उमाकांत देशपांडे
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्णयामुळे भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस असे त्रिपक्षीय सरकारचे भाजपचे स्वप्न अखेर आज साकार झाले आहे. भाजपविरोधात असलेल्या उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना दणका देण्यासाठी भाजपने हे दोन्ही पक्ष फोडून खिळखिळे केले.
भाजपबरोबर सत्तेत असूनही ठाकरे यांनी सातत्याने तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी-अमित शहांवर सातत्याने टीका केली होती. भाजपबरोबर सत्तेत येण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची २०१८ मध्ये तयारी होती, पण पवार यांनी शिवसेनेला बरोबर ठेवण्यास विरोध केला होता, असा गौप्यस्फोट फडणवीस यांनी ‘ लोकसत्ता लोकसंवाद ‘ उपक्रमात गेल्या वर्षी केला होता. पण शिवसेनेबरोबरची युती हिंदुत्वाची असल्याने त्यांना सत्तेतून न वगळण्याचा निर्णय मोदी यांनी घेतला होता. शरद पवार यांनी २०१४ मध्येही भाजप सरकारला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला होता.
हेही वाचा… जितेंद्र आव्हाडांच्या निष्ठा थोरल्या पवारांपाशी
काँग्रेसला एकटे पाडण्यासाठी त्रिपक्षीय सरकारची मोदी यांची खेळी २०१८ मध्ये यशस्वी झाली नव्हती. शिवसेनेतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोडण्यात भाजपला यश मिळाले. त्यानंतर गेल्या काही महिन्यात अजित पवारांवर भाजपने लक्ष केंद्रित केले होते. ईडीच्या चौकशीचा दबाव आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील घडामोडींवर अजित पवार नाराज होते. त्यामुळे ते भाजपबरोबर जाणार, अशा बातम्या गेल्या काही दिवसांपासून येत असताना मी मरेपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राहीन, असे अजित पवार यांनी जाहीर केले होते.
हेही वाचा… संकटात मदत करणाऱ्या शरद पवारांची साथ सोडून आत्राम मंत्रिपदासाठी अजितदादा सोबत
मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या भ्रष्टाचारावर नुकताच मध्यप्रदेशमध्ये हल्ला चढविला होता. सिंचन गैरव्यवहार, राज्य सहकारी बैंक गैरव्यवहारासह अन्य प्रकरणात मोदी, शहा, फडणवीस यांच्यासह भाजप नेत्यांनी २०१४ पासून अनेकदा टीका केली. सिंचन गैरव्यवहारातील आरोपपत्रात अजित पवार यांच्या नावाचाही समावेश आहे. अजित पवार यांच्याबरोबर झालेला पहाटेचा शपथविधी ही चूक होती, या निर्णयाचा फडणवीस व भाजपच्या प्रतिमेवर परिणाम झाला, अशी कबुलीही फडणवीस यांनी अनेकदा जाहीरपणे दिली होती. तरीही भ्रष्टाचारमुक्त प्रशासन, स्वच्छ प्रतिमा यासाठी आग्रही असलेल्या भाजपने अजित पवार यांना दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्रीपद बहाल केले.