छत्रपती संभाजीनगर : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच बीडमधील राजकीय घडामोडींवरून भाजपपुढील डोकेदुखीत वाढ होत आहे. पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी राजीनामा दिल्यानंतर भाजपच्या पहिल्या यादीत केज मतदार संघातून नमिता मुंडदांना उमेदवारी जाहीर झाल्यामुळे माजी आमदार प्रा. संगीता ठोंबरे या काय करणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. गेवराईचे आमदार लक्ष्मण पवार यांची उमेदवारी जाहीर झालेली नसल्याने ते पक्षाला सोडचिठ्ठी देण्याची शक्यता वर्तविली जाते. अनेक नेते पक्षांतर करण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मिळत आहेत.

प्रा. ठोंबरे यांनी बंडखोरीचे स्पष्ट संकेत दिले आहेत. आपण एक-दोन दिवसांत विचार करून केज विधानसभा निवडणूक लढवण्याबाबतचा निर्णय घेऊ, असे त्यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले आहे. प्रा. संगीता ठोंबरे या २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत केजमधून भाजपकडून निवडून आल्या होत्या. मात्र, २०१९ च्या निवडणुकीत त्यांना पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली नव्हती. आता आपण पक्षाने सांगितल्यानुसार पाच वर्षे थांबलो असून, यावेळी आपण इच्छुक असल्याचे सांगून प्रा. ठोंबरे यांनी निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याचे स्पष्ट केले आहे. प्रा. ठोंबरे या केज मतदार संघात मागील दोन-तीन महिन्यांपासून सक्रीय झाल्या आहेत. मध्यंतरी त्यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचीही भेट घेतली होती. एका कार्यक्रमादरम्यान, प्रा. ठोंबरे यांच्या वाहनावर दगडफेकही झाली होती. त्यावरून त्या पुन्हा चर्चेत आल्या होत्या. मात्र, रविवारी भाजपची ९९ उमेदवारांची पहिली यादी घोषित झाली त्यामध्ये केज विधानसभा मतदार संघातून नमिता मुंदडा यांना पुन्हा उमेदवारी जाहीर झाली आहे. आता प्रा. ठोंबरे या ‘वेगळा’ काय विचार करतात, याकडे लक्ष लागले आहे.

BJP started journey to become superpower with record target of registering 1.5 crore workers
भाजप ‘समृद्धी’ महामार्गाने ‘शत प्रतिशत’कडे
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
भाजपा आमदार सुरेश धस हे धनंजय मुंडेंना लक्ष्य का करत आहेत? (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : भाजपा आमदार सुरेश धस हे धनंजय मुंडेंना लक्ष्य का करत आहेत?
bjp plan to contest local bodies elections alone after huge success in assembly elections
भाजप शत-प्रतिशतकडे; शिर्डीच्या महाविजयी मेळाव्यात दिशादर्शन; शहांची उपस्थिती
shivsena marathi news
पुण्यात भाजपच्या खेळीने शिवसेनेच्या दोन्ही गटांत अस्वस्थता
Image of Ajit Pawar
Ajit Pawar : “पक्ष वगैरे न बघता…” धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर अजित पवारांची मोठी प्रतिक्रिया
Rohit Pawar On Ajit Pawar group
Rohit Pawar : अजित पवार गटाकडून शरद पवारांच्या खासदारांना ‘ऑफर’? रोहित पवारांची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “अधिवेशन होतं तेव्हा…”
bjp and ajit pawar ncp political conflict over allegations against dhananjay munde
धनंजय मुंडे यांच्या विरोधात भाजपचे सुरेश धस, चित्रा वाघ यांचा बोलविता धनी कोण ?

हेही वाचा : ठाण्यात संजय केळकर यांच्याकडून शिवसेनेला चुचकारण्याचा प्रयत्न

ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी पदाचा राजीनामा रविवारी दिला आहे. नवा जिल्हाध्यक्ष नियुक्तीपासून पक्ष सोडणाऱ्यांना आवरायचे कसे, असा प्रश्न भाजपसमोर निर्माण झाला असून, पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे यांचाही जिल्ह्याशी असणाऱ्या संपर्कात सातत्य नसल्याने कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता आहे. परळीमध्ये कार्यकारिणीही अनेक वर्षांपासून निवडण्यात आली नसल्याचा सूर कार्यकर्त्यांमधून ऐकण्यात येतो आहे. त्यावरूनही कार्यकर्त्यांमध्ये बरीच नाराजी आहे. जिल्ह्यातील भाजपचे एक नेते रमेश आडसकर हेही पक्षांतर करण्याच्या विचारात असून, ते माजलगावमधून निवडणूक लढवण्यास उत्सुक आहेत. आपल्यापुढे ‘दोन्ही पवारांचा’ पर्याय खुला असल्याचे आडसकर यांनी सांगितले आहे. गेवराईचे आमदार लक्ष्मण पवार हे भाजपला रामराम करण्याच्या तयारीतच असून, पक्षाच्या पहिल्या यादीत पवार यांचे नाव समोर आलेले नाही. लक्ष्मण पवार हे सलग दोन वेळा भाजपकडून आमदार राहिलेले आहेत.

हेही वाचा : महायुतीत अर्जुनी मोरगावचा तिढा कायम, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपमध्ये रस्सीखेच!

एकेकाळी सहा विधानसभांपैकी पाच मतदार संघात भाजपचे आमदार निवडून देणारा जिल्हा, सहा वेळा भाजपचा खासदार निवडून देणारा जिल्हा, भाजपचे सर्वोच्च नेत्यांच्या फळीतील एक असलेले दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचा जिल्हा असलेला आणि ‘माधवं’चे मूळ जेथून विस्तारले त्याच बीड जिल्ह्यात भाजप तोळामासा राहतो की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Story img Loader