प्रदीप नणंदकर

लातूर -जिल्ह्यातील औसा विधानसभा मतदारसंघ हा अतिशय महत्त्वपूर्ण मतदार संघ आहे . २०१९ साली औसा विधानसभा निवडणुकीत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक राहिलेले अभिमन्यू पवार हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले व त्यांनी माजी मंत्री व काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील मुरूमकर यांचा दारुण पराभव केला. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीतील चित्र मात्र वेगळे राहणार आहे कारण बसवराज पाटील मुरूमकर यांनी भाजपात प्रवेश केला आहे .

Kangana Ranaut criticism that Priyanka Gandhi has no respect for democracy
प्रियंका गांधीना लोकशाहीचा आदर नाही,कंगना रानौतची टीका..
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
maharashtra assembly polls 2024 state economy in decline during bjp rule says chidambaram
भाजपच्या सत्ताकाळात महाराष्ट्राची पीछेहाट; माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांची टीका
jharkhand assembly election 2024 amit shah attack at rahul gandhi
झारखंडमध्ये ‘राहुल विमान’ कोसळणार! केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची टीका
Arjuni Morgaon Constituency , Ajit Pawar, Manohar Chandrikapure,
विदर्भात अजित पवारांची भाजपकडून कोंडी
Comrade Subhash Kakuste no more
सत्यशोधक कम्युनिस्ट नेते सुभाष काकुस्ते यांचे निधन
Chief Minister of Telangana, Himachal and Deputy Chief Minister of Karnataka reply to BJP on the scheme Print politics
गरिबांचे पैसे गरिबांना ही काँग्रेसची हमी; तेलंगणा, हिमाचलचे मुख्यमंत्री तर कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांचे भाजपला प्रत्युत्तर
Loksatta chaturanga Parent Nature Confused Psychologist
सांधा बदलताना : संसार शांतीचा झरा…

औसा विधानसभा मतदारसंघात लिंगायत समाजाची मोठी मतपेढी आहे. बसवराज पाटील यांच्या भाजप प्रवेशाने हा समाज भाजपशी अधिक प्रमाणात जोडला जाणार आहे .२०२४ विधानसभा निवडणुकीत अभिमन्यू पवार यांना फारसा संघर्ष करावा लागणार नाही .महाविकास आघाडीत काँग्रेस पक्षाच्या वतीने या जागेवर पुन्हा दावा केला जाण्याची शक्यता आहे कारण या मतदारसंघात दहा वर्ष शिवसेनेचे आमदार दिनकर माने यांची कारकीर्द वगळता काँग्रेसचाच आमदार राहिला आहे .शिवशंकर उटगे, किसनराव जाधव आदी आमदार राहिले त्यामुळे आगामी निवडणुकीतही काँग्रेस आपला दावा करणार असल्याचे कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल्य उटगे यांनी सांगितले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे च्या वतीने लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी झालेल्या जाहीर सभेत उद्धव ठाकरे व संजय राऊत या दोघांनीही आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचा उमेदवार उभा राहणार असल्याचे जाहीर केले आहे. दिनकर माने यांनी औसा विधानसभा मतदारसंघाचे दोन वेळा प्रतिनिधित्व केलेले आहे.

हेही वाचा >>>परभणीतील ‘गद्दारी’च्या इतिहासाला शिवसेना खासदार संजय जाधव ठरले अपवाद !

२०१९ मध्ये भाजप सेना युतीत शिवसेनेने ही जागा भाजपला सोडली त्यामुळे दिनकर मानेंना संधी मिळाली नाही. आता पुन्हा दिनकर माने हे दावेदार असले तरी अभिमन्यू पवार यांनी या मतदारसंघावर चांगली पकड निर्माण केली आहे .बंद पडलेला किल्लारी सहकारी साखर कारखाना सुरू केला आहे. शेत रस्त्याची मोहीम मोठ्या प्रमाणावर राबवली आहे. शिवाय पाणीपुरवठा व विविध विकास कामात मोठा निधी त्यांनी खेचून आणला आहे. बाजार समितीच्या निवडणुकीतही त्यांनी विजय प्राप्त केला आहे .सध्या तरी भाजपसाठी या मतदार संघात अनुकूल वातावरण आहे मागच्या वेळचे प्रमुख विरोधक बसवराज पाटील हे सोबत असल्यामुळे भाजपची बाजू भक्कम आहे. मराठा समाजाच्या आंदोलनाचा नेमका काय परिणाम होईल,असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.लोकसभा निवडणुकीनंतर चित्र अधिक स्पष्ट होणार आहे.