बेलापूर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नवी मुंबई : नवी मुंबईतील राजकीय वर्तुळात गणेश नाईक या नावाचा गेल्या तीन दशकांत एकहाती प्रभाव राहिला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मुशीत तयार झालेले नाईक पुढे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करते झाले आणि पुढे राजकारणातील बदलते वारे लक्षात घेऊन भाजपमध्ये स्थिरावले. नाईकांच्या या प्रभावाला २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर मात्र काहीशी ओहोटी लागली.

मागील दहा वर्षांत बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे भाजपचा बालेकिल्ला ठरलेल्या बेलापूर विधानसभा मतदारसंघात यंदा गणेश नाईक यांचे माजी आमदार पुत्र संदीप यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाची ‘तुतारी’ हाती घेत भाजपसमोरच आव्हान उभे केले आहे. नवी मुंबईत बेलापूर आणि ऐरोली हे दोन विधानसभा मतदारसंघ असून, ऐरोलीमध्ये गणेश नाईक हे भाजपचे उमेदवार, तर बेलापूरमध्ये संदीप नाईक हे भाजपच्या विरोधात राष्ट्रवादीचे (शरद पवार) उमेदवार अशी काहीशी विचित्र राजकीय परिस्थिती आहे. भाजपच्या विद्यामान आमदार मंदा म्हात्रे यांच्याशी संदीप नाईक यांची लढत होणार आहे. त्यातच शिवसेनेचे (शिंदे) नेते व निवृत्त सनदी अधिकारी विजय नहाटा यांनी बेलापूरमधून बंडखोरी केल्याने त्याचा फाटका भाजपला किती बसतो, याचीही चर्चा आहे.

ऐरोलीतून गणेश नाईक भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवत असताना संदीप यांनी लगतच असलेल्या बेलापूरमधून तुतारी हाती घेत रिंगणात उडी मारल्याने ही निवडणूक रंगतदार ठरली आहे. वरवर पाहता ही निवडणूक नाईक विरुद्ध म्हात्रे अशी दिसत असली तरी नाईक आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संघर्षाची किनारही या लढाईला स्पष्टपणे दिसून येत आहे. म्हात्रे यांच्या विजयासाठी मुख्यमंत्र्यांनीही जोर लावला असून, लगतच असलेल्या ऐरोली विधानसभा क्षेत्रात गणेश नाईकांविरोधातील बंडाला मात्र शिंदे गटाची साथ मिळताना दिसत आहे. त्यामुळे बेलापूरची लढाई नाईकांसाठी प्रतिष्ठेची आणि अस्तित्वाचीही ठरत आहे.

हेही वाचा >>> कसब्यात एक ॲक्सिडेंटल आमदार तयार झाला : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार रविंद्र धंगेकर यांना टोला

निर्णायक मुद्दे

● महाविकास आघाडी ९०,०००

● झपाट्याने होत असलेले नागरीकरण, वाढते प्रदूषण, पाणथळींच्या जागा विकासकांना विकण्याचे सरकारी धोरण असे महत्त्वाचे मुद्दे या निवडणुकीच्या केंद्रस्थानी आहेत.

● नवी मुंबईचे पाणी ठाण्याला पळविले जात असून १४ गावांच्या विकासासाठी नवी मुंबईकरांच्या कराचा पैसा वळविला जात असल्याचा मुद्दाही या निवडणुकीत गाजू लागला आहे.

● २०१४ नंतर बदललेल्या राजकीय समीकरणात बेलापूर हा भाजपनिष्ठ मतदारांचे प्रभाव क्षेत्र ठरू लागला आहे. भाजपचा हा बालेकिल्ला भेदण्याचे आव्हान यावेळी नाईकांना पेलावे लागणार आहे.