अमरावती : ‘राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे’ या जाहिरातीने उडालेल्या राजकीय वादळाचा धुरळा खाली बसण्‍याआधी अमरावतीतील सत्तारूढ नेत्‍यांमध्‍येच रंगलेला कलगीतुरा नव्‍या संघर्षाची नांदी मानला जात आहे.

भाजप कार्यकर्त्यांकडून गेल्या काही वर्षांत ‘केंद्रात नरेंद्र, महाराष्ट्रात देवेंद्र’ अशी घोषणा दिली गेली आहे. मात्र, शिंदे गटाची नव्या घोषणेसह जाहिरात आल्यानंतर राजकीय प्रतिक्रिया उमटायला लागल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जाहिरातीवर टीका करताना भाजपचे खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी ‘बेडूक कितीही फुगला तरी तो हत्ती होऊ शकत नाही.’ असे विखारी वक्तव्य केले. या वक्तव्यावर महायुतीतला मित्रपक्ष असलेल्या प्रहार जनशक्ती पक्षानेही जोरदार प्रत्‍युत्तर दिले. ‘अनिल बोंडेंसारख्या माणसाने किमान आपली लायकी पाहून तरी बोलले पाहिजे, असे सांगून प्रहारचे अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडू यांनी बोंडे यांच्‍यावर टीका केली.

Vishnu Bhangale suspended from the Thackeray group, is now Jalgaon district head of Shinde group
जळगावमध्ये ठाकरे गटातून निलंबित, विष्णू भंगाळे आता शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
News About Eknath Shinde
Eknath Shinde : ठाकरे-फडणवीसांची भेट, महायुतीत एकनाथ शिंदेंच्या नाराजीचा दुसरा अंक?
Eknath Shinde , Rickshaw ,
VIDEO : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हाती पुन्हा रिक्षाचे स्टेरिंग, शिंदे यांनी दिला जुन्या आठवणींना पुन्हा उजाळा
Pratap Sarnaik Thackeray Group
Pratap Sarnaik : उद्धव ठाकरेंना मुंबईत धक्का बसणार? शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “ठाकरे गटाचे…”
possibility of Eknath Shinde and Ganesh Naik coming together in municipal elections is less
महायुतीच्या संकेतांना नवी मुंबईत खोडा? महापालिका निवडणुकीत शिंदे- नाईक मनोमिलनाची शक्यता धुसरच
What Eknath Shinde Said?
Eknath Shinde : एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला, “सरडाही रंग बदलतो, पण अशी नवी जात…”
eknath shinde shivsena
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात, “सर्व पक्षांनी एकच रस्ता धरलाय, तो म्हणजे धनुष्यबाणाची शिवसेना”

हेही वाचा – मध्य प्रदेशमध्ये तीन वर्षांत फक्त २१ जणांना सरकारी नोकरी? प्रियांका गांधींच्या दाव्याने खळबळ!

जिल्‍ह्याच्‍या राजकारणात डॉ. अनिल बोंडे आणि बच्‍चू कडू हे दोघे यापूर्वी थेट आमने-सामने आले नव्‍हते, पण शिंदे गटाच्‍या जाहिरातीच्‍या निमित्ताने या दोन नेत्‍यांनी एकमेकांवर तोडसुख घेतल्‍याने आगामी विधानसभा निवडणुकीतील संघर्षाची चुणूक बघायला मिळाली. बच्‍चू कडू हे शिंदे यांचे कडवे समर्थक. डॉ. अनिल बोंडे यांच्‍यावर देवेंद्र फडणवीस यांनी जिल्‍ह्यात पक्ष विस्‍ताराची जबाबदारी टाकलेली. डॉ. बोंडे यांची वक्‍तव्‍ये याआधीही अनेक वेळा वादग्रस्‍त ठरली आहेत. भाजपमधील एक आक्रमक नेते म्‍हणून ते ओळखले जातात. दुसरीकडे, बच्‍चू कडू यांनी प्रहार जनशक्‍ती पक्षाची स्‍वतंत्र ओळख निर्माण करण्‍यासाठी जोरकस प्रयत्न सुरू केले आहेत. त्‍यांना महायुतीत विधानसभा निवडणुकीच्‍या वेळी जास्‍तीत जास्‍त जागा हव्‍या आहेत, अशा स्थितीत त्‍यांचा सामना भाजपसोबतच होणार आहे. डॉ. बोंडे यांनी फडणवीस यांच्‍या बाजूने बोलताना थेट शिंदे यांना डिवचल्‍याने बच्‍चू कडूंना राग येणे स्‍वाभाविक आहे. पण, सत्तारूढ आघाडीत बेबनाव असल्‍याचे चित्र त्‍यातून दिसले.

शिंदे गटाच्‍या जाहिरातीनंतर भाजपच्‍या वरिष्‍ठ नेत्‍यांच्‍या सावध प्रतिक्रिया येत असताना डॉ. बोंडे यांनी थेट बेडकाची उपमा दिल्‍याचे शिंदे गटातील नेत्‍यांना रुचले नाही. ज्याप्रमाणे उद्धव ठाकरे यांना मुंबई म्हणजेच संपूर्ण महाराष्ट्र वाटायचा. तसेच, एकनाथ शिंदेंना आता ठाणे म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र वाटत आहे. मात्र, ठाणे म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र नाही, हे बोंडे यांचे वक्‍तव्‍य भाजपला अडचणीत आणणारे होते.

हेही वाचा – जमाखर्च : मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात रविंद्र चव्हाण ‘नामधारी’

भाजपवर नेहमी टीका केली जाते की, हा पक्ष सोबत असलेल्या इतर पक्षांना संपवण्याचा प्रयत्न करतो. भाजप खासदारांच्या एकनाथ शिंदेंबाबतच्या वक्तव्यालाही लोक अशाच पद्धतीने पाहतील. सोबत घेऊन शिंदेंचे महत्त्व कमी करण्याचा तर हा प्रयत्न नाही ना? एकनाथ शिंदेंच्या लोकप्रियतेला ग्रहण लावण्याचा तर हा प्रकार नाही ना? असा विचार लोक करू शकतात. त्याचा फटका भाजपलाच बसेल, असे मत बच्‍चू कडू यांनी व्‍यक्‍त केले. यावरून महायुतीत सर्वकाही सुरळीत नाही, असा संदेश गेला.

आता डॉ. बोंडे यांनी सूर मवाळ केला आहे. बच्चू कडू काय बोलले हे मी ऐकले नाही, परंतु एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बाबनकुळे याची दखल घेतील. भाजप-शिवसेनेमध्ये (शिंदे गट) सलोख्याचे, समन्वयाचे वातावरण निर्माण करण्याला सुरुवात झाली असल्‍याचे बोंडे यांचे म्‍हणणे आहे. सत्तारूढ आघाडीत बेबनाव नाही, हे दर्शविण्‍यासाठी भाजप आणि शिंदे समर्थक नेत्‍यांनी आता प्रयत्न सुरू केले असले, तरी महायुतीत जागावाटपावरून संघर्ष निर्माण होईल, हे आतापासूनच जाणवू लागले आहे.

Story img Loader