Bhandara Gondia Assembly Election 2024 : भंडारा-गोंदिया मतदारसंघात महायुतीतील जागावाटपाचा तिढा सुटला असला तरी सातही विधानसभा मतदारसंघात भाजपच्या निष्ठावंतांना संधी मिळाली नसल्याने त्यांच्यात नाराजी आहे. भाजपचे नेते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आमदार परिणय फुके यांची एकाधिकारशाही यासाठी कारणीभूत असल्याचे सांगण्यात येते.

भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील राजकारणात परिणय फुके यांच्या प्रवेशामुळे दोन्ही जिल्ह्यांतील भाजपची संघटना खिळखिळी झाल्याच्या प्रतिक्रिया भाजपच्या काही जुन्या जाणत्या नेत्यांनी दिल्या आहेत. भंडारा जिल्ह्यात भंडारा मतदारसंघाची जागा शिवसेनेला (शिंदे गट) आणि तुमसरची जागा राष्ट्रवादीला (अजित पवार) सोडण्यात आली. साकोलीत भाजपने राष्ट्रवादीतून आयात उमेदवाराला तिकीट देण्यात आले. या तीनही मतदारसंघात अधिकृत उमेदवाराविरुद्ध स्थानिक भाजप नेते व कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे. २०१४ मध्ये या तीनही मतदारसंघावर भाजपचे वर्चस्व होते. मात्र परिणय फुके यांचा जिल्ह्यातील राजकारणात प्रवेश झाल्यावर २० वर्षे भाजपाला एकहाती सत्ता मिळवून देणाऱ्या तुमसर विधानसभा मतदारसंघात भाजपची स्थिती वाईट आहे.

Sudhir Parve Umred, Sudhir Parve,
Umred Assembly Constituency : उमेरडमध्ये शिवसेनेचे राजू पारवे अधांतरी, भाजपच्या पारवेंना उमेदवारी
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Maharashtra Chief Minister Eknath Shinde filed nomination from Kopri-Pachpakhadi constituency, in Thane on Monday.
Eknath Shinde : एकनाथ शिंदेंनी महायुतीत राहून स्वतःचं महत्त्व कसं अबाधित ठेवलं?
Priyanka Gandhi
Priyanka Gandhi : आणखी एक गांधी संसदीय राजकारणात? प्रियांका गांधींनी वायनाडमध्ये प्रचाराचा नारळ फोडला, ‘अशी’ आहे रणनिती!
Kunbi candidates, Rajura, Kunbi Rajura,
राजुऱ्यात तीन कुणबी उमेदवारांमध्ये लढत, कोण बाजी मारणार?
Maharashtra Assembly Election 2024 Mahayuti Mahavikas Aghadi final Seat Sharing Formula
Maharashtra Assembly Election 2024 : महायुती व महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला! सहा पक्षांकडून इतके उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात
ubt shiv sena ex city chief amar qatari slap bjp city chief shri ram ganpule in sangamner
शिवसेनेच्या माजी शहर प्रमुखांनी भाजपा शहर प्रमुखाच्या श्रीमुखात भडकावली; नेमके काय घडले ?
ajit pawar sharad pawar (4)
Ajit Pawar : “लबाडाघरचं आवातनं जेवल्याशिवाय…”, अजित पवारांचा शरद पवारांना टोला; म्हणाले, “ते वक्तव्य म्हणजे नुसत्या थापा”

हेही वाचा – पक्षांतर केल्यावरही राजेंद्र गावित यांनाच उमेदवारी का ?

भंडारा विधानसभा मतदारसंघात फुकेंच्या कार्यशैलीवर कार्यकर्ते प्रश्नचिन्ह उपस्थित करीत आहे. आमदार राम आस्वले यांनी भंडारा विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा भाजपला विजय मिळवून देऊन या मतदारसंघाला भाजपचा बालेकिल्ला अशी ओळख निर्माण करून दिली होती. मात्र फुके यांच्या आगमनामुळे हा बुरुज ढासळला, असे बोलले जाते. आपल्यापेक्षा कुणीही वरचढ होऊ नये या फुकेंच्या कार्यशैलीमुळे अनेक कार्यकर्ते पक्ष सोडून जात असल्याचेही पक्षातूनच बोलले जाते आहे. तुमसरचे माजी आमदार चरण वाघमारे यांचे प्राबल्य सहन न झाल्याने फुके यांनी त्यांच्यावर आरोप करून त्यांना पक्षातून निष्कासित करण्यास पक्षश्रेष्ठींना भाग पाडले होते. मात्र त्याचे परिणाम त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत सातही विधानसभा मतदारसंघात भाजपला भोगावे लागले होते. तरीही फुके हे फडणवीस यांचे निकटवर्तीय असल्याने त्यांच्या मर्जीनेच तिकीट वाटप केले जात असल्याचे सांगण्यात येते.

