वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेनेबरोबर युती करण्याचे यापूर्वीच जाहीर केले होते. त्यानुसार ही युती आता आकारला येत आहे. परंतु या युतीचा मुंबईत शिवसेनेला किती फायदा होईल याबाबत वेगवेगळे मतप्रवाह आहेत. मुंबईत रामदास आठवले यांचा रिपल्बिकन पक्ष की प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीची ताकद अधिक, असा प्रश्न नेहमी विचारला जातो. प्रकाश आंबेडकर यांनी अकोला जिल्ह्यात अधिक लक्ष केंद्रित केले. अकोला जिल्हा परिषदेत या पक्षाला सत्ता मिळाली. याशिवाय दोन आमदार मागे निवडून आले होते. अकोल्याचा अपवाद वगळता वंचित बहुजन आघाडीला राज्याच्या अन्य भागात राजकीय प्रभाव पाडता आलेला नाही किंवा राजकीय यशही प्राप्त झालेले नाही. यालउट रामदास आठवले यांनी मुंबई, ठाणे, नवी मुंबईवर अधिक लक्ष केंद्रीत केले होते. आठवले यांच्या पक्षाला निवडणुकीत मर्यादित यश मिळाले असले तरी मुंबईच्या दलित वस्त्यांमध्ये आठवले यांच्या पक्षाचा प्रभाव जाणवतो. ही मते निर्णायक असतात आणि आठवले यांच्या आदेशानुसार मतदान होत असते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा