आसाराम लोमटे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच प्रमुख राजकीय पक्षांची आपापल्या मतदारसंघात मोर्चेबांधणी चाललेली असताना जिल्ह्यात अद्यापही ‘बाळासाहेबांची शिवसेना’ या पक्षाच्या गोटात सामसूम आहे. नव्यानेच स्थापन झालेल्या या पक्षाला शिवसेनेच्या परंपरागत बालेकिल्ल्यात अजूनही शिरकाव करता आलेला नाही. राज्यातील सत्ता बदलानंतर तानाजी सावंत यांच्याकडे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद आले तरी आजही जिल्ह्यात संघटनात्मक पातळीवर ‘बाळासाहेबांची शिवसेना’ या पक्षाचे चाचपडणेच सुरू आहे.

‘उद्धव बाळासाहेब ठाकरे’ यांच्या शिवसेनेचे जिल्ह्यात वर्चस्व आहे. १९८९ पासून सेनेचा परंपरागत बालेकिल्ला म्हणून हा जिल्हा ओळखला जातो. लोकसभेला सातत्याने याच शिवसेनेने प्रभुत्व मिळवले आहे. १९९८ चा काही महिन्यांचा अपवाद वगळता लोकसभेला अन्य पक्षांना या मतदारसंघात कधीच राजकीय यश मिळाले नाही. १९९८ साली राष्ट्रवादीच्या स्थापनेआधी आणि काँग्रेस एकसंघ असताना सुरेश वरपूडकर लोकसभेला निवडून आले होते., पण त्यांची ही खासदारकी औटघटकेची ठरली. लोकसभा मतदारसंघात ‘उद्धव बाळासाहेब ठाकरे’ या शिवसेनेच्या अस्तित्वाला शह देण्यासाठी भाजपची मात्र जोरदार मोर्चेबांधणी चालू आहे. संघटनात्मक पातळीवर अनेक बैठका सुरू आहेत. लोकसभा निवडणुकीत उमेदवार कोणीही असो पण भाजपने ही निवडणूक गांभीर्याने घेतली असून अगदी बूथ पर्यंत या पक्षाची संघटनात्मक बांधणी तयार आहे.

हेही वाचा… पालिकांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर, सर्वोच्च न्यायालयात फेब्रुवारीत सुनावणी

आतापर्यंत शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी असाच संघर्ष परभणी लोकसभेला पाहायला मिळत असे. आता या संघर्षात राष्ट्रवादी असणार नाही. महाविकास आघाडीच्या स्थापनेनंतर दोन्ही काँग्रेससह शिवसेनेनेही आपापले कार्यक्षेत्र वाटून घेतले आहे. आगामी लोकसभेला परभणीतून राष्ट्रवादी लढणार नाही, आपल्याला शिवसेनेलाच या मतदारसंघात साथ द्यायची आहे असे राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने यापूर्वीच स्थानिक नेत्यांना बजावले आहे. येणाऱ्या लोकसभेला जिल्ह्यात शिवसेना ‘उद्धव बाळासाहेब ठाकरे’ व भाजप असाच सामना पहावयास मिळणार आहे.

हेही वाचा… कसबा पेठ व चिंचवडची जागा भाजपा कायम राखणार का?

परभणी विधानसभा मतदारसंघ गेल्या ३०-३५ वर्षांपासून शिवसेनेच्या ताब्यात आहे. या मतदारसंघातही बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाने अद्याप संघटनात्मक पातळीवर कोणतीच जुळवाजुळव केली नाही. पाथरी विधानसभा मतदार संघ आमदार सुरेश वरपुडकर यांच्या रूपाने काँग्रेसच्या ताब्यात आहे. काँग्रेसच्या विरोधात पाथरीची जागा भाजप लढवणार असल्याने ‘बाळासाहेबांची शिवसेना’ हा पक्ष अजून तरी कुठेच लढतीची मोर्चेबांधणी करताना दिसून येत नाही. जिंतूर विधानसभा मतदारसंघात भाजपच्या आमदार मेघना बोर्डीकर आहेत. या मतदारसंघात भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असाच संघर्ष होणार आहे. गंगाखेड विधानसभा मतदारसंघात रत्नाकर गुट्टे हे भाजपचा मित्रपक्ष असलेल्या रासपचे आमदार आहेत. त्यामुळे जिंतूर आणि गंगाखेड या दोन्ही मतदारसंघात ‘बाळासाहेबांची शिवसेना’ या पक्षाला शिरकाव करण्याची संधी नाही. लोकसभेसह चारही विधानसभा मतदारसंघात या पक्षाने अद्यापही संघटनात्मक पातळीवर आपली चूक दाखवली नाही. त्यामुळे हा पक्ष जिल्ह्यातील कोणत्या विधानसभा मतदार संघाच्या रिंगणात उतरणार असा प्रश्नच आहे. अर्थात या पक्षाकडे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद तानाजी सावंत यांच्या रूपाने असले तरी पक्षाला त्याचा कितपत फायदा होईल हे सांगणे अवघड आहे. अलीकडे सावंत यांनी जिल्हा नियोजन समितीच्या संदर्भातील आमदारांची एक बैठक ऑनलाईन घेतली यावरून त्यांचा जिल्ह्याशी किती संपर्क आहे याची कल्पना येते.