Randhir Beniwal BSP: बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावतींनी सध्या पक्ष संघटनेत मोठे बदल करण्याचा धडाकाच लावल्याचं पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी मायावती यांनी एक मोठा निर्णय घेत त्यांचा भाचा आकाश आनंद यांची दुसऱ्यांदा पक्षाच्या महत्त्वाच्या पदावरून हकालपट्टी केली होती. त्यानंतर आकाश आनंद यांच्या जागी त्यांनी त्यांचे धाकटे बंधू आनंद कुमार यांची नियुक्ती केली होती. आता पुन्हा एकदा मायावतींनी पक्षात बदल करत अचानक मोठा निर्णय घेतला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मायावती यांनी बुधवारी एक निर्णय घेत पक्षाचे जुने नेते रणधीर बेनीवाल यांची पक्षाचे दुसरे राष्ट्रीय समन्वयक म्हणून नियुक्ती केली.अचानक अशा प्रकारचा बदल केल्यामुळे बसपाच्या कार्यकर्त्यांना देखील आश्चर्याचा धक्का बसला आहे. आता रणधीर बेनीवाल यांनी आकाशचे वडील आनंद कुमार यांची जागा घेतली आहे. आनंद कुमार यांची नियुक्ती देखील काही दिवसांपूर्वीच करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर लगेच काहीच दिवसांत त्यांच्याऐवजी रणधीर बेनीवाल यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान, रणधीर बेनीवाल जे जवळपास तीन दशकांपूर्वी बसपा पक्षात सामील झाले होते. त्यांनी पक्षाच्या विविध स्थरावर काम पाहिलेलं आहे. उत्तर प्रदेशमध्ये समर्पित व्होटबँकेसह, बीएसपी हा दलितांचा प्रबळ पक्ष असल्याचं मानलं जातं. पण सध्या लोकसभेची एकही जागा बसपाला मिळालेली नाही आणि राष्ट्रीय स्तरावर फक्त २.०६ टक्के मते आहेत. २०२२ च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत पक्षाला १२.८८ टक्के मतांसह फक्त एक जागा जिंकता आली होती. आता पक्षाला पुन्हा एकदा रुळावर आणण्यासाठी मायावती अॅक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून मायावतींनी पक्ष संघटनेत अनेक बदल केल्याचं दिसून येत आहे.

रणधीर बेनीवाल यांनी अगदी पक्षाच्या कार्यकर्त्यांपासून ते आता एक पक्षात एक महत्वाची जबाबदारी पार पाडण्यापर्यंत काम केलं आहे. एवढंच नाही तर कांशीराम आणि मायावती यांच्यासोबत देखील त्यांनी काम केलेलं आहे. रणधीर बेनीवाल हे जाटव आहेत. मायावतींना दलित समाजाच्या नेत्या म्हणून ओळखलं जातं. अशाच प्रकारे रणधीर बेनीवाल यांनी स्वत:ला ‘केडर शिपाई’ म्हणवून घेतलं होतं. मायावती आता रणधीर बेनीवाल यांच्या भूमिकेची बारकाईने व्याख्या आणि निरीक्षण करत असल्याचंही दिसून येत आहे.

हरियाणा, चंदीगड, हिमाचल प्रदेश, पंजाब, पश्चिम बंगाल, ओडिशा, उत्तराखंड, जम्मू आणि काश्मीर आणि पश्चिम उत्तर प्रदेशच्या काही भागांमध्ये त्यांनी पक्षाच्या राज्य युनिट्सवर देखील काही फेरबदल करण्याची शक्यता आहे. दुसरीकडे गौतम यांना पक्षाच्या समर्थकांशी संपर्क साधण्यासाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून अहवाल गोळा करण्यासाठी आणि तळागाळात मायावतींच्या सूचनांची अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी भारतभर प्रवास करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

ते बसपामध्ये कसे आले?

रणधीर बेनीवाल यांचे वडील गावप्रमुख होते आणि कांशीराम यांनी त्यांना सहारनपूरमधील सरकारी कर्मचाऱ्यांची संघटना BAMCEF (Backward and Minority Community Employees Federation) मजबूत करण्याची जबाबदारी दिली होती. पुढे १९९० मध्ये बेनीवाल औपचारिकपणे बसपामध्ये सामील झाले. बेनीवाल सांगतात की, तीन वर्षांनंतर त्यांना पहिल्यांदा मायावतींना भेटण्याची संधी मिळाली. त्यांनी बसपाच्या बूथ, सेक्टर, विधानसभा आणि जिल्हा संघांसाठी काम केलं आणि २००१ आणि २००६ मध्ये सहारनपूरचे नगरसेवक म्हणून निवडून आले.

२००७ मध्ये यूपीमध्ये पूर्ण बहुमताने बसपा सत्तेवर आल्याच्या एका वर्षानंतर बेनिवाल यांची सहारनपूर जिल्हा नियोजन समितीवर निवड झाली. २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीत पक्षाला एकही जागा मिळाली नाही. तेव्हा ते सहारनपूरचे प्रभारी होते. नंतर त्यांना सहारनपूर आणि मेरठमध्ये पक्षाच्या उपसमितीचे प्रभारी बनवण्यात आले आणि २०१८ मध्ये ते पंजाबचे प्रभारी बनले. आकाश आनंदच्या देखरेखीखाली बसपाने लढवलेल्या नुकत्याच झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकी दरम्यान रणधीर बेनीवाल यांच्यावर १० जागांवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी होती.