छत्रपती संभाजीनगर – बीड जिल्हा भाजपमध्ये गळतीचा हंगाम सुरू झाला आहे. पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, रमेश आडसकर यांच्यानंतर गेवराईचे विद्यमान आमदार लक्ष्मण पवार यांनी शनिवारी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याचे जाहीर केले. सायंकाळी भाजपचे राज्य कार्यकारिणीवरील सचिव तथा परळी येथील वैद्यनाथ देवस्थानचे विश्वस्त, पंकजा मुंडे यांचे निकटवर्तीय राजेश देशमुख यांनीही राजीनामा देत असल्याचे पत्रकार बैठक घेऊन सांगितले.

पक्षाच्या माजी आमदार प्रा. संगीता ठोंबरे यांनी राजीनामा दिल्याचे जिल्हाभर चर्चा सुरू आहे. मात्र, त्यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना राजीनामा दिला नसल्याचे स्पष्ट करून सोमवारी मात्र, आपण अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे सांगितले. अपक्ष उमेदवारी दाखल करण्यासाठी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामाच द्यावा लागतो, असे नाही, असे सांगत प्रा. ठोंबरे यांनी एकप्रकारे बंडाचे संकेत दिले आहेत. आमदार लक्ष्मण पवार यांनी सामान्य कार्यकर्त्यांवर अन्याय होत असल्याचे सांगून पालकमंत्री धनंजय मुंडेंच्या हस्तक्षेपामुळे विकास कामांवर परिणाम झाल्याचा आरोप केला. राजेश देशमुख यांनी मोठ्या संघर्षातून दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी राज्यभर पक्षाचा विस्तार केलेला असून, पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी बीडमध्ये भाजप संपवल्याचा गंभीर आरोप केला. पंकजा मुंडे या लोकसभा निवडणूक लढवू इच्छित नव्हत्या. त्यांना बळेच निवडणूक लढवण्यास बाध्य केले. अन्य नेतृत्व पक्षातून उभे करण्याची त्यांना भीती घातली. पक्षातील महत्त्वाचा आेबीसी नेता असलेल्या पंकजा मुंडे यांना पक्षाकडून कायम दुय्यम वागणूक दिली. विधानसभा निवडणुकीत पराभव झालेले प्रा. राम शिंदे यांना विधान परिषदेवर घेतले. मात्र, पंकजा मुंडे यांना बराचकाळ तीष्ठत ठेवले. पंकजा मुंडेंसारख्या लोकनेत्या नेतृत्वाची ही अवस्था पाहिली तर सर्वसामान्य कार्यकर्त्यांना कधी न्याय मिळेल, असा प्रश्न उपस्थित करून राजेश देशमुख यांनी पक्षनेतृत्वावर गंभीर आरोप केले.

NCP Sharad Pawar Third Candidate List
NCP Sharad Pawar Third Candidate List : मोठी बातमी! शरद पवारांच्या राष्ट्रवादीची तिसरी यादी जाहीर; धनंजय मुंडेंच्या विरोधात दिला ‘हा’ तगडा उमेदवार
27th Rashibhavishya In Marathi Horoscope Today
27 October Horoscope : अचानक धनलाभ ते‌ वैवाहिक…
After the rebellion of Sandeep Naik rebel leaders in all parties in Navi Mumbai are preparing for rebellion Print politics news
नवी मुंबईत बंडोबांचा सर्व पक्षांना ताप
uddhav thackeray eknath shinde (3)
उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना मोठा धक्का, विधानसभेआधी माजी मंत्र्याचा पक्षप्रवेश
Devendra Fadnavis News
Devendra Fadnavis : महाराष्ट्र विधानसभेत महायुतीला किती जागा मिळणार? देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आम्ही..”
sharad pawar ajit pawar supreme court clock symbol
Supreme Court : ‘घड्याळ’ कोणाचं? शरद पवार की अजित पवार? सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; म्हणाले…
Uddhav Thackeray on Dahisar vidhansabha
Vinod Ghosalkar : मोठी बातमी! ठाकरेंनी मुंबईत उमेदवार बदलला; दहिसरमध्ये तासाभरात नेमकं काय घडलं?
NCP Candidate List
NCP Candidate 3rd List : मोठी बातमी! अजित पवारांच्या राष्ट्रवादीची तिसरी यादी जाहीर; कोणाला कोणत्या मतदारसंघातून मिळाली उमेदवारी?

हेही वाचा >>>राज्याच्या राजकारणात वजन असलेल्या माणिकराव ठाकरे यांच्यापुढे दिग्रस मतदारसंघात आव्हानांचे डोंगर

बीड भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के व यापूर्वी लोकसभा, विधानसभा निवडणूक लढवलेले नेते रमेश आडसकर यांनी मागील आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे. या नेत्यांसोबत अनेक लहान-मोठे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनीही भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे.

प्रचारासाठी कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम

परळी विधानसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवारी धनंजय मुंडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी भाजप नेत्या आमदार पंकजा मुंडे या मागील आठवड्यात परळीत आलेल्या होत्या. अर्ज दाखल केल्यानंतर पंकजा मुंडे यांनी खासगी पातळीवरील काही संस्थांच्या बैठका घेतला. काही कार्यक्रमांना हजेरी लावली. महायुतीच्या एका बैठकीत मार्गदर्शन केले. मात्र, तेथे भाजपचे मोजकेच पदाधिकारी उपस्थित होते. अन्य पदाधिकाऱ्यांना प्रचारात उतरण्याच्या संदर्भाने कुठल्याही सूचना, मार्गदर्शन नसून, धनंजय मुंडे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी भाजप कार्यकर्त्यांना हुंगतही नसल्याचा नाराजीचा सूर ऐकण्यास मिळत आहे.

हेही वाचा >>>“पार्सल उमेदवार नको,” भाजपच्या दोन माजी आमदारांचा देवराव भोंगळे यांना विरोध

जिल्हाध्यक्षपदी शंकर देशमुख

भाजपचे बीड जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी राजीनामा दिल्यानंतर आठवडाभराच्या आतच त्या पदावर शंकर देशमुख यांनी नियुक्ती करण्यात आली आहे. कडा येथील रहिवासी असलेले शंकर देशमुख हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून भाजपशी जोडले गेलेले आहेत. कारसेवक म्हणूनही त्यांनी बाबरी मस्जिद पतनाच्या आंदोलनात काम केलेले आहे. सध्या ते बीड भाजपचे जिल्हा सरचिटणीसपदावर कार्यरत होते. भाजपमधून होणारी गळती रोखण्याचे त्यांच्यापुढील प्रमुख आव्हान आहे.