मोहन अटाळकर, लोकसत्ता

अमरावती: विधान सभा आणि विधान परिषदेत तब्‍बल दोन दशके प्रतिनिधित्‍व करणारे भाजपचे ज्‍येष्‍ठ नेते जगदीश गुप्‍ता यांनी पुन्‍हा सक्रिय राजकारणात परतण्‍याची तयारी केली असून अमरावतीच्‍या राजकीय सारीपाटावर आता नवी समीकरणे उदयास येण्‍याची चिन्‍हे आहेत.

suvendu adhikari Mamata Banerjee
‘आता बंगालची पाळी’, दिल्ली विजयानंतर भाजपा नेत्याचे ममता बॅनर्जींना आव्हान
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Delhi Election Results 2025 news in marathi
दिल्लीतील भाजपच्या अभूतपूर्व यशाचे समीकरण; नीतीत बदल, सूक्ष्म व्यवस्थापन, मोदींचे नेतृत्व!
Kerala Politics
Kerala Politics : आगामी विधानसभेनंतर केरळच्या मुख्यमंत्री पदावर आययूएमएल दावा करणार? मित्रपक्ष काँग्रेसला दिला इशारा
Karnataka BJP leadership feud intensifies with anti-Yediyurappa camp proposing a new name for state unit chief.
“…तर कर्नाटकात दहा जागाही मिळणार नाहीत”, कर्नाटक भाजपामध्ये पेटला अंतर्गत वाद; प्रदेशाध्यक्षपदासाठी रस्सीखेच
Will return both maces Chandrahar Patils stance in protest against umpire
दोन्ही गदा परत करणार! पंचाच्या निषेधार्थ चंद्रहार पाटलांची भूमिका
Chandrahar Patil On Maharashtra Kesari 2025
Chandrahar Patil : ‘गदा’वापसी : “मानाच्या दोन्ही गदा परत करणार”, डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांची मोठी घोषणा
delhi assembly elections 2025
लालकिल्ला : दिल्ली भाजपसाठी आणखी प्रतिष्ठेची!

जगदीश गुप्‍ता यांच्‍या वाढदिवसाच्‍या निमित्‍ताने रविवारी हितचिंतकांनी आयोजित केलेल्‍या मेळाव्‍यात राजकारणात पुन्‍हा दमदार प्रवेशाचे संकेत देतानाच गुप्‍ता यांनी कार्यकर्त्‍यांना संयम बाळगण्‍याचे आवाहनही केले. अमरावतीत पक्षाला पुन्‍हा उभारी देण्‍यासाठी जगदीश गुप्‍ता यांच्‍या अनुभवाच्‍या शिदोरीची गरज असल्‍याचे सुतोवाच भाजपचे प्रदेशाध्‍यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले, तर अमरावतीच्‍या खासदार नवनीत राणा यांनीही त्‍यांच्‍या राजकीय वाटचालीसाठी शुभेच्‍छा दिल्‍या.

आणखी वाचा- मविआच्या वज्रमुठ सभेने भाजपच्या बालेकिल्ल्याला हादरे

जगदीश गुप्‍ता यांचे आध्‍यात्मिक गुरू रामानंदाचार्य राजेश्‍वर माऊली यांच्‍या उपस्थितीत पार पडलेल्‍या या सोहळ्यातून नवीन संदेश दिला गेला. जगदीश गुप्‍ता हे भाजपच्‍या जुन्‍या-जाणत्‍या नेत्‍यांपैकी एक मानले जातात. १९९० मध्‍ये कॉंग्रेसच्‍या अमरावतीतील बालेकिल्‍ल्‍याला सुरूंग लावत जगदीश गुप्‍ता हे निवडून आले. १९९५ मध्‍ये दुसऱ्यांदा विजयी झाले आणि राज्‍यमंत्री, अमरावतीचे पालकमंत्री म्‍हणून काम करण्‍याची संधी त्‍यांना मिळाली. १९९९ च्‍या निवडणुकीत कॉंग्रेसचे डॉ. सुनील देशमुख यांनी त्‍यांचा पराभव केला, पण २००० ते २०१२ पर्यंत त्‍यांनी विधान परिषदेवर अमरावती स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍था मतदार संघाचे प्रतिनिधित्‍व करीत राजकारणात अस्तित्‍व टिकवून ठेवले.

भाजपच्‍या वरिष्‍ठ नेत्‍यांशी मतभेद झाल्‍यानंतर मात्र जगदीश गुप्‍ता हे पक्षापासून दूर होत गेले. पक्षशिस्‍तीचे उल्‍लंघन केल्‍याचा ठपका ठेवून त्‍यांना पक्षातून निलंबित करण्‍यात आले. त्‍याचवेळी २०१२ च्‍या महापालिकेच्‍या निवडणुकीत जगदीश गुप्‍ता यांनी स्‍वतंत्र आघाडी तयार केली. त्यावेळी जगदीश गुप्ता आणि काँग्रेसमधून निलंबित डॉ. सुनील देशमुख यांनी स्थापन केलेल्या जनकल्याण-जनविकास आघाडीने सात जागा मिळवल्या होत्या. या निवडणुकीत फारसे यश न मिळाल्‍याने जगदीश गुप्‍ता यांचा भ्रमनिरास झाला. तेव्‍हापासून ते सक्रीय राजकारणापासून अलिप्‍त राहू लागले. पण, गेल्‍या काही वर्षांत ते भाजपच्‍या वर्तूळात सहभागी होताना दिसले. गुप्‍ता यांच्‍याकडे कुठलेही पद नसले, तरी त्‍यांचा गट भाजपमध्‍ये अस्तित्‍व टिकवून आहे. नोव्‍हेंबर २०२१ मध्‍ये अमरावतीत उसळलेल्‍या दंगल प्रकरणी जगदीश गुप्‍ता यांच्‍यासह भाजप, विश्‍व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्‍या अनेक कार्यकर्त्‍यांना अटक करण्‍यात आली होती. तेव्‍हा जगदीश गुप्‍ता यांचे नाव राजकीय चर्चेत आले होते.

आणखी वाचा- Karnataka : ‘वडील किंवा मुलगा एकालाच उमेदवारी,’ मोदींच्या सूचनेनुसार भाजपाकडून घराणेशाहीला तिलांजली

आता वाढदिवसाच्‍या मेळाव्‍याच्‍या निमित्‍ताने जगदीश गुप्‍ता यांच्‍या गटाने शक्‍तिप्रदर्शन केले आहे. पक्षात गुप्‍ता यांना नव्‍याने महत्‍वाचे पद मिळावे, अशी अपेक्षा ते बाळगून आहेत. डॉ. सुनील देशमुख यांनी भाजपमध्‍ये प्रवेश केला आणि ते आमदारही झाले, पण जगदीश गुप्‍ता भाजपमध्‍ये असूनही त्‍यांना संधी मिळत नाही, ही खंतही त्‍यांच्‍या समर्थकांमध्‍ये आहे. गेल्‍या विधानसभेच्‍या निवडणुकीत पराभूत झालेले डॉ. सुनील देशमुख स्‍वगृही कॉंग्रेसमध्‍ये परतल्‍यानंतर अमरावती विधानसभा मतदार संघात भाजप उमेदवाराच्‍या शोधात असताना जगदीश गुप्‍ता यांच्‍या समर्थकांनी इच्‍छा उफाळून आली आहे. पण, विधानसभेआधी लोकसभेची निवडणूक असल्‍याने भाजपसमोर चांगली कामगिरी करण्‍याचे आव्‍हान आहे. सुरूवातीला ही लढाई लढायची आहे. पुढचे राजकारण संयमानेच करायचे आहे, अशी साद जगदीश गुप्‍ता यांनी त्‍यांच्‍या समर्थकांना घातली आहे.

आणखी वाचा-Tamil Naud: ‘माजी आयपीएस, भाजपा नेते के. अन्नामलाई अनियंत्रित व्यक्ती की गुप्त शस्त्र’, भाजपाची नेमकी गोची कुठे झाली?

गेल्‍या दोन दशकांमध्‍ये अनेक बदल घडून आले आहेत. राज्‍यसभा सदस्‍य डॉ. अनिल बोंडे, विधान परिषद सदस्‍य प्रवीण पोटे, श्रीकांत भारतीय यांच्‍यासह अनेक नेते भाजपमध्‍ये स्‍वत:चे स्‍थान अधिक मजबूत करण्‍याच्‍या प्रयत्‍नात आहेत. अमरावतीतून विधानसभेची निवडणूक लढण्‍यास अनेक जण इच्‍छूक आहेत. त्‍यामुळे भाजपमधील इतर गट जगदीश गुप्‍ता यांचे स्‍वागत करतील का, हा मुद्दा समोर आला आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुप्‍ता यांना ‘ऊर्जावान’ बनण्‍याच्‍या शुभेच्‍छा दिल्‍या असताना भाजपमधील इतर गट काय भूमिका घेतात, याकडेही अनेकांचे लक्ष लागले आहे.

विधानसभा निवडणुकीत भाजपची कॉंग्रेससोबतच प्रामुख्‍याने लढत असेल. १९९० च्‍या दशकातील संघर्षाची पुनरावृत्‍ती आगामी काळात होईल का, हा प्रश्‍न आता चर्चेत आला आहे.

Story img Loader