पक्षाची पायाभरणी करणे सुरू केल्याचे दिसून येते.

“सरकार शेतकऱ्यांना जी काही मदत करते त्यापेक्षा जास्त वसूल करते, हा सावकारीचाच प्रकार आहे, यामुळे शेतकरी आत्महत्येसाठी प्रवृत्त होतो, आम्ही ते होऊ देणार नाही.” – बच्चू कडू, माजी मंत्री, प्रमुख प्रहार जनशक्ती.