गटबाजी वाढली

भंडारा जिल्ह्यात सुनील मेंढे आणि परिणय फुके अशा दोन गटांत भाजप विभाजित झाली आहे. या दोन्ही नेत्यांमधील अंतर्गत वाद सर्वश्रुत आहे. २०२४ ची लोकसभा निवडणूक लढण्यास फुके इच्छुक होते. मात्र ऐनवेळी राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल यांनी यात उडी घेतली आणि फुकेंचे लोकसभेचे स्वप्न भंगल्याची चर्चा आहे. फुके यांच्यामुळे भाजप उमेदवाराला लोकसभेत साकोली विधानसभा मतदारसंघात कमी मते पडली आणि भाजपला पराभव पत्करावा लागला, असे सांगण्यात येते. साकोली विधानसभा मतदारसंघात फुकेंचे कट्टर प्रतिस्पर्धी आमदार नाना पटोले यांना पराभूत करण्यासाठी त्यांनी भाजपच्या निष्ठावंतांना डावलून राष्ट्रवादीच्या उमेदवाराला भाजपमध्ये प्रवेश देवून नानांच्या विरोधात उभे करण्याची रणनीती आखली. मात्र त्यामुळे पक्षातील अनेक पदाधिकारी आणि नेते दुखावले गेले आणि भाजप सोडण्याची भाषा बोलू लागले आहेत.

वाघमारे, भोंडेकरांची टीका

परिणय फुकेंमुळे भाजप नेते पक्ष सोडून जातात आणि गेलेले परत येत नाहीत, अशी जाहीर टीका शिंदे गटाचे आमदार नरेंद्र भोंडेकर आणि चरण वाघमारे यांनी यापूर्वीच केले आहे. जनसंघाच्या काळापासून पक्ष वाढीसाठी आणि संघटना मजबूत करण्यासाठी ज्या नेत्यांचे योगदान दिले आहे तेसुद्धा फुके यांच्या हस्तक्षेपानंतर आणि दबावतंत्रामुळे दुरावले गेले आहे. उघडपणे कुणीही बोलत नसले तरी भाजप नेते आणि कार्यकर्त्यामध्ये धुसफूस आणि असंतोष असल्याचे सांगण्यात येते.

हेही वाचा – राजुऱ्यात तीन कुणबी उमेदवारांमध्ये लढत, कोण बाजी मारणार?

निष्ठावंतांमध्ये नाराजी

आम्ही भाजपचे जुने जाणते नेते आहोत. एकेकाळी दोन्ही जिल्ह्यात पक्ष वाढीसाठी आणि संघटन बळकटीसाठी आम्ही रक्ताचे पाणी केले आहे. मात्र आज आमच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांना पक्षात काडीची किंमत राहिलेली नाही. त्यामुळेच माझ्यासारखे अनेक मातब्बर नेते आज भाजपमध्ये सक्रिय नाहीत. मात्र आमची बाजू सांगायची कुणाकडे हाही प्रश्न आहे, कारण भाजप पक्षश्रेष्ठी आणि संघटकसुद्धा परिणय फुकेंच्याच तालावर नाचतात, ज्यांच्याकडे दाद मागावी तेच आता आपले राहिलेले नाहीत अशी खंत एका जेष्ठ भाजपच्या नेत्याने नाव न छापण्याच्या अटीवर बोलून दाखविली.

“जिल्ह्यात भाजपच्या पिच्छेहाटीला परिणय फुके जबाबदार आहेत. माझ्याविरोधात षडयंत्र रचून मला पक्षातून निलंबित करण्याचा डाव फुके यांनी रचला होता. तो यशस्वी झाल्यावर त्यांनी त्यांचे वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न केला. मात्र या विधानसभेत ते सपशेल अपयशी ठरले. भाजपच्या अधोगतीला तेच कारणीभूत आहेत.” – चरण वाघमारे, माजी आमदार, तुमसर

सर्वांना सोबत घेण्याचा आमदार फुकेंचा प्रयत्न

राजकारण म्हटले की, आरोप प्रत्यारोप आलेच. सध्या भाजपमध्येसुद्धा काही असंतुष्ट कार्यकर्ते आहेत. आमदार परिणय फुके सर्वांना एकत्र घेऊन चालण्याचा कायम प्रयत्न करतात. मात्र तरीही आरोप होत असतात त्यामुळे यावर प्रतिक्रिया देणे फुके यांना फारसे गरजेचे वाटत नाही, अशी प्रतिक्रिया फुके यांच्यावतीने त्यांचे स्वीय सहाय्यक दिवाकर मने यांनी दिली.

Story img Loader