२०२४ साली भारतात लोकसभा निवडणुका पार पडणार आहेत. यासाठी २४ तास राजकारण करण्यास सज्ज असलेल्या भाजपाने तयारी सुरु केली आहे. तर, प्रमुख विरोधी पक्ष असेलल्या काँग्रेससमोर आव्हानांचा डोंगर उभा आहे. काँग्रेसमधील अनेक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पक्षाची वाट सोडत भाजपात प्रवेश केला. त्यामुळे संघटनेला मरगळ आली आहे. ती मरगळ झटकून येणाऱ्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसला सज्ज व्हावे लागणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

१९९८ आणि २००४ साली झालेल्या निवडणुकीतही काँग्रेसच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. तर, २००४ च्या लोकसभा निवडणुकीत तत्कालीन पंतप्रधान अटबिहारी वायपेयी यांना विजयाची खात्री होती. प्रसारमाध्यमांतही तशा चर्चांना उधाण आलं होते. मात्र, घडले उटलेच या निवडणुकीत भाजपाचा पराभव झाला, तर काँग्रेसची सत्ता आली. त्यानंतर, बोलताना वाजपेयी म्हणाले की, “या निवडणुकीत जिकणाऱ्यांना पराभवाची, तर हार पत्करनाऱ्यांना जिंकण्याची अपेक्षा होती.”

हेही वाचा –  बदलत्या राजकारणात भूपेंद्र पटेल यांनाच मुख्यमंत्रीपदासाठी पसंती का?

भाजपाच्या पराभवाची कारणे कोणालाच माहिती नव्हती. मात्र, असं सांगितलं जातं, हरियाणातील सोनीपत येथे २००४ साली एका रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीला आलेल्या एका नागरिकाने ‘भारत चमक रहा है लेकीन आम आदमी को क्या मिला?’, असा नारा दिला. हा नारा देशाच्या काना-कोपऱ्यात पोहचला आणि भाजपाला पराभव सामना करावा लागल्याचं सांगण्यात येतं.

त्यानंतर सलग १० वर्षे काँग्रेस सत्तेत होती. मात्र, २०१४ सालापासून गेली आठ वर्षे काँग्रेसला सत्तेचा दुष्काळ पडला आहे. त्याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली कन्याकुमारी ते काश्मीर ‘भारत जोडो यात्रा’ या अभियानाची सुरुवात झाली आहे. या यात्रेमुळे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेत्यांमध्ये नवचैत्यनाचे वातावरण निर्माण झालं आहे. तरीही, या ‘भारत जोडो यात्रे’चा आगामी निवडणुकीत कसा प्रभाव दिसतो, हे पाहावे लागणार आहे. पण, यापूर्वी अनेक नेत्यांनी आपल्या अस्तित्वासाठी पदयात्रेचा मार्ग स्वीकारल्याचं पहायला मिळतं. त्याचं काही यात्रांबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

हेही वाचा – अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा ‘मशाली’; शिवसेनेचे चिन्ह पोहचविण्याच्या तयारीचा असाही योगायोग

चंद्रशेखर

१९८३ साली इंदिरा गांधी यांनी जनता पक्षाचा पराभव करत पंतप्रधान पदाची सुत्रे हाती घेतली होती. तेव्हा त्यांच्याविरोधात जनता पक्षाचे नेते चंद्रशेखर यांनी देशातील पाणी, कुपोषण, आरोग्य अशा पाच मुद्द्यांना धरून ४,२०० किलोमीटरची पदयात्रा काढली. कन्याकुमारी ते दिल्ली या चार महिन्यांच्या पदयात्रेच्या अखेर ते राष्ट्रीय राजकारणाच्या केंद्रस्थानी आले. त्यानंतर ते आठ वर्षांनी आठ महिन्यांसाठी पंतप्रधान झाले. नोव्हेंबर १९९० ते जून १९९१ असा त्यांच्या पंतप्रधान पदाचा कार्यकाळ होता.

वाय. एस. आर. रेड्डी

वाय. एस. राजशेखर रेड्डी हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रमुख नेते होते. सलग तीन दशके आंध्रप्रदेशमधील तेलुगू देसम पक्षाची सत्ता खाली खेचण्याचा चंग त्यांनी बांधला होता. यासाठी ‘प्रजास्थानम्’ नावाने दोन महिन्यांची पदयात्रा वाय. एस. आर यांनी काढली. यादरम्यान त्यांनी १,५०० किलोमीटरचा पायी प्रवास केला. त्यांच्या या पदयात्रेचा प्रभाव असा पडला की, चंद्रबाबू नायडू यांच्या नेतृत्वाखालील सरकारला २००४ साली पराभवाचा सामना करावा लागला. वाय. एस. आर यांनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. २००९ सालीही त्यांनी काँग्रेसची एकहाती सत्ता आणली. मात्र, त्याच वर्षी हेलिकॉप्टर अपघातात त्यांचा मृत्यू झाला.

हेही वाचा – पन्हाळा विधानसभा जिंकण्याच्या अजित पवार यांच्या ध्येयासमोर आघाडीच्या एकजिनसीपणाचे आव्हान

चंद्रबाबू नायडू

वाय. एस. आर रेड्डी यांनी २००४ आणि २००९ साली चंद्रबाबू नायडू यांचा सत्तेचा रथ रोखून ठेवला होता. पण, चंद्रबाबू नायडू यांनी वाय. एस. आर रेड्डींच्या रणनीतीचा अवलंब केला. २०१३ साली नायडूंनी ‘वास्तुन्ना मीकोसम’ ( मी तुमच्यासाठी येत आहे ) नावाची पदयात्रा काढली. ही पदयात्रा २,८०० किलोमीटर आणि २०८ दिवस चालणार होती. या यात्रेदरम्यान, नायडूंनी आपली हरवलेली प्रतिमा पुन्हा प्रस्थापित केली. यामुळे २०१४ साली विधानसभा निवडणुकीत त्यांचा टीडीपा हा पक्ष पुन्हा सत्तेत आला.

जनगनमोहन रेड्डी

२००९ साली वाय. एस. आर रेड्डी यांच्या मृत्यूनंतर पुत्र जगनमोहन यांनी काँग्रेस पक्षात मुख्यमंत्रीपदावर दावा केला. तत्कालीन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांना हे पटले नाही. जगनमोहन यांना कोणतेही पद देण्यास काँग्रेसने टाळले. जगनमोहन यांची आई सोनियांच्या भेटीसाठी गेली असता त्यांना भेट नाकारण्यात आली.

काँग्रेस नेतृत्वाकडून खच्चीकरण करण्यात आल्याने जगनमोहन रेड्डी यांनी काँग्रेस सोडून वायएसआर काँग्रेस हा नवीन पक्ष काढण्याचा निर्णय घेतला. पण, काँग्रेस नेतृत्वाला आव्हान देणाऱ्या जगनमोहन यांच्या विरोधात काँग्रेसने मग साम, दाम, दंड, भेदाचा वापर केला. त्यांना अटक करण्यात आली. पुढे १६ महिने जगनमोहन यांना तुरुंगात राहावे लागले. तुरुंगातून जामिनावर सुटल्यावर काँग्रेसला धडा शिकविण्याचा चंगच त्यांनी बांधला होता.

हेही वाचा – माझ्यावर टीका करण्याचं कंत्राट काँग्रेसने दुसऱ्याला दिलं आहे – पंतप्रधान मोदींचं विधान!

२०१४ साली विधानसभा निवडणुकीत जगनमोहन यांचा पराभव झाला. त्यांचा पक्ष विरोधी बाकावर बसला आणि जगनमोहन विरोधी पक्ष नेते झाले. त्यांनी राज्यातील सत्तेवर येण्यासाठी वडिलांप्रमाणेच पदयात्रा काढण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, ३,६४८ किलोमीटरची पदयात्रा जगनमोहन यांनी काढली. १४ महिने ही पदयात्रा चालली. २०१९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत चंद्रबाबू नायडूंचा दारूण पराभव करत जगनमोहन रेड्डी राज्याचे मुख्यमंत्री बनले.

दिग्विजय सिंह

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी मध्यप्रदेशमध्ये ३,३०० किलोमीटरची पदयात्रा काढली होती. ही यात्रा संपूर्णपणे बिगर-राजकीय असल्याचं सिंग यांनी सांगितलं. सहा महिने चाललेल्या या यात्रेच्या माध्यमातून लोकांशी नाळ जोडणे, हाच त्याचा हेतू होता. तो साध्यही झाला, कारण २०१८ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने भाजपाचा पराभव केला. कमलनाथ राज्याचे मुख्यमंत्री झाले. मात्र, ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेस पक्षात बंड केलं. त्यामुळे पुन्हा भाजपा सत्तेवर आली. पण, या यात्रेने राज्यातील काँग्रेस आणि सिंग यांच्या राजकीय कारकिर्दीला संजीवनी मिळाली. ती आता होणाऱ्या काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीपर्यंत कायम होती.

भारत जोडो यात्रा

खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वात कन्याकुमारी ते काश्मीर अशी ‘भारत जोडो यात्रा’ सुरु केली आहे. 3,700 किलोमीटर चालणारी ही यात्रा अलिकडच्या काळातील सर्वात मोठी आहे. या यात्रेला ठिकठिकाणी प्रतिसादही मिळत आहे. लहान मुलांना आणि वृद्धांना मिठी मारतानाचे राहुल गांधींचे फोटो समाजमाध्यमावर व्हायरल होत आहेत. यामाध्यमातून काँग्रेसची समाजमाध्यम टीम राहुल गांधींना प्रेमळ राजकारणी असल्याचं दाखवत आहे.

हेही वाचा – शिवसेनेच्या आक्रमक भाजपविरोधी भूमिकेमुळे ‘एमआयएम’ची कोंडी; सेनेबाबतच्या धोरणाबद्दल संभ्रम

दुसरीकडे, काँग्रेसचे नेते जयराम रमेश ‘भारत जोडो यात्रा,’ ‘काँग्रेस’ आणि ‘राहुल गांधीं’वर करण्यात येत असलेल्या टीकांना तेवढ्याच जोरकसपणे प्रत्युत्तर देत आहेत. जयराम रमेश यांना सुप्रिया श्रीनाते आणि पवन खेरा यांचा पाठिंबा मिळत असल्याचं दिसत आहे.

राहुल गांधी ‘भारत जाडो यात्रे’च्या माध्यमातून लोकांना भेटत असून, त्यांच्यात वावरताना दिसत आहे. त्यामुळे लोकांत एक आत्मियतेची भावना निर्माण झाली आहे. मात्र, ही यात्रा मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनण्यापासून रोखू शकेल का? हा खूप मोठा प्रश्न आहे.

याबाबत इंडिया टुडेशी बोलताना राजकीय पत्रकार इफ्तिखार गिलानी म्हणाले, “राजकारण हे बॉलिवूडमधील चित्रपटासारखं आहे. कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी काही प्रमाणात यात्रा काम करू शकते. मात्र, त्याचा मतदारांच्या पसंतीवर मर्यादित स्वरूपात प्रभाव पडू शकतो.”

हेही वाचा – अचलपूर-परतवाड्यात पुन्हा धार्मिक विद्वेषाचे निखारे

२०१४ साली लोकसभा निवडणुकीत झालेला पराभव राहुल गांधींनी पक्ष बांधणीवर लक्ष द्यायला पाहिजे होते. मात्र, त्याकडे त्यांनी फारसे गांभीर्याने घेतलं नाही. भाजपाकडे त्यांच्या विचारधारेवर आधारित कार्यकर्त्यांचा मजबूत केडर बेस आहे. याला सामोरे कसे जायचे, हे जाणून घेण्यासाठी काँग्रेसला आणखी काम करण्याची गरज आहे. त्यामुळेच राहुल गांधी कधी धर्मनिरपेक्ष तर, कधी सॉफ्ट हिंदूत्वाचा वापर करतात. पण, ‘भारत जोडो यात्रा’ ही ‘भारत चमक रहा है लेकीन आम आदमी को क्या मिला?’, अशी प्रभावी घोषणा देऊ शकेल का? याकडे पाहावे लागणार आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Before rahul gandhi bharat jodo 5 long walks that helped revive political careers ssa