भंडारा : महिलांचा राजकारणातील सक्रिय सहभाग हा नेहमी चर्चिला जाणारा विषय. राजकारणात महिलांची भागीदारी वाढावी, यासाठी देशभरात प्रयत्न केले जात आहेत. मात्र, भंडारा जिल्ह्यात यासंदर्भात विरोधाभासी चित्र आहे. जिल्ह्यात तीन मतदारसंघ आहेत. मात्र, आजवरच्या इतिहासात एकही महिला आमदार जिल्ह्यातून निवडून आलेली नाही. राजकीय पक्षांनीही महिलांना उमेदवारी देण्यासाठी फारसा पुढाकार घेतल्याचे आजवर दिसून आले नाही.

जिल्ह्यात तुमसर, भंडारा आणि साकोली असे तीन विधानसभा मतदारसंघ आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत या तीनही मतदारसंघातून केवळ तीन महिला उमेदवार रिंगणात होत्या. त्यात तुमसरमध्ये दोन तर साकोली विधानसभेत एक महिला उमेदवार. भंडारा विधानसभा क्षेत्रात तर सर्व १४ पुरुष उमेदवार होते. एकाही पक्षाने महिलेला उमेदवारी दिली नव्हती. त्यातही उमेदवारी दाखल केलेल्या दोन महिलांनी रिंगणातून माघार घेतली होती. त्यात मनसेच्या पूजा गणेश ठवकर आणि अपक्ष अनुसया बावणे यांचा समावेश होता. बहुजन समाज पक्षाकडून नामांकन दाखल करणाऱ्या अनिता कुंजन शेंडे यांचा अर्ज ‘एबी फॉर्म’ नसल्याने अवैध ठरविण्यात आला. तुमसर विधानसभा मतदारसंघातील दहा उमेदवारांमध्ये बहुजन समाज पक्षाच्या छाया गभणे आणि अपक्ष उषा केसलकर या दोन महिलांचा समावेश होता. साकोली मतदारसंघात बळीराजा पक्षातर्फे उर्मिला आगाशे या निवडणूक रिंगणात होत्या. या सर्व महिला उमेदवारांचा पराभव झाला.

bjp keshav upadhyay slams sharad pawar and uddhav thackeray for playing bad politics after shivaji maharaj statue collapse
राष्ट्रपुरुषांना वेठीस धरण्यापर्यंत वैफल्यग्रस्तांची मजल – केशव उपाध्ये यांची टीका
8th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
८ सप्टेंबर पंचाग: मेष, कुंभसह ‘या’ पाच राशींच नशीब बदलणार इंद्र योग; सुखाच्या सरी बरसणार तर कोणाचे कष्ट वाढणार; वाचा तुमचे भविष्य
Nagpur, narendra modi, vadhvan port grounbreaking, nana patole criticises pm narendra modi,
स्थानिकांचा विरोध डावलून मोदींच्या हस्ते वाढवण बंदराचे भूमीपूजन, पटोले यांची टीका
Raj Thackeray, gadchiroli, Maha vikas Aghadi,
“लोकसभेत महाविकास आघाडीला कौल, कारण…” काय म्हणाले राज ठाकरे?
Raj Thackeray, Gondia, Raj Thackeray on Badlapur,
“बदलापूरची घटना मनसे पदाधिकाऱ्यांमुळे उघड,” राज ठाकरे यांचा दावा
Addiction, Abuse, Womens Commission, Akola,
“व्यसनाधीनतेतून शोषणासारख्या गैरकृत्यात वाढ,” महिला आयोगाच्या माजी सदस्यांचा निष्कर्ष
Opposition of Mahavikas Aghadi to development works in Naina area
नैना क्षेत्रातील विकसकामांना महाविकास आघाडीचा विरोध
Jitendra awhad marathi news
कळवा, मुंब्रा, दिव्यात एकाच कामावर दोनदा खर्च?; राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचा गंभीर आरोप

हेही वाचा…७७ व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या शेकापसमोर आव्हानांचा डोंगर

महिलांचा राजकारणात सहभाग वाढावा, यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना ५० टक्के आरक्षण देण्यात आले. मात्र विधानसभेत महिलांसाठी कोणताही मतदारसंघ आरक्षित नाही. लोकसंख्येच्या निम्मी संख्या असतानाही एकही महिला आमदार भंडारा जिल्ह्यातून विधानसभेत पोहचली नाही.

हेही वाचा…राजन विचारे यांच्या याचिकेवर नरेश म्हस्के यांना उच्च न्यायालयाचे समन्स

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महिला मतदारांनी पाठ फिरवल्याने भाजपला पराभवाचा सामना करावा लागला, असे राजकीय विश्लेषक सांगतात. यातून धडा घेत भाजपसह सर्वच राजकीय पक्ष आगामी विधानसभा निवडणुकीत भंडारा जिल्ह्यातील मतदारसंघांमध्ये महिला उमेदवारांना संधी देणार का? प्रतिगामी मानसिकता सोडून पुरोगामीत्वाची चुणूक हे पक्ष दाखवणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